Featured Post

रोज मरे........

नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० चा गजर लाऊन ७.३० लाच उठलो, अर्थातच आजही व्यायाम करायचा राहीला होता. डोळे चोळत असतानाच डो़क्यात जो काही विचार पहीला आ...

Monday, August 2, 2010

आज पुन्हा मला भिजावसं वाटतय………

तसा हा अनुभव प्रत्येकाच्याच आयुष्यात केव्हा ना केव्हा तरी आलेला सकाळी कामावर जायची घाई असतानाच वरुण राजा (वरुन) जोरात बरसायला लागतो, अंगाची लाही लाही होत असताना असं वाटते की सर्व बंधने झुगारून टाकून पावसात मस्त भिजावं आणि...........आणि बरोबर आपल्या आवडीचं कुणीतरी असाव, (कुणीतरी ह्याच्यासाठी की हल्ली मोबाईल सारख्या "आवडीही" दर दिवसाला बदलायला लागल्यात). कधी कधी तसं होतं ही पण समोर आलेली ती स्वप्न सुंदरी क्षणात मनाला चुटपुट लाऊन नजरेआड होते..........



आज पुन्हा मला भिजावसं वाटतय

चाकरमाणी मन ओढ चाकरीची धरतय,

बॅग छत्री सावरता मध्येच तीही भिजलेली दिसली

नयन भेट होता आमुची कळी मनात उमलली,

मनात आल किती दिवस अस एकट्यानेच भिजायचं

समुळ पावसात भिजुनही असचं कोरड जगायच,

निश्चय केला मनाशी आजच सोडायचा बावळटपणा

जाऊन थेट विचारायच तिला तिथेही नडला आळशीपणा,

कधी नव्हे ती आजच बस ही वेळवर आली

माझं तिकीट काढताच मुळी तीही वेळवर निघाली,

रागावून स्वतालाच मी शाप शिव्या दिल्या

वळुन फिरुन गाढवच मी त्याही डोक्यावरुन गेल्या,

धांदलीत सर्व या भांबावुन पुरता गेलो

धावत पळतच कचेरीत शिरलो आज पुन्हा मी लेट झालो.............



-श्रीमत्

(महेन्द्र लक्ष्मण कदम)

Tuesday, July 20, 2010

श्रावणात भर सरी बरसती..

नुकताच छान पाऊस पडुन गेला असता निर्सगाची वेगवेगळी मोहक रुपे आपणास पाहायला मिळतात आणि नकळतच ती हृदयाच्या एका बंद कोपर्यात असलेल्या आठवणींना उजाळा देऊन जातात, अन् डोळ्यासमोर उभ्या राहतात त्या फक्त भिजलेल्या स्मृती...........................

श्रावणात भर सरी बरसती
सुगंधली सस्य माती,
ओल्या दंवात मंद सळसळली
हिरवीगार पाती

सर्द धुक्यापरी गर्द दाटल्या
आठवणी ह्या मनी,
थुई-थुई करुनी मयुर नाचला
बर्ह प्रती फुलवूनी

करी पसारा उनाड वारा
अवचित उडवी तुषार धारा
धारासार लीन बरसल्या
उभ्या छतावर रिमझिम गारा

दुरून कुठून वळुन खळाळत
आला सुंदर एक जलाकर
अभिमुखम अडगणा निघाली
आर्द्र-बाष्प कटी घेऊन घागर

रुप साजिरे गिरीशिखरांचे
पर्ण बहरले तरूषण्डांचे
सप्त रंग त्या इंद्रधनुचे
ओज भाती जणु गांडीवाचे

चिंब टपोर्या नीर बिंदुंनी
स्रुष्टी सारी गेली भिजुनी
तव चक्षुसह नभ ह्या भेदुनी
अजुनही चातक मागे पाणी......................................

श्रीमत् (महेन्द्र लक्ष्मण कदम)


काही शब्दांचे अर्थ :
सस्य = पिके, लावणी,

बर्ह प्रति = पाठिवरील पिसारा

तरुषण्ड = झाडे
गांडिव = अर्जुणाचे धनुष्य

जलाकर = ओढा, झरा

अभिमुखम = च्या दिशेने

अडगणा = स्त्री

Wednesday, February 24, 2010

तुला पाहताच मी...

आपल्या आयुष्यातील प्रिय व्यक्ती कोण? हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न, हा पण ही व्यक्ती कोणीही असु शकते. उदा. जवळचा मित्र/मैत्रीण, प्रियकर/प्रेयसी, नवरा/बायको, भाऊ/बहीण अगदी आपले आई/बाबा सुद्दा व कशाचीही अपेक्षा न करता ही व्यक्ती आपल्यावर निर्व्याज, निस्वार्थ प्रेम करत असते. कशासाठी.....? अर्थात आपल्याच उत्कर्षासाठी. कधी-कधी आपल्याला ते जाणवतेही, पण गळ्यापर्यंत आलेले शब्द तसेच अडखळुन पडतात. कारण तिच्या निष्पाप प्रेमापुढे शब्दही थिटे पडतात व नकळतच अंतकरणातील पटलावर उमटु लागतात ते असे........................

तुला पाहताच मी
शब्द आज गोठले,
अजुन बंद ओठ हे,
न बोलताच उमटले........ ॥ध्रु॥

वास तु सहवास मी,
आभास तुच भास मी.
न झाकताच पापण्या,
नयन आज झडपले..........॥१॥

हर्ष तु उल्हास मी,
स्पर्श तुच आस मी.
न शोषताच रुधिर हे,
ह्रुदय आज धडकले...........॥२॥

वेळ तु अवेळ मी,
नाळ तुच बाळ मी.
न मांडताच डाव हा,
खेळ आज बहरले............॥३॥

शक्त तु अशक्त मी,
अव्यक्त तुच व्यक्त मी
न संचित नभात या,
मेघ आज बरसले.............॥४॥

निस्वार्थ तु स्वार्थ मी,
अर्थ तुच व्यर्थ मी.
न दाटताच कंठ हा,
बाष्प आज खळकले..........॥५॥

तीर तु कमान मी,
धीर तुच उधान मी.
न सोडताच जीव हा,
प्राण आज हरपले...................॥६॥



-श्रीमत्
(महेन्द्र लक्ष्मण कदम)

Monday, February 8, 2010

कचेरीतील दिवस

कचेरीत बसुन खुर्चीत सताड
संगणक मी पाहात असतो;
कामाचा व्याप डोक्याला ताप
स्वतालाच मी छळत बसतो,

कितीही मनापासुन ठरवल तरी
आठ तास काही भरत नाही;
काम करता तास सारे
वेळ काही सरत नाही,

अधुन्-मधून दुरध्वनी
मोठ्या आवाजात ओरडत असतो;
वरिष्ठांच्या आज्ञेचा तपशील तोच
तर आपल्याला देत असतो,

कामात व्यस्त असता मध्येच
मेल लुडबूइ करुन जातो;
कितीही ठरवल नंतर पाहीन
तरीही जीव त्यातच अडकतो,

असेच काम सारता सारता
परतीची वेळ उभी राहते;
निघण्याच्या घाईत सुध्दा
उद्याचीच तयारी सुरु असते.


-
श्रीमत्
(महेन्द्र लक्ष्मण कदम)