मराठी तितुका मेळवावा मराठी आपुला बाणा
मोडेल पण वाकणार नाही पाठीचा कणा ।
अरे चालच आपुली ऐसी कि थांबतात श्वास वळतात नजरा
राजा श्री शिव छत्रपतीस माझा मानाचा मुजरा ॥
कुलो क्षत्रिय गोत्र मराठी
उभारी मुकूट शिरी रेखीले शिवगंध लल्लाटी ।
अरे रुपच ऐसे गोमटे कि झाला सबंध मुलुख साजरा
राजा श्री शिव छत्रपतीस माझा मानाचा मुजरा ॥
जगदंब जगदंब मुखी चिंतन अभीष्ट
तळ्पली भवानी केले पारतंत्र्य नष्ट।
अरे ज्याच्या अट्टहासामुळे रयतेस मिळाला भाकर निवारा
राजा श्री शिव छत्रपतीस माझा मानाचा मुजरा ॥
किती ऐक येतील किती येक जातील
श्रींचे हे अखंड कार्य अबाधित राहील ।
अरे ज्यांस आजही पाहीले कि येतो अंगावर शहारा
राजा श्री शिव छत्रपतीस माझा मानाचा मुजरा ॥
श्रीमत् (महेंन्द्र लक्ष्मण कदम)
हे माझ्या मराठी बांधवांनो एक जुट व्हा
स्वाभिमान जागवा
ऐसे व्हावे ही तो श्रीं ची ईच्छा आहे.
No comments:
Post a Comment