Featured Post
रोज मरे........
नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० चा गजर लाऊन ७.३० लाच उठलो, अर्थातच आजही व्यायाम करायचा राहीला होता. डोळे चोळत असतानाच डो़क्यात जो काही विचार पहीला आ...
Tuesday, January 20, 2026
🚆 हार्बर लाईन प्रवाशांचा रोजचा संघर्ष
Friday, January 26, 2024
सातारा - पश्चिम घाटाला पडतोय प्लास्टिकचा विळखा.
सातारा - पश्चिम घाटाला पडतोय प्लास्टिकचा विळखा.
रांगडा निसर्ग, आल्हादायक वातावरण व चांगले रस्ते यामुळे शहरातील लोकांचा या ठिकाणी सतत वावर असतो. त्यात भरीस भर कास पुष्प पठाराला युनेस्को ने जागतिक नैसर्गिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केल्यानंतर इकडे येणाऱ्या लोंढ्यांमध्ये अजूनच भर पडली. भरीस भर अजिंक्यतारा, सज्जनगड, ठोसेघर,वासोटा, बामणोली आणि वज्राई धबधबा आहेच पाहण्यासाठी.
वाढत्या (मॅरेथॉन, क्रिकेट) स्पर्धांचे आयोजनं, प्री वेडिंग शूट, अनियोजित वाढतं नागरिकीकरण आणि जोडीने वाढणारा पर्यटकांचा वावर यामुळे हि सर्व ठिकाण हल्ली गर्दीने गजबजलेली असतात. हि गर्दी येताना ना-ना तर्हेच्या गोष्टी आपल्या सोयीसाठी घेऊन येते आणि जाताना वडिलांची वतनदारी असल्याप्रमाणे घाणीचं साम्राज्य मागे सोडून जाते. नियोजित कार्यभाग साधुन सोशल मीडिया वर फोटो किंवा रील्स टाकून झाल्या कि, ना आयोजकांना त्या निसर्गाचा सोयर-सुतक असतं ना त्यातील सहभागी स्पर्धकांना.
त्यातच हल्ली "भावा लाईफ मध्ये फक्त एन्जॉय करायचा संघटना" जबरदस्त ऍक्टिव्ह आहे यांना महागाई दर, बेरोजगारी, पर्यावरण, सामाजिक बांधिलकी असले काही बाही कळत नाही, मुळात त्यांच्या लेखी असे काही प्रॉब्लेम असतात याची जाणीवही नसते. तर हि होतकरू संघटना पार्ट्या करण्यासाठी नेहमी नव-नवीन निसर्गरम्य जागांच्या शोधात असते. यांची खासियत म्हणजे मजा करायला जिथे बसणार तिथेच घाण करनार, तिथेच दारूच्या बाटल्या फोडणार, सिगारेट ओढून झाली की उरलेल्या काड्यांनी रानात वणवा लावणार. गुटखा मावा खाऊन झाला कि पाकीट तिथेच फेकणार. ह्या अशा मस्करीत लावलेल्या वणव्यांमुळे पुर्ण इको सिस्टीम दणाणते, पिकांचं नुकसान होतं, सरपटणारे जीव-जंतु, पशुपक्षी घरासकट जळुन मरतात. मोठं मोठ्ठाली झाडं मुळासकट जळुन खाक होतात. ज्याचा परिणाम स्थानिक ग्रामस्थांवर ज्यांनी आयुष्यभर मेहनत घेऊन हा रानमेवा जपलेला असतो आणि अर्थात निसर्ग चक्रावर होतो.
कारण "Every Action Has Opposite Reaction!
बाबांनो तुम्ही दारू प्यावी कि नाही गुटखा, तंबाखू, सिगारेटच व्यसन करावं की नाही याची चेतावणी त्या वस्तूंवर विक्रेत्यांनी दिलेली असते त्यात व्यसन करणे चांगले कि वाईट हा ज्याचा त्याचा वैयक्तिक मुद्दा. घटनेने प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्य बहाल केलंय पण मित्रांनो उघड्यावर घाण पसरवण्याच स्वातंत्र्य तुम्हाला कोणी दिल? मी असे कित्येक पांढरपेशे पाहिलेत जे चालत्या गाडीतुन खाऊन-पिऊन झालं कि रॅपर अथवा बॉटल खिडकीतून चुरगाळून बाहेर फेकून देतात आणि नंतर हेच महाभाग एसी मध्ये बसून ग्लोबल वॉर्मिंग,ओझोनला किती मोठठं भोक पडलंय आणि अंटार्टिका वरचा बर्फ कसा आणि किती वितळतोय यावर सो कॉल्ड चर्चा करनार बघा किती विरोधाभास आहे ते?.
तसं प्रॅक्टिकली पाहायला गेलं तर प्लास्टिकचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनात नाकारू शकत नाही, मी स्वतः भरपूर साऱ्या गोष्टी प्लॅस्टीच्या वापरतो. पण प्रत्येकाने घरात पातळ प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरणं जर टाळलं व रोजच्या वापरात एखादी कापडी पिशवी घरच्याच जुन्या कपड्यांपासून शिवून घेतली तर छोटा का होईना फरक पडेल. रॅपर, बाटल्या वेष्टने इकडे तिकडे न फेकता गावा जवळच्या कचरा कुंडीत अथवा निर्माल्य कलशात टाकलीत तर निदान ती पुनर्वापर प्रक्रिया करणाऱ्या प्लांट पर्यंत पोहचू शकतील.
कित्येकजण कर्मकांडात एवढे अडकलेत कि निर्माल्य कचरा प्लास्टिक पिशवी सकट नदीत अथवा समुद्रात फेकून देतात. अरे बाबांनो हार-फूले हा ऑरगॅनिक कचरा आहे तो घरच्या कुंडीत टाकला तर त्याच छान खत तयार होतं. आणि पाण्यातच टाकायचंय तर पिशवी काढुन टाका ज्याने करून जलाशयातले जीव तो खाऊन त्याच विघटन तरी करतील. गणपती विसर्जनात तर मी मूर्ती सकट संपूर्ण डेकोरेशन नदीत फेकून देताना पाहिलंय. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. तरी नशीब आता थर्माकॉल वर बंदी लावलीये.
गेला बाजार आमच्या सारखे पर्यावरण प्रेमी मधून मधून बेडकासारखे डराव डराव करून येणाऱ्या परिस्थितीची जाणीव करून देतात पण "नगाऱ्याची घाई तिचे टिमकीचं काय?" या म्हणी प्रमाणे सर्व विषय पुन्हा बासनात गुंडाळावे लागतात.
"वर नमूद केल्या प्रमाणे फेकून दिलेल्या घाणीत मुख्यत्वे प्लास्टिकचे साम्राज्य सर्वत्र पसरलेलं दिसतं. त्यात जास्त करून वापरलेल्या देशी- विदेशी दारूच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बॉटल्स, गुटखा आणि खाद्य पदार्थांची वेष्टने यांचा खच सर्रास पडलेला दिसतो. आज कित्येक जंगली प्राणी आणि जलचर अजाणतेपणे प्लास्टिक त्यांच्या पोटात गेल्यामुळे अथवा एखाद्या अवयवात अडकल्यामुळे दगावत आहेत."
हल्ली गुगल वर सर्रास विचारला जाणार प्रश्न "प्लास्टिक पृथ्वीवर विरघळते का? तर त्याच उत्तर पुढीलप्रमाणे "त्यातील केवळ 9% कचरा पुनर्वापर केला जातो आणि 12% जाळला जातो. उर्वरित 79% लँडफिल किंवा वातावरणात कायमचा एका किंवा दुसर्या स्वरूपात तसाच राहतो कारण त्याचं विघटन होतं नाही.."
हे सर्व होण्यामागची मुख्य कारणं "जनजागृतीचा अभाव, प्लास्टिक पुनर्वापराची अपुरी प्रक्रिया आणि स्थानिक प्रशासनाची उदासीनता. अश्या ढोबळ मुद्द्यांमुळे हा प्रश्न सद्या ऐरणीवर आला आहे. आणि ही कचरा वाढ अशीच चालू राहिली तर हा जागतिक वारसा इतिहास जमा झाल्यावाचून राहणार नाही.
मी या लेखाच्या माध्यमातुन समस्त पठार बांधवाना साद घालतो की जमेल तसं जमेल त्या प्रमाणे हा निसर्ग जपण्याचा प्रयत्न करा. आज परमेश्वराच्या कृपेने आपल्याला सुंदर अश्या ठिकाणी जन्मभूमी मिळाली आहे. येणाऱ्या काळात माथेरान-महाबळेश्वर प्रमाणे आपल्या भागात पर्यटन व्यवसाय भरपूर वाढणार आहे रोजगाराच्या नव-नवीन संधी उपलब्ध होतील. त्यामुळे आपण या सर्व गोष्टींवर एकत्रित पणे वेसण घालू शकलो तर आपल्या मुलांना घरापासून दुर पुण्या मुंबईला प्रदूषित वातावरणात कर्ज काढुन घर घेऊन धकाधकीचं आजारी आयुष्य जगावं लागणार नाही. बाकी ह्या लेखातून मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत. चुक भूल माफी असावी.
"आज निसर्गाला वाचवाल तर उद्या निसर्ग तुम्हाला वाचवेल."
Thursday, September 10, 2020
Tuesday, April 7, 2020
जिंदगी...........
Sunday, February 18, 2018
गोवा नाम ही काफी है! _GOA Trip Info
तुम्हाला कोनी विचारल, "काय मग यंदा कुठे आणि तुम्ही फ्क्त "गोवा" अस्स जरी उच्चारलात तर त्या व्यक्तीच्या चेहर्यावरती जे भाव उमटतात ते फक्त आनि फक्त गोव्याला जाउन आलेल्या व्य्क्तीलाच कळु शकतात. अपवाद फ्क्त पुणेकर. 😀😀 मी गोव्याला जाउन येन्याआधी भरपुर संकेत स्थळ पालथी घातली. पण मनासारखी माहीती हाती येत नव्हती आणि जी काही मिळाली तीही आपल्या बोलीभाषेत नव्हती. काही मित्रांना विचारल तर त्यांनी मला साऊथ गोवा, नॉर्थ गोवा असं काही बाही सांगितल. इथे मी आजही रेल्वे स्टेशन वर गेलो की पुढचा पत्ता विचारण्या आधी ईस्ट किंवा वेस्ट ला कस जायच ते आधी विचारुन घेतो. तिथे हा साऊथ आणि नॉर्थ गोवा मला कितपत सापडतोय हा जरा यक्ष प्र्श्नच होता. ते म्हणतात ना स्वता मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. या उक्तीप्रमाने आधी जाऊन आलो आणि आता मी पाहीलेला गोवा माझ्या नजरेतुन तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
![]() |
| मंगेशी मंदिर परिसर |
![]() |
| मंदिरासमोरील दीपमाळ |
![]() |
| Basilica of Bom Jesus |
![]() |
| Inside View of the Church |
![]() |
| Holy Jesus |
तुम्हाला हवं तर तुंम्ही गोवा टुरिझमच्या हॉप ऑन हॉप ऑफ बस सेवेचा लाभ सुद्धा घेऊ शकता. ह्या बसेस फुल्ली एअर कण्डिशन्ड असून त्यांच्या ओपन डेक वरून तुम्ही ३६० डिग्रीत गोवा पाहण्याची मजा लुटू शकता. अधिक माहितीसाठी खालील संकेत स्थळाला भेट द्या.
GOA HIP ON HIP OFF OPEN DECK BUS FACILITY
टीप नं ३- रात्रीचा डिनर लाईव्ह म्युझिक ऐकत करायचा असेल तर शक्यतो बॉलीवूड नाईट असा बोर्ड लावला असेल तरच जावे, अन्यथा "सांगतंय कैरं ऐकतंय बहिरं" अशी अवस्था व्हायची. इंग्लिश गाणी आवडणाऱ्यांसाठी अर्थातच "sky is the limit" भरपुर ऑपशन्स आहेत. पब्स मध्ये जायचं असेल तर टिटोस, कबाना, कोहीबा हे ऑपशन्स आहेतच. कोहिबाला वीकेण्डला जायचं असेल तर कम्पल्सरी शूज व प्रॉपर स्मार्ट कॅज्यअल्स परिधान करावेत. स्लीव्हलेस अथवा थ्री फोर्थ असेल तर माजुर्डे बाउन्सर आत सोडत नाहीत. काही शॅकवाले सुद्धा वीकएंड पार्टीची व्यवस्था करतात.
टीप न. ४- कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी लगेचच मैत्री करू नका अथवा कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका . त्यातही मसाज वाले आणि पेडलर्स पासून सावधान अन्यथा दिल चाहता मधल्या सैफ सारखी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही. काही लोक तिकडे फुलटाईम गळ टाकूनच बसलेले असतात. मजेतला "म" गळुन सजेत रूपांतर व्हायला एक क्षण पुरेसा असतो. so be careful!
![]() |
| Church of St. Fransis |
![]() |
| Fort Aguada |
![]() |
| Dona Paula Sea View |
![]() |
| Dona Paula (Ek Duje Ke Liye Spot) |
![]() |
| Statue in front of Miramar Beach |
![]() |
| Vagator Beach |
खाली नमूद केलेल्या तक्त्यातील रेट सीज़न प्रमाणे कमी जास्त होत असतात त्यामुळे 100-200 रू वर खाली होऊ शकतात. यापेक्षा जास्त दर मागितल्यास सरळ-सरळ दुसरी टॅक्सी/गाडी पाहावी अथवा वाहतुक पोलिसांशी संम्पर्क साधावा.
नॉर्थ गोव्यातील फेमस बीचेस: कलंगुट, बागा,वागातोर,आरंबोल, मँड्रेम, मोर्जीम, अंजुना
साऊथ गोव्यातील फेमस बीचेस: बेनोलिम, कोलवा, वार्सा, पालोलेम, माजोर्डा.
सर्वात महत्वाचं येताना विमानाने येणार असाल तर पाच लिटर दारू आणू शकता. 😜 आता प्लीज आनंदाश्रु ढाळण्यापेक्षा जायची तयारी करा पटकन.





















