Featured Post

रोज मरे........

नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० चा गजर लाऊन ७.३० लाच उठलो, अर्थातच आजही व्यायाम करायचा राहीला होता. डोळे चोळत असतानाच डो़क्यात जो काही विचार पहीला आ...

Wednesday, May 6, 2009

मन वेडे

क्षणात इकडे क्षणात तिकडे
बागडते चोहीकडे ॥
ठाव जयाचा नसे अंतरी
अल्लड वारु मन वेडे॥

कधी आनंदी कधी दु:खी
काहुर दाटे मायेकडे॥
ठाव जयाचा नसे अंतरी
अल्लड वारु मन वेडे॥

सदैव व्यस्त प्रवास ज्याचा
जाणिवेतुन नेनिवेकडे॥
ठाव जयाचा नसे अंतरी
अल्लड वारु मन वेडे॥

अनेक रंगी अनेक अंगी
कल अष्टविषयांच्या छटांकडे॥
ठाव जयाचा नसे अंतरी
अल्लड वारु मन वेडे॥

दिसे ते न भासे, भासे ते न दिसे
सु़क्ष्मातुन द्रुश्याकडे॥
ठाव जयाचा नसे अंतरी
अल्लड वारु मन वेडे॥

आकार नसे ऊकार नसे
हृदयातून कल्पनेकडे॥
ठाव जयाचा नसे अंतरी
अल्लड वारु मन वेडे॥

श्रीमत् ( महेंन्द्र लक्ष्मण कदम)

2 comments:

Asha Joglekar said...

सुंदर भाव अन् अध्यात्म पण.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

अतिशय सुंदर कविता. माझ्या कवितेवर अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद!
माझ्या मोगरा फुलला ह्या ब्लॉगला अवश्य भेट द्या.