Featured Post

रोज मरे........

नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० चा गजर लाऊन ७.३० लाच उठलो, अर्थातच आजही व्यायाम करायचा राहीला होता. डोळे चोळत असतानाच डो़क्यात जो काही विचार पहीला आ...

Thursday, September 10, 2020

मराठा आरक्षणाची हंडी कधी फुटणार?

                        मराठा आरक्षणाची हंडी कधी फुटणार?


नमस्कार! माझ्या मराठा बंधू आणि भगिनींनो मी "महेंद्र कदम" गाव बोर्णे, तालुका सातारा, जिल्हा सातारा. 

सद्या राहायला पनवेल येथे आहे, आता मुद्दा हा आहे कि गेले कित्येक दिवस कार्यरत नसनारा मी, आजच अचानक मला आवाज का फुटावा? साहजिकच हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल? मराठा संघटनेचा  इतिहास सर्वाना सर्वश्रुत आहेच आणि मला तो इथे सांगायचाही नाहीये. 

मी मुळात सामान्य मराठा कुटुंबात जन्मलेला तुमच्या आमच्या सारखाच कामाच्या आणि संसाराच्या रहाटगाड्यात पिंजून गेलेला सामान्य माणूस आहे. रोज सकाळी उठलो की डबा टाकायचा, डबा घ्यायचा, लोकलचे धक्के खात कामावर पाट्या टाकायच्या विकांत आला की मित्रांबरोबर दोन घोट गळ्याच्या खाली उतरवून जगाच्या पॉलिटिक्स वर चर्चा करायच्या यातच धन्यता मानत आलो. मुळात माझं सर्व व्यवस्थित चाललंय ना? मग कशाला या आरक्षण बिरक्षण च्या लफड्यात पडायला हवं. कोण फुकटच्या उठाठेवी करत बसेल. थोडक्यात काय आपलीच गाडी आपलीच माडी  आपल्याच बायकोची गोल गोल साडी या ब्रीद वाक्याचे पालन करनारा मी. आजच हे सर्व का लिहितोय?

लहानपणापासुन ते आज पासपोर्ट चे आप्लिकेशन भरताना कायम धर्म "हिंदू" आणि कॅटेगरी "ओपन" हे टिक मार्क करताना एक वेगळाच माज वाटायचा. पण या माजाची मजा लोक कधी पासुन  घ्यायला लागले ते कधी  कळालच नाही. त्यात ओपन म्हणजे "खुला" आणि खुला म्हणजे कोणीपण यावे टीकली मारून जावे अशी परिस्थिती सद्ध्या निर्माण झाली आहे. त्याला जबाबदार पण आपणच आहोत. स्वताला छत्रपतींचे मावळे संबोधणारे आपण. चंद्र्कोर लावली दाढी कोरली म्हणून फक्त लुक येतो जबाबदारी आणि कार्य मार्गी लावण्यास निष्ठा व ध्यास लागतो.  तो आपल्यापैकी कितीजणांकडे आहे? माझ्या मुला/मुलीच ऍडमिशन झालं ना. मला नोकरी लागलीना. मग काय पाहीजे अजून? पण मुळात आरक्षणाचा मुद्दा फक्त नोकरी आणि शिक्षणा पुरताच मर्यादित आहे का? आज आपल्या समाजावर अथवा समाजातील एखाद्यावर अन्याय झालाच तर आवाज उठवावा अशी एकतरी संघटना सद्या अस्तित्वात आहे का?

आणि ज्या संघटनां होत्या त्यांनी छत्रपतींचे फोटो लावून भगव्या झेंड्याचा आधार घेऊन मुंबई "मराठी" माणसाची आहे असं बोलून तुम्हा आम्हाला याच मुंबईतुन बाहेर घालवलं. 

कारण वर नमूद केल्याप्रमाणेच आपला समाज "खुल्या" गटात मोडतो जो फक्त वरूनच खुला आहे आतून गटबाजी आणि फ़ंद फितुरीने आपल्या समाजाला वर्षोनुवर्षे ग्रासलेलं आहे याचा इतिहास सर्वश्रुत आहे. 

सध्या अनेक व्हाट्सअँप ग्रुपवर मी गेले काही दिवस आरोप प्रत्यारोपांचे मेसेंज पाहतोय. आजही कित्येक कार्यकर्ते आपल्याला एखाद पद मिळावं आणि आपला फोटो गावाबाहेरील अथवा तत्सम एखाद्या चौकात बॅनरवर दिसावा एवढ्यातच धन्यता मानतात. त्यानंतर संघटना कशी बांधावी नवीन कार्यकर्त्यांना कस तयार करावं, संघटनेचा प्रॉपगॅन्डा काय आहे? मुळात कोणत्याही संघटनेचा आत्मा त्या संघटनेची संहिता असते. आज मी छाती ठोकपणे सांगू शकतो की ग्रुपवरील अर्ध्या आधिक लोकांना संघटना कशी चालते तिची  मूळ उद्दिष्ट नक्की काय आहेत हेच मुळात माहिती नसतं ? आणि या सर्वांचा विपर्यास म्हणजे अण्णांच्या आंदोलनाचं नंतर काय झाल हे आख्या भारताला माहिती आहे.

गेले पाच महिने अक्खा महाराष्ट्रा फक्त कोरोना, सुशांत सिंग राजपूत, कंगना आणि तत्सम मुद्यांवर अडकलाय आरक्षणा सारख्या मुद्द्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली हीच मुळात मोठी बातमी आहे पण तत्सम विकाऊ प्रसार माध्यमाना त्याच काही एक सोयर सुतक नाहीये. आणि मुळात हे वरील सर्व मुद्दे तुम्हाला आम्हाला मूळ ध्येया  पासून भरकटवण्यासाठीच  आहेत. मुळात हे बॉलिवूडवाले काही आपलं घर चालवत नाहीत. उलट आपल्यामुळेच  ह्यांचं घर चालत. मग यांच्या बाष्कळ बडबडी, लफडी आणि सरंक्षणासाठी आख्खी यंत्रणा कामाला लावायची आणि मराठा आरक्षणा सारखे मुद्दे ज्याच्या निर्णयावर लाखो कुटुंबाचे डोळे लागलेत त्याला बासनात गुंडाळुन बाजूला ठेवायचा हा कोणता द्रष्ठेपणा? 

त्यात हे मुजोर नेते ज्यांना आपणच भाई, दादा, युवराज ह्या उपाध्या देऊन डोक्यावर बसवलय जे मतांची भीक मागायला दारात येतात आणि निवडून आल्यावर तुमचं माझ एखाद काम घेऊन गेल्यावर आपल्याला  त्यांच्या PA  कडे भीक मागायाला लावतात. मग साहेब काम करनार वितभरआणि दाखवनार हातभर आणि नंतर मिरवणार "करुन दाखवल म्हणून" मुळात आपलंच थुकून चाटणारी ही जात तिच्यावर काय भरवसा ठेवणार?

 तर थोडक्यात आटोपत घेतो, आता वेळ आलेली आहे सर्व राग रोष, हेवे दावे बाजूला ठेऊन खांद्याला खांदा लावून आरक्षणाची हंडी फोडण्याची. आपल्याला आपले आचार-विचार आणि कार्यशैली "ओपन" ठेऊन समाजाला "आरक्षण" मिळवून द्यायचं आहे. 

                                                                चूक भूल देणे घेणं नसावं!


आपलाच एक मराठा लाख मराठा!



No comments: