प्रिये देशील का मज एक मोका
दुर सागरात उभी असेल आपली नौका ।
नौकेत आपण दोघे राजा राणी
गाऊ प्रेमाची बेधुंद गाणी ॥
प्रिये देशील का मज एक मोका
उंच झाडावर बांधेन तुजसाठी झोका ।
त्याच झाडावर बांधीन छोटस घरट
घरट्यात असेल आपलं चिमुकल कार्ट ॥
प्रिये देशील का मज एक मोका
नजराना देईन तुज सुंदर अनोखा ।
प्रेमाची भेट पाहुन गालात तु हसशील
काय सांगा हसता हसता आठवणही काढशील ॥
प्रिये देशील का मज एक मोका
औसेची रात्र दाटला अंधार काळोखा ।
त्या अंधारातही साथ मी तुझी देईन
चंद्र नाही तारा नाही पण काजवा म्हणुन प्रकाश देईन ॥
श्रीमत् ( महेंन्द्र लक्ष्मण कदम)
3 comments:
त्या अंधारातही साथ मी तुझी देईन
चंद्र नाही तारा नाही पण काजवा म्हणुन प्रकाश देईन ॥
mastach! :)
सुंदर कविता!
मग कविता वाचून दिला का प्रियेने एक मोका??
aaplya priyela pan shikva ase romantic vagne...... any ways toooo cooollll yaar.......
Post a Comment