शाहु जिजाऊ ने स्वप्न पाहिले उद्याचे
पाद्शाही जुलूमातुन रयतेला मुक्त करण्याचे
निश्चय होता पक्का विचार होता सच्चा
राजे हे हिन्दवी स्वराज्य व्हावे हीतो श्रींची ईच्छा ॥
विधीलिखित व्हावे तैसेच झाले,
क्षीतिजकडेवरुण सुर्यनारायण उद यास आले
अरे अनेकांनी हिणवले सरदार का बिघडा हुआ बच्चा
राजे हे हिन्दवी स्वराज्य व्हावे हीतो श्रींची ईच्छा ॥
लाव्हयासही लाज वाटावी ऐसे निखारे रसरसले
द्ख्ख्नण ते जिंजी पर्यन्त भगवे फडकले ।
अरे ज्यांच्या पराक्रमामुळे आली भल्या भल्यांस मुर्छा
राजे हे हिन्दवी स्वराज्य व्हावे हीतो श्रींची ईच्छा ॥
आई भवानी क्रुपेने परिश्रमांचे चीज झाले
हर हर महादेव च्या गजराणे आसमंत दुमदुमले।
अरे ऐसा राजा व्हावा ही तर समर्थ सदिच्छा
राजे हे हिन्दवी स्वराज्य व्हावे हीतो श्रींची ईच्छा ॥
ऐसा गौरवशाली इतिहास आपुला साक्षी मावळ माती
ऐकुन सळसळते रक्त स्फुरते छाती ।
अरे ज्यांच्या पराक्रमामुळे फुट्ते आजही सह्याद्रीस वाचा
राजे हे हिन्दवी स्वराज्य व्हावे हीतो श्रींची ईच्छा ॥
॥ जय भवानी जय शिवाजी ॥
श्रीमत्(महेंन्द्र लक्ष्मण कदम)
1 comment:
uttam kavita
jai shivaji jai bhavani
Post a Comment