आप-आपल्या गाडीत पट्रोल भरल्यानंतर सर्वजन ढाब्याच्या दिशेने निघाले. आता मात्र सर्वांनाच सनकुन भुक लागली होती. त्यामुळे काही करुन लवकरात लवकर तेथे पोहचायचे आणि मिळेल त्याचा फडशा पाडायचा असे एकंदर सर्वांच्या चेहर्यावरुनच वाटत्त होते. इनायतचा तर चेहरा शंभरच्या बल्बसारखा तळपत होता, तर तेजस मात्र गुर्हाळाच्या बैलासारखा गाडी रेमटवण्यात मग्ण होता, बहुतेक कोणत्या कोणत्या पदार्थांवर ताव मारायचा या विचारात तो असावा. गणेश आणि दिपकची परीस्तिथी जरा बिकट वाटत होती, ते आत्ताच उपोषणातुन उठलेल्या कार्यकर्त्यांसारखे दिसत होते. तर सुश्यांत मात्र झाल्याप्रकारामुळे थोडासा शांतच बसला होता. महेशला तर कधी एकदा घरी जातोय आणि बिछान्यावर अंग टाकत्तोय अस वाटत होते. त्यात उजव्या हाताच्या तळव्याला लागल्यामुळे त्यास एक्सलेटर देताना बराच त्रास होत होता आणि गुडघाही चांगलाच ठणकत होता. पेट्रोलपंप सोडुन एक पंधरा मिनिटे झाली असतील कि अचानक अज्ञात मारुती कार ने महेशच्या गाडीला उजव्या बाजुने दाबले, हे सर्व इतक्या वेगात घडले की महेशला गाडीच कंट्रोल झाली नाही. काहीसं गांगरुन त्याने पुढचा डिस्क दाबला, ब्रेक इतका अर्जंट होता की बाईकचं पुढचं चाक जागेवरच स्किड झाल व काही कळायच्या आतच दोघेही (सुश्यांत आणि महेश) रस्त्याच्या खाली फेकले गेले. सुदैवाने रस्त्याच्या दोन्ही बाजुला बर्यापैकी गवत होते, दोघेही त्या गवतात जाऊन पडले. महेशला असे पुन्हा पडलेले पाहुन तेजस आणि गणेश दोघांनीही आपल्या गाड्या जागीच थांबवल्या व ते दोघांना उचलण्यासाठी धावले. बाजुनेच गावातील काही महीला पाणी घेऊन जात होत्या त्यांनीही त्यांच्या दिशेने धाव घेतली. महेशच्या डोळ्यांसमोर भर दुपारी काजवे चमकायला लागले. त्याने हळुच आपले हेल्मेट काढले व एक नजर पुन्हा तो स्वतालाच न्याहाळु लागला, तेव्हा त्याला असे आढळले की अर्ध्यातासाभरापुर्वीच हाताला जे बॅंडेज केले होते त्यातुन आता पुन्हा रक्त वहायला लागले होते. तसेच खालचा ओठ दातांखाली चिमटल्यामुळे तोंडातुनही थोडेफार रक्त वाहु लागले. याउलट सुश्यांत ने प्रसंगावधान ओळखुन आधीच उडी घेतल्यामुळे त्याला अजिबात लागले नव्हते. झाला प्रकार तेजसने अगदी जवळुन पाहीला असल्यामुळे तो तावातावात त्या कारवाल्या इसमास शिव्या घालत होता. तेवढ्यात जमलेल्या बायकांपैकी एका मध्यम वयाच्या बाईने महेशला आणि सुश्यांतला आपल्या जवळील पाणी पा़जले व आपुलकीने तीने त्यांची विचारपुस केली. तीचे ते शब्द ऐकुन महेशला निघतानाचे आईचे शब्द आठवले, खरच आपल्या पालकांची मुलं अशी लांब गेलीत की काय विवंचना होत असेल्? या नुसत्या विचारानेच त्याच्या अंगावर शहारा आला. आता कधी एकदा घरी जाउन आईला भेटतोय असं त्याला वाटत होते. तेवढ्यात दुसर्या बाईने गणेशला सांगितले "बाबांनो जरा जपुन गाड्या चालवा. आधीच ह्या रस्त्यावर भरपुर अपघात होतात. कित्येकदा असं तरुन पोरांना विव्हळताना पाहील कि वाईट वाटतं. तरी तुमच नशीब बलवत्तर म्हणुन थोड्यावरच भागलं, जीवाला जपा, आमच्या लेकरासारीचं तुम्ही"
इकडे इनायत ने बाईक उभी करुन साईड स्टॅंडवर लावली व तो महेश जवळ आला, "क्या dude क्या हुआ?" "अरे कुछ नही यार, मै सीधे ही जा रहा था, इतने मै उसने ने पिछेसे आके मुझे अंदर दबा दिया. साला आज नसीबच खराब आहे." महेश दुखर्या आवाजात बोलला. यावर सुश्यांत काहीसा चिडक्या आवाजात बोलला, "काही नाही रे तु मगाशी झालेल्या प्रकारामुळे जरा बिथरला होतास व त्याच भीतीमुळे तुला गाडी कंट्रोल नाही झाली", त्याच्या या वक्तव्यावर महेश तशा अवस्थेथ देखील चिडला, "अरे भीती कसली गेल्या दोन वर्षात रो़ज अंधेरीला अप डाऊन करतो तेव्हा साध घसपटल सुद्धा नाही. आणि बहुतेक तु विसरलास, तुझ्ह्या गावी आपण ह्याच रस्त्यावरुन गेलो होतो तेही भर पावसांत. तेव्हा तर सलग तेरा तास गाडी मी एकट्यानेच चालवली होती." महेशला असे चिडलेल पाहुन दिपक पुढे झाला "अरे ठिक आहे. आता एकमेकांची माप काढण्यापेक्षा आपण लवकरात लवकर घरी कसं जाता येईल ते पाहुया." "महेश मला वाटते तुझा टाईम आज जरा वाईट आहे त्यामुळे आपण आता आपल्या जागा बदलुया तुला काही प्रोब्लेम?" गणेश ने विचारले. "नाही यार मला आता ड्राइव्ह करण शक्यच नाही, पण आधी बाईक चालु आहे का ते पहा." ते ऐकुन बाईक जवळ उभ्या असलेल्या तेजसने सांगितले, "गाडी ओके आहे फक्त इंजिनचा जरा वेगळा आवाज येतोय, तो काय सर्व्हिसिंग केलं की होईल व्यवस्थीत." फक्त आता गाडी चालवणार कोण हा यक्ष प्रश्न? अखेर सर्वांच्या संमतीने ही जबाबदारी ईनायतवर सोपवण्यात आली. त्यानेही ही ती जरा आढवेढे घेतच स्वीकारली. तेही रास्तच होतं आधीच एकाच गाडीचा एकाच दिवशी दोनदा अपघात, त्यात ज्या व्यक्तीला pulsar ह्या गाडीविषयी पहील्यापासुनच अनास्था त्याच्यावरच तिला घरपर्यंत नेण्याची जबाबदारी. सारं काही न उलगडनारं. खरचं नियतीने पुढे काय वाढुन ठेवलं असेल ह्याची कुणालाच कल्पणा नव्ह्ती.
थोड्याच वेळात सर्वजण ढाब्यावर पोहचले. ढाबा तसा छोटासाच होता पंरतु नीट नेटका होता. आत मध्ये शिरताच गाड्या उभ्या करण्या-साठी जागा, बाहेर बाकडे मांडलेले आणि जोडीला टिपीकल पंजाबी जेवणाचा वास ह्या सर्व वातावरणात तेजस मुग्ध होऊन गेला. बहुतेक त्याला सर्व गोष्टींचा विसर पडला असावा अगदी महेशला लागलय हे ही. त्याने घाई-घाईत आपली गाडी पार्क केली व महेशला तश्याच अवस्थेत सोडुन तो आणि ईनायत बाकड्यांर पळाले. गणेश मात्र सुश्यांतला आपल्या बरोबर घेऊन आत गेला झाल्या प्रकारामुळे तो जरा बिथरलाच होता. तर ईकडे दिपक महेशजवळ येऊन उभा राहीला "दुखतय का जास्त?" दिपकने विचारले "जाऊ दे रे, त्या दुखन्यापेक्षा त्याच्या बोलण्याने जास्त दुखावलोय मी. असा कसा वागु शकतो तो, अरे मी काय काल परवा गाडी चालवायला शिकलोय? काय तो म्हणे मी घाबरलो अरे असं असत ना तर पहील्यावेळी पडलो ना तेव्हाच गाडी घेतली नसती मी हातात" महेश मोठ्या आवाजात बोलला. यावर सुश्यांतनेही तिकडुन री ओढली "तुझ हे नेहमीचच आहे, जरा तुझा ईगो हर्ट झाला की बसायच ताठुन, कळतय कुणाला राग आलाय तो." "अरे इथे मला इजा झाली आहे आहे आणि तुला कळवळण्याचे कारण नाही. आणि तुझे फाल्त्तु टोमणेही नकोत ह्याच्यापुढे. क्रुपा करुन माझ्या गाडीवर बसु नका म्हणजे मी जो काही पडेल(घाबरुन किंवा चुकुन) तो माझ्या नशीबाने" महेश तावातावात बोलला. "बर झाल सुंठेविना खोकला गेला, नाहीतरी इथे कुणाला हॉस आहे दहा वेळा पडुन घेण्याची". त्याच्या या बोलण्यावर मात्र इनायत काहीसा हसला. हे पाहुन महेशने त्याच्याकडे रागात पाहीले तसा तो गप्प बसला पण सुशांतचा मात्र त्याला मनापासुन राग आला होता. एवढ्यात गणेशने मध्यस्थी केली व तो सुशांतला म्हणाला "पाटील तो काय मजा म्हणुन पडला नाही. एखादा दिवसच खराब असतो त्यात तुझ नशीब बलवत्तर की तुला फक्त खरचटलय त्याला तर लागलं ही आहे. आणि गाडीही दोनदा पडली जरा त्याच्या परिस्तीथीचा विचार करा" यावर मध्येच अपेक्षेप्रमाने तेजस बोलला "जल्ला पक्के लहानपणीचे मित्र शोभतात. आता भांडतील नी उद्या परत एक होतील. खरच ह्यांचा काही नेम नाही" आणी बहुतेकवेळा असच झाल असल्या-मुळे दोघांनीही एकमेकांडे पाहीले व हळुच दोघेही एकमे़कांकडे पाहुन हसायला लागले. हे पाहुन दिपक बोलला "ये हुयी ना बात आता जेवायला हरकत नाही" यावर इनायत म्हणाला "साला जल्दी से मंगाओ, नही तो मै भुक से तडप के मर जांऊगा" तर तेजस मात्र पदार्थांची सुची वाचण्यात दंग झाला होता. ह्या सर्व गोंधळात जेवणाची ऑर्डर घेणारा पोरगा केव्हाचा बाजुला येऊन उभा राहीला होता.
थकलेले असल्यामुळे महेश सोडला तर सर्वांनी जेवणावर येतेच्छ ताव मारला. महेशच्या ओठांना दात लागुन जखम झाली असल्यामुळे त्याने थोडासा डाळ भातच खाने पसंद केले. आलेली मरगळ झटकावी म्हणुन त्याने तोंडावर सोड्याचा प्रयोगही केला तेव्हा कुठे त्याला थोड बर वाटायला लागलं. जेवणानंतर गणेशने जमलेल्या कॉंन्ट्रीब्युशन मधुन खाण्याचे बिल पेड केले आणि सर्वांनी आपला मोर्चा बाजुच्याच पाणपट्टीच्या गादिवर वळवला. गणेश, दिपक आणि इनायत ने पान खाने पसंद केले, तर सुश्या आणि तेजस ने थोटुक पण महेश मात्र दुखर्या तोंडामुळे यापैकी कशाचाच आस्वाद घेऊ शकत नव्हता. एव्हढ्यात दिपक म्हणाला "आयला आता इथेच झोपावस वाटतयं". "वाटतय? कशावर? पाट्यावर की मिक्सर मध्ये" तेजस खुश होउन बोलला. "ए हसा रे हसा" दिपक सर्वांना उद्देशुन म्हणाला आणि तेजस सोडला तर सर्वजण मोठ्याने हसायला लागले. "हा यार कंटाळा तर आलाय पण काय करणार संध्या़काळी लक्ष्मी पुजन आहे. कोनत्याही परिस्थीतीत आपल्याला सातच्या आत घरात गेल पाहीजे." गणेश जांभयी देत म्हणाला यावर सर्वजनांनी होकार दर्शवला. "ए मी मात्र आता कुठेही थांबणार नाही. दोन तासात मुंबई ट्च" तेजस तोर्यात बोलला. यावर महेश म्हणाला "बाबा सांभळुन. आधीच माझा दिवस खराब आहे आणि ह्याच्या पुढे काही झालं तर माझी सहन करण्याची अजिबात इच्छा नाहीये" (कारण आधीच ठरल्याप्रमाणे महेश त्याच्या मागे बसणार होता). तेवढ्यात सुश्यांत महेशच्या जवळ आला, "sorry यार मगाशी जरा जास्तच बोललो", "अरे कशाला मी काय कमी शेन खाल्ल" महेश बोलला "जाऊ दे विसरुन जा, पण खर सांगु कसलीतरी विलक्षन जाणीव मला गडावर असल्यापासुनच होत होती पण त्याचा उलगडा होत नव्हता, आणि त्यानंतरच हे पडझड सत्र सुरु झालं. जसा एखादा उथळ घोडा आपल्या पाठीवर कोणालाच स्वार होऊ देत नाही तसचं काहीसं माझ्या बाईकच्या बाबतीत घडतय आज." "ए प्लीज, डरा मत तेरी गाडी को मुझे चलाना है वो भी बंम्बईतक. एक तो पहलेसेही ये गाडी मुझे पसंद नही है. साला खाली दिखती अच्छी है लेकिन कब धोका दे इसका गॅरंटी नही" यावर त्याला धीर देत तेजस बोलला "अबे साले तु तो छावा है गाडी चलाने मे" यावर दिपकने ही इनायत गाडी कशी छान चालवतो याची पावती दिली. त्यांचा आपल्याविषयीचा कौतुक समारंभ ऍकुन इनायत शहारला. त्याच्याकडे पाहुन असे वाटत होते की त्याला आता विमान जरी दिले असते तरी तो पायलटच्या सीटवरच बसला असता.
(क्रमशः)
Featured Post
रोज मरे........
नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० चा गजर लाऊन ७.३० लाच उठलो, अर्थातच आजही व्यायाम करायचा राहीला होता. डोळे चोळत असतानाच डो़क्यात जो काही विचार पहीला आ...
Thursday, July 30, 2009
Wednesday, July 29, 2009
खरंच सांग काय वाटते
एक तरुण आहे ज्याला एक मुलगी फार मनापासुन आवडते, दोघांचीही एकमेकांशी नेहमी नजरा-नजर होत असते. न बोलुन दोघेही मनांने भरपुर काही बोलुन जातात. तिच्यासाठी काहीही करण्याची त्याची तयारी असते. तिच्या मोहक रुपाने आणि सोज्वळ स्वभावाने त्याच्या मनाची चलबिचल अवस्था झाली आहे; पण हे सर्व त्याला तिच्या समोर व्यक्त करता येत नाही आहे. त्यामुळेच त्याने तिला काव्यरुपी साद घातली आहे ती अशी -
खरंच सांग काय वाटते
माझ्याकडे पाहुन
तुझ्यासाठी सर्वथा हा
जीव घेतलाय वाहुन
मोत्यावानी खळखळनारं
शुभ्र तुझ हसणं
चंद्राकार भुवया ताणुन
रोखुन माझ्याकडे बघनं
धारोष्ण दुधात न्हाऊन
निघालेले काळेभोर डोळे
जिव्हा तुझी अशी की
जणु गोड मधाचे पोळे
लाजाळुसारख्या झुबकेदार पापण्या
क्षणात चटकन मिटतात
लांबसडक कुंतला तुझ्या
घायाळ मला करतात
सोनचाफ्याच्या कळीसारखे
नाक तुझे नाजुक
लोण्यासही लाज यावी
असे गाल मऊ साजुक
गुलाबाच्या पाकळीसारखे
ओठ तुझे लाल
कमनीय बांधा, मोहक चाल
करते मला हलाल
खरंच सांग काय वाटते
माझ्याकडे पाहुन
तुझ्यासाठी सर्वथा हा
जीव घेतलाय वाहुन.............................!!!!!!
- श्रीमत् ( महेंन्द्र लक्ष्मण कदम)

Tuesday, June 23, 2009
आणीबाणी - शेतकऱ्यांच्या व्यथा
आपल्या लहाणपणी आपण सर्वांनीच आणीबाणी हा शब्द इतिहासाच्या अथवा नागरिक शास्त्राच्या पुस्तकातुन अभ्यासला किंवा ऐकला असेलच. आणी-बाणी म्हणजे थोडक्यात काय तर बिकट परिस्तिथी हिच परिस्तीथी आजही आपल्या शेतकरी बांधवांना छळत आहे. दर पाच वर्षांनी नवीन सरकार आणी पुन्हा शेतकर्यांसाठी नवीन पॅकेजेस ज्याच्यात वीज, पाणी, कर्जमाफी सर्व असंत पण "कागदावरच" हे का चाललय ते आपल्या सर्वांना माहीत आहे. पण कुठपर्यंत चालणार आहे हे तर साक्षात विधात्यालाही माहीत नसेल. असो या सर्वांचा हा काव्यरुपी आढावा.
आणीबाणी जिंदगानी
हातावरल पोट त्यात सरकारी मनमानी
खिशात नाही दमडी त्यात छ्ळतो उर्मठ वाणी
आणीबाणी......
आणीबाणी जिंदगानी
पॅकेजं नवीन पण सवय ह्यांची जुनी
नळ आहे त्यात नाही पाणी
आणीबाणी......
आणीबाणी जिंदगानी
पोरांचा व्याप दु:खी कारभारनी
मिळकतच कमी म्हणुन सुरत आमची रोनी
आणीबाणी......
आणीबाणी जिंदगानी
काढलय कर्ज वाढलीयेत देणी
अहो आमचीच लोकशाही ठरली जीवघेनी
आणीबाणी......
आणीबाणी जिंदगानी
राज्य बळीच आम्ही मानसं गुणी
दिमत आमची कमी तरी हा शेतकरी मनानं धनी
आणीबाणी......
- श्रीमत् ( महेंन्द्र लक्ष्मण कदम)
आणीबाणी जिंदगानी
हातावरल पोट त्यात सरकारी मनमानी
खिशात नाही दमडी त्यात छ्ळतो उर्मठ वाणी
आणीबाणी......
आणीबाणी जिंदगानी
पॅकेजं नवीन पण सवय ह्यांची जुनी
नळ आहे त्यात नाही पाणी
आणीबाणी......
आणीबाणी जिंदगानी
पोरांचा व्याप दु:खी कारभारनी
मिळकतच कमी म्हणुन सुरत आमची रोनी
आणीबाणी......
आणीबाणी जिंदगानी
काढलय कर्ज वाढलीयेत देणी
अहो आमचीच लोकशाही ठरली जीवघेनी
आणीबाणी......
आणीबाणी जिंदगानी
राज्य बळीच आम्ही मानसं गुणी
दिमत आमची कमी तरी हा शेतकरी मनानं धनी
आणीबाणी......
- श्रीमत् ( महेंन्द्र लक्ष्मण कदम)
Wednesday, June 17, 2009
दु चाकी - भाग 7
एक अर्ध्या पाऊन तासातच सर्वजन ऊठले. आत्ता मात्र तेजसला चांगलीच तरतरी आली होती. "ए चला आता आपल्याला येथुन कलटले पाहीजे", "अरे वो ठिक है लेकिन मुझे जोरो की भुक लगी है." इनायत कळवळत बोलला. यावर गणेश बोलला "अरे थोडा सबर कर बच्चु, कारण आता पहीले ईथुन निघुया म्हणजे दोन अडीच तासातच आपण महडला पोहचु जेवणही तेथेच करु आणि मग मुंबईईईई.....". पण महेश मात्र शांतच होता, का ते त्याचे त्यालाच कळत नव्हते पण जड अंतकरणाने त्यानेही आपली पावले तेथुन वळवली. अजुनही त्याला तिथेच मंदिरात बसुन राहावेसे वाटत होते. गड उतरताना काही जास्त कष्ट लागले नाहीत. खाली उतरताच सर्वांनी थोडे पाणी प्यायले आणि पुन्हा पावंसात रायगडाला नक्की भेट द्यायची या निश्चयाने तिघांनीही आपल्या गाड्या काढल्या. आता महडमध्ये भेटायचे हे आधीच ठरले असल्यामुळे तेजस सवयीप्रमानेच तेथुन निघाला. मागुन महेश आणि गणेशने ही आपल्या गाड्या हाकल्या. रात्रभरचा प्रवास त्यात सकाळपासुनची भटकंती यामुळे महेशला विलक्षन थकवा जाणवत होता आणि इतरांचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती. उतरणीची वळने फार धोकादायक वाटत होती. गड सोडुन एक पाचंच मिनिटे झाली असतील कि महेशच्या गाडीचा हार एकाबाजुने तुटला, तो तसाच अर्धवट तुटलेला हार महेशने हाताने हिसका देऊन तोडुन टाकला. त्याचवेळी पुन्हा तीच जाणीव जी त्याच्या मनाचा मागोवा घेत होती, काहीतरी होणार आहे पण काय? गाडी चालवता चालवताच तो स्वत:च्या मनाशी हे सर्व विचारत होता. तेवढ्यात सुश्यांतने त्याला हटकले, "काय कदम असे अचानक एकदम गप्प झालात. तुझ्यासारख्या माणसाला बरं दिसत नाही", "नाही रे असाच जरासा थकवा आलाय." "थकवा ना मग ठिक आहे, मला आपल वाटल की घरच्यांची किंवा वहीणींची आठवंण आली की काय?" "च्यायला तुझ बर आहे, स्वतःच ठेवायच झाकुन आणि दुसर्याच बघायच वाकुन." (ह्सुन..)"राहील नाही विचारणार"
रस्ता चांगलाच उतरणीचा होता. त्यात एस्सल वर्ल्डची आठवण करुन देणारी वळने आणि रस्त्यावरचे डांबर. तर मी ईथे का आहे अशा अवस्थेत महेश गाडी अत्यंत सावधानीने चालवत होता, तर त्यांच्याच मागे गणेश रमत-गमत येत होता. आणि क्षणातच एका अत्यंत धोकादायक वळनावर महेशच्या बाईकचे पुढचे चाक स्किड झाले. बाईक जेमतेम वीस तीसच्या स्पीडला असावी नाहीतर दोघेही बाजुच्याच दरीत कोसळले असते. सुश्यांतला जेमतेम खरचटलं पण महेशच्या मात्र उजव्या पायाला आणि तळहाताला चांगलीच ईजा झाली. त्यांना असे अचानक पडलेले पाहुन गणेश ने आपली बाईक जागीच थांबवली व दोघांनीही (गणेश & दिपक) त्यांच्याकडे धाव घेतली. सुश्यांत या अचानक झाल्या प्रकाराने गांगरुन गेला, तर महेश त्याचा गुडघा पकडुन तसाच बसुन होता. गणेशने जवळ येताच आधी पडलेली बाईक सरळ केली यावर काहीसं चिडुन महेश ओरडला, "ए खजुर बाईकला नाही लागलय, मला लागलय" यावर गणेश म्हणाला "अरे बाबा धीर धर, मला बाईक मध्ये ठेवलेले फर्स्ट एड किट हवं आहे समजले", "ठिक आहे डॉक्टरसाहेब आता आणा लवकर". दिपक मात्र सुश्यांतला काही लागलय का हे चेक करत होता. सुदैवाने त्याला फक्त खरचटल होतं. इकडे गणेशने ही महेश च्या हाताला आणि गुडघ्याला पट्टी बांधली. परंतु पाय चांगलाच ठणकत होता, महेश तसाच उठला आणि लंगडत लंगडत बाईक जवळ गेला आपल्या लाडकीचा त्याला थोडासा रागही आला होता पण क्षणात त्यास वाटले अरे ती तर एक निर्जीव वस्तु आपण चालवणार तशी ती चालणार, आणि लगेचच तो कुठे काही तुटलय का वैगरे पाहु लागला परंतु नशीबाने फक्त साईड गार्डच जरासे वाकले होते व फ्रंटलाईट फेरींग घसपटले होते त्यामुळे तो थोडासा सुखावला. त्याही स्थितीत महेशला गाडी चालवणे भाग होते कारण सुशांत आणि दिपक या दोघांनाही बाईक चालवता येत नव्हती.
पंधरा वीस मिनिटातच दोघेही घाट उतरले. घाट उतरताच समोर तेजस चिंताग्रस्त अवस्थेत दिसला. त्यास दिपकने हटकले "काय शिलेदार असा डब्याला लागल्यासारखा चेहरा का दिसतोय?" यावर तेजस बोलला "अरे भाऊ तुला तर कुठेही विनोद सुचतो. दिसत नाही माझी बाईक उभी आहे ते." "का काय झाल?" गणेश ने विचारले. "अरे काही नाही पेट्रोल संपलय आणि इथुन पेट्रोलपंपही पाच सहा किलोमीटर लांब आहे", "अरे एवढचं ना, मग माझ्या फ्युएल टॅंक मधुन घे" महेश काहीशा दुखर्या आवाजात बोलला. यावर तेजसची नजर त्याच्या बॅंडेजवर गेली व त्याने त्याबद्दल विचारले असता गणेशने झाला प्रकार दो-घांनाही ऐकवला. सर्वांनी झाल्याप्रकारावर पुन्हा एकदा हळहळ व्यक्त केली. महेशला सर्वांनी धीर दिला आणि एकंदर त्याची स्तिथी पाहता त्याला त्रासही फार होत होता हे सर्वांना जाणवत होते परंतु त्याला गाडी चालवणे भाग होते, कारण सुशांत आणि दिपक सोडल्यास इनायतलाच गाडी चांगल्या प्रकारे चालविण्यास येत होती परंतु त्यास पल्सरबद्दल एक अवास्तव भीती असल्यामुळे त्याने नकार दिला. महडला पट्रोल भरुन झाल्यानंतर इनायतने तेथील कर्मचार्यांस विचारले "अरे भाई यहा कही अच्छा होटल है क्या?" "हा साहब है, लेकिन यहा से आधे घंटे की दुरी पर है और एक यहा बाजुमेही है लेकिन वहा आपको खाना इतना अच्छा नही मिलेगा." यावर तेजस म्हणाला "भाई खाईन तर तुपाशी नाहीतर राहीन ऊपाशी." "ए उपाशी आधी हॅ।टेलचे नाव तरी विचार" दिपक वैतागत बोलला यावर त्या इसमाने ते सिंग दा ढाबा असल्याचे सांगितले.

Wednesday, May 27, 2009
दु चाकी - भाग 6
"कस दिल रे ताक?" महेश ने विचारले, "पाच रुपये" बाबुने उत्साहाने सांगितले. "मग ठिक आहे, त्याआधी एक सांग वर कुठून म्हणजे कोणत्या वाटेने जायचे?" "हे बघा, ही जी समोरून वाटजाते ती हाय सोपी पण पोचायला दिड तास तरी लागल आणि एक वाट मागनं हाय जरा अवघड आणि झाडाझुड्पाची हाय, पण तीनं एक पाच-सहाशे पायर्या कमीबी होतील आणि तासाभरात गडावबी पोचु आपण." बाबुचे शब्द पुर्ण होतात न होतात सर्वजण एक सुरात म्हणाले, "आता गड सर करायचा तर मागच्या वाटेनेच हर हर महादेव,हर हर महादेव.." सर्वांनी चढाईस सुरवात केली. रात्रभर प्रवास करून सर्वांचे चेहरे अगदी शिनले होते; परंतु आता एकच ध्येय होत ते म्हणजे गड सर करायचा. सर्वात पुढे डोक्यावर कळशी आणि हातात ग्लासं गेतलेला बाबु आणि त्याच्या मागे हे सहाजण अत्यंत शिस्तीने पादक्रमण करत होते. एक वीस पंचवीस मिनिटातच तेजस ने धापा टाकायला सुरवात केली.
त्याला बघुन इनायत म्हणाला, "साले बोलता था ना ज्यादा फुका मत कर. साला जवानी मे तेरी ये हालत है?" "हा यार अभी ज्याते ही सब छोड दुंगा", यावर दिपकने मागे वळुन पाहीले व काहीसे वात्रट हसत म्हणाला, "वंदे वंदे आणि च्यु.... बनवायचे धंदे. गेल्या वर्षभरात याने दहा वेळा हीच प्रतीज्ञा केली, पण ज्याप्रमाने मुंगी साखरेचा वास काढत डब्यापर्यंत पोहचते त्याप्रमाणे हाही जेवल्यावर पानापट्टीवर पोहचतो. सुरवातीला रोज एक अशी कधीतरी ओढतो म्हणुन घ्यायचा आणि आता साला पाकीटच ठेवतो खिशात." त्यास जोड म्हणुन गणेशने री ओढली, "धुंवा धुंवा....धुंवाही धुंवा" तेजस मात्र असहायपणे धापा टाकत ऐकत होता. सुश्या आणि महेश मात्र बाबुचा इंटरव्ह्यु घेण्यात रमले होते. बाबु शाळेत सातवीला होता त्याच गाव तिथेच चालत दोन तासांच्या अंतरावर होत. घरचीपरिस्तिथी बेताचीच त्यामुळे सुट्टीच्या दिवशी हा इथे ताक विकुन पैसे कमवत असे तर आई वडील दुसर्याच्या शेतात मजुरीवर काम करत. घरी अजुन दोन भावंड होती, हे सर्व ऍकुन दोघांचेही चेहरे विषण्ण झाले. एकाच क्षणात त्यांना खेळण नाही मिळाल म्हणुन आई-वडीलांवर रुसणारी उलट बोलनारी मुल आठवली तर इथे आयुष्याचा खेळ चालावा म्हणुन झगडणारी मुल पाहायला मिळत होती.
एक तासाभरात सर्वजण नाना दरवाज्यापर्यंत पोहचले. दरवाज्याच्या आतील बाजुस पहारेकर्यांसाठी दोन लहान खोल्या आहेत त्यांस देवड्या म्हणतात. आत शिरताच गणेशणे "गो ब्राम्हण प्रतीपालक.....छत्रपती शिवाजी महाराज की जय!" अशी रोमांचकारीआरोळी ठोकली. सर्वजण विसावा घ्यायला तिथे थांबले. दोन ग्लास ताक रिचवल्यानंतर थोड फार फोटो सेशनही झालं. अशा प्रकारे थकत भागत, ताक पीत, शोर्य गीत बोलत, टिवल्या बावल्या करत एक दिड तासात सर्वजन गडावर पोहचले. गडावर पोहचल्याचा आनंद सर्वांच्या चेहर्यावर ओसांडून वाहत होता. सुश्या बोलला, "यार, आता पहीले फ्रेश होऊया नाहीतर अंगात फिरण्यासाठी त्राण उरणार नाही." तेजसची तर दातखिळीच बसली होती तो नुकत्याच डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णासारखादिसत होता. "अरे इथे कुठे पाणी आहे का?" दिपक ने बाबुला विचारले, "हो हाय की इथुन पुढेसरळ चालत गेलात की गंगासागर तलावाच्या बाजुला पिण्याच्या पाण्याचे नळ आहेत व आंघोळीचीही व्यवस्था आहे." "गेलात म्हणजे? तु नाही येणार आमच्या बरोबर?" "आलो असतो पण दिवसात कुठे तीन चार फेर्या खाली वर केल्या तरच सुटतात शे-दिडशे रुपये. तेवढाच आई-बाला आधार", एवढ बोलुन तो पाठमोरा झाला पुढच्या गिर्हाईकांच्या शोधात पुन्हा तीच आरोळी ताक घेणा..........र का ताक्क..........!
गणेश बसल्याजागीच पेंगत होता. त्याला दिपकने हलवले "साहेब ऊठा. दोन तासात आपल्याला गड पाहुन परतीच्या प्रवासावर निघायचे आहे." ते ऐकून सर्वांनाच भान आले. अर्ध्या पाऊन तासात सर्वांच्या आंघोळी झाल्या. ऊन बर्यापैकी जाणवत होत परंतु फ्रेश झाल्यामुळे सर्वांच्या चेहर्यावर तरतरी आली होती. आता पुढचा प्रवास्. गडावर पाहण्यासारखी एकूण पंचवीस ठिकाणे आहेत. खुबलढा बुरुज, नाना दरवाजा, मदारमोर्चा, पालखी दरवाजा, राजभवन, रत्नशाळा, राजसभा, नगारखाना, बाजारपेठ, शिकार पेठ, कुशावर्त तलाव, टकमक टोक, हिरकणी बुरुज, महादरवाजा, चोरदिंडी, गंगासागर तलाव, हत्ती तलाव, स्तंभ, मेणा दरवाजा, जगदिश्वराचे मंदिर, महाराजांची समाधी, वाघ दरवाजा आणि अत्यंत शोभनीय असे मेघडंबरी म्हणजे महाराज राजसभेत ज्या आसनावर बसत ती जागा. शिवकालीन सिंहासनहे बत्तीसमन सोन्यापासुन बनवले होते परंतु संभाजी राज्यांच्या म्रुत्युनंतर मुघलांनी ते काबीज केले. आता तेथे पंचधातुपासुन बनवलेले सिंहासन शासनाच्या क्रुपेने पाहायला मिळते.
संपुर्ण रायगडभ्रमण करुन सर्वजण शेवटी जगदिश्वराच्या मंदीरात पोहचले. ऊन चांगलच तापल होते, परंतु मंदीरात एक विलक्षण गारवा होता दर्शन घेतल्यानंतर सर्वांनी थोडा वेळतेथे घालवण्याचे ठरवले. बघता बघता पाचही जनांचा डोळा लागला. महेश मात्र थकलेल्या डोळ्यांनी कधी मंदीराच्यासमोरच दक्षिनेकडे असलेल्या समाधीकडे पाहात होता तर मध्येच गाभार्यातील शिवलिंगाकडे. कसलतरी विलक्षण दडपण त्याला जाणवत होत पण उलगडा मात्र होत नव्हता. त्याने पुन्हा आपला कटाक्ष गाभार्यातील पिंडीवर टाकला आणि या ऐतिहासिक वास्तुची जी काही हेळसांड झाली ती तो आठवु पाहत होता. तेव्हा त्याला जाणवले की कित्येक ठिकाणी दारुच्या बाटल्या, प्लास्टीकच्या वस्तु, फळांच्या साली इस्त:त पडल्या होत्या, त्यात भर म्हणुन प्रेमी युगुलांनी स्वताच्या नावाने रंगवलेल्या ऐतिहासिक जागा. बहुतेक त्यांना archies किंवा hallmark चे ग्रीटिंग्स परवडत नसावेत? तर काही ठिकाणच्या वास्तु पुढच्याभेटीत पाहायला मिळतील की नाही अशा कंडिशनमध्ये होत्या, जर स्वराज्याच्या राजधानीचीच ही अवस्था तर बाकीच्या गडकोटांचा विचार न केलेलाच बरा. यावरुन खरच शासनाच या सर्व गोष्टींकडे किती लक्ष आहे व महाराजांच्या कार्याविषयी खरंच किती आस्था आहे याची प्रचीती आली.

Tuesday, May 19, 2009
प्रिये देशील का मज एक मोका
प्रिये देशील का मज एक मोका
दुर सागरात उभी असेल आपली नौका ।
नौकेत आपण दोघे राजा राणी
गाऊ प्रेमाची बेधुंद गाणी ॥
प्रिये देशील का मज एक मोका
उंच झाडावर बांधेन तुजसाठी झोका ।
त्याच झाडावर बांधीन छोटस घरट
घरट्यात असेल आपलं चिमुकल कार्ट ॥
प्रिये देशील का मज एक मोका
नजराना देईन तुज सुंदर अनोखा ।
प्रेमाची भेट पाहुन गालात तु हसशील
काय सांगा हसता हसता आठवणही काढशील ॥
प्रिये देशील का मज एक मोका
औसेची रात्र दाटला अंधार काळोखा ।
त्या अंधारातही साथ मी तुझी देईन
चंद्र नाही तारा नाही पण काजवा म्हणुन प्रकाश देईन ॥
श्रीमत् ( महेंन्द्र लक्ष्मण कदम)

Monday, May 18, 2009
दु चाकी - भाग 5
महडला पोहचल्यावर सर्वांना हायस वाटलं. महेश म्हणाला, "काय मग कसं वाटल? होतं की नाही adventurous". "साल्या गप्प बस, गेल्या २४ वर्षात जेवढे नामस्मरण नाही केलं देवाचं तेवढे गेल्या तीन तासात झालय माझ्याकडुन, साला एके ठिकानी तर गाडी घातलीच होतीस पण नशीब बलवत्तर म्हणुन वाचलो आपण", सुश्या अत्यंत आगतिकपणे म्हणाला. "सॉरी यार पण त्या काळोख्या अंधारात आणि गडद धुक्यात तो ट्रक दिसलाच नाही मला, पण बाईक कंट्रोल केली ना! उगी आता रडायचं नाही हं हं हं हं..........", "नाही यार, पण रस्ता खरोखरच फार भयान वाटत होता, त्यात भर की काय म्हनुन ते रस्त्यावरचे बोर्ड, 'नजर हटी दुर्र्घटना घटी!', 'अपघात प्रवण क्षेत्र' आयला पार घाबरवुन टाकला आपल्याला", तेजस चे हे बोल ऐकुन दिपक मात्र मनोमन सुखावला, नाहीतर हा (तेजस) कुठे जाऊन आला की अशा काही बढाया मारायचा की ऍकनार्याच्या कानाचे पडदे दयेची भिक मागायचे.
"महाराज्यांच्या क्रुपेने इथवर सुखरुप पोहचलो; आता पाऊन एक तासातच किल्ले रायगड", चष्म्याच्या आत डोळे चोळत गणेश म्हणाला, तर इनायत मात्र पैसे देउन भाषण बघायला आलेल्या माणसांसारखा त्या पाच जणांचे बोल ऐकण्यात दंग होता. पहाटेचे साडे चार वाजले होते, गारवा फारच जाणवत होता, परंतु अतिउत्साहाने सर्वांनी त्या काकडत्या थंडीवरही मात केली. किल्ले रायगड महडच्या उत्तरेस मुख्य महामार्गापासुन आत २५ कि.मी वर आहे. मुख्य रस्त्यावरच दोन शिवकालीन सिंहस्तंभ येणार्या पर्यटकांचे स्वागत करतात. त्या दोन सिंह स्तंभाना पाहील्यावर सर्वांना एक अनोख स्फुरण चढले, त्यातच सुशांतने 'जय भवाणी जय शिवाजी' अशी रक्त सळसळवणारी नादमय आरोळी ठोकली आणि सर्वजन रायगडाच्या दिशेने कुच झाले. एक पाऊनएक तासातच सर्वजण पायथ्यानजीकच्या पाचाडात पोहचले, तेथुन डाव्याबाजुचा रस्ता थेट राजमाता जिजाऊंच्या समाधीकडे जातो तर उजव्याबाजुने सरळ वर गेल्यास किल्ले रायगड निधड्या छातीने स्वागतासाठी सज्ज दिसतो.
बाईक वरुन पुढे जात असताना सर्वांची नजर गावातील विहिंगम द्रुश्य अ:क्षरक्ष टिपुन घेत होती. सुर्यनारायन नुकतेच सह्याद्रीच्या डोंगर रांगातुन डोकाऊन पाहात होते. त्या त्यांच्या सौम्य तेजाने सारे आसमंत पिवळ्या केशरी रंगाने न्हाऊन गेले होते जनु काही एखाद्या निष्णात चित्रकाराने आपल्या कल्पनेच्या कुंचल्यातून कॅनव्हासवर रंग भरले असावेत. सगळीकडे झुंजूमुंजू झाले होते त्यात पाखरांचा चिवचिवाट, दारासमोरील रांगोळीचा सडा, गुरांचे हंबरने त्यांच्या गळ्यातील घुंगरांचा खळखळाट, गवताचा मन कासावीस करणारा वास हे सर्व बघता बघता सारे गडाच्या पायथ्याजवळ पोहचले.
समोरच एक उपहारग्रुह आहे तिथेच सर्वांनी आपल्या गाड्या पार्क केल्या आणि गरमागरम कट वड्यावर येथेच्छ ताव मारला. खाता खाताच दिपक बोलला "ए खाऊन जाल्यावर पहीले फ्रेश होऊया आणि मग चढायला सुरुवात करुया", तेवढ्यात हॉटेलमालकाने कळवले की तेथे पाण्याची थोडीफार टंचाई आहे तुम्हाला पाणी गडावरच मिळेल ते ऐकुन सुश्यांत बोलला "हा यार नाहीतरी आपला अवतार एकदम द्रुष्ट लागण्यासारखा झाला आहे. साला एखाद्या मुलीने पाहीले तर झालेली लाईन तुटायची",यावर सर्वजण हसले. "आणि हो पाण्याच्या बाटल्या इथुनच घेऊया. परत वर जाई पर्यंत पाणी नाही" गणेशने सुचवले व त्याच्या म्हणण्याप्रमाने सर्वांनी बाटल्या भरल्या आणि चढाईस सज्ज झाले. हॉटेलातुन बाहेर पडताच चार-पाच चॉदा पंधरा वर्षांची मुल हातात ताकाने भरलेली कळ्शी आणि ग्लास घेऊन धावत त्यांच्या दिशेने आली त्यापैकी एकाचे नाव विचारले असता त्याने बाबु असल्याचे सांगितले, "ओ दादा, ताक घेणार का? घेत असाल तर तुमच्या बरोबर वरपर्यंत येईन आणि गडबी फिरवीन, आणि ताक पित रहाल तर दम बी न्हाय लागणार". त्याचं ते एवढ्याश्या वयातल व्यवहारी कसब पाहुन सर्वांना फार कुतुहल वाटले.

Subscribe to:
Posts (Atom)