Featured Post

रोज मरे........

नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० चा गजर लाऊन ७.३० लाच उठलो, अर्थातच आजही व्यायाम करायचा राहीला होता. डोळे चोळत असतानाच डो़क्यात जो काही विचार पहीला आ...

Wednesday, February 24, 2010

तुला पाहताच मी...

आपल्या आयुष्यातील प्रिय व्यक्ती कोण? हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न, हा पण ही व्यक्ती कोणीही असु शकते. उदा. जवळचा मित्र/मैत्रीण, प्रियकर/प्रेयसी, नवरा/बायको, भाऊ/बहीण अगदी आपले आई/बाबा सुद्दा व कशाचीही अपेक्षा न करता ही व्यक्ती आपल्यावर निर्व्याज, निस्वार्थ प्रेम करत असते. कशासाठी.....? अर्थात आपल्याच उत्कर्षासाठी. कधी-कधी आपल्याला ते जाणवतेही, पण गळ्यापर्यंत आलेले शब्द तसेच अडखळुन पडतात. कारण तिच्या निष्पाप प्रेमापुढे शब्दही थिटे पडतात व नकळतच अंतकरणातील पटलावर उमटु लागतात ते असे........................

तुला पाहताच मी
शब्द आज गोठले,
अजुन बंद ओठ हे,
न बोलताच उमटले........ ॥ध्रु॥

वास तु सहवास मी,
आभास तुच भास मी.
न झाकताच पापण्या,
नयन आज झडपले..........॥१॥

हर्ष तु उल्हास मी,
स्पर्श तुच आस मी.
न शोषताच रुधिर हे,
ह्रुदय आज धडकले...........॥२॥

वेळ तु अवेळ मी,
नाळ तुच बाळ मी.
न मांडताच डाव हा,
खेळ आज बहरले............॥३॥

शक्त तु अशक्त मी,
अव्यक्त तुच व्यक्त मी
न संचित नभात या,
मेघ आज बरसले.............॥४॥

निस्वार्थ तु स्वार्थ मी,
अर्थ तुच व्यर्थ मी.
न दाटताच कंठ हा,
बाष्प आज खळकले..........॥५॥

तीर तु कमान मी,
धीर तुच उधान मी.
न सोडताच जीव हा,
प्राण आज हरपले...................॥६॥



-श्रीमत्
(महेन्द्र लक्ष्मण कदम)

3 comments:

Anonymous said...

मस्त :)

Mahendra kadam said...

thnaks suhas

Anonymous said...

VERY NICE
PRAMIT