Featured Post

रोज मरे........

नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० चा गजर लाऊन ७.३० लाच उठलो, अर्थातच आजही व्यायाम करायचा राहीला होता. डोळे चोळत असतानाच डो़क्यात जो काही विचार पहीला आ...

Tuesday, September 22, 2009

सांजवेळ

ज्याप्रमाणे दु:खांनंतर सुख त्याचप्रमाणे जळजळीत दाहानंतर रम्य अशी संध्याकाळ प्रत्येकाच्या आयुष्यात नेहमी येत असते. काहीचजण तिचा आस्वाद घेतात, तर काही जण हे काय नेहमीचंच म्हणुन माना फिरवतात. पण खरचं सांगु... प्रत्येक सांजेशी कोणाच्या ना कोनाच्या तरी आठवणी जोडलेल्या असतात. अगदी लहाणपणापासुन ते पहिल्या प्रेमापर्यंत... आणि तुम्ही कितीही मोठे झालात (पैशाने/वयाने) तरीही त्या तुम्हाला आल्या शिवाय राहत नाहीत. आहे की नाही गंमत या कातरवेळीची असो...........................


सांज समयी शांत नभी,
कोमेजल्या चोही दिशा,
रवी किरणांचे तेज मालवून
गहरुन आली गुढ निशा ॥ ध्रु ॥

मंद वेळी सुगंध मनी,
बेधुंद झाले अंतरंग,
पवनस्पर्श होता तनी,
हलकेच उठले नीर तरंग ॥ १ ॥

उदर - क्षुधा क्षमवुनी,
पाखरे परतली घरी,
आप्त भेटी मोहापायी,
भिरते नजर ही बावरी ॥ २ ॥

श्वेत मळुनी वात जाळुनी,
तेविला नंदादीप,
शुभं-करोती वदता मुखी
वसते लक्ष्मी आपोआप ॥ ३ ॥


श्रीमत्
(महेन्द्र लक्ष्मण कदम)

2 comments:

Anonymous said...

farach chhan ekdaum aavadli
asech lihit raha.

Anonymous said...

tumchya kavita ekdum sparshun jatat
- bhavana