Featured Post

रोज मरे........

नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० चा गजर लाऊन ७.३० लाच उठलो, अर्थातच आजही व्यायाम करायचा राहीला होता. डोळे चोळत असतानाच डो़क्यात जो काही विचार पहीला आ...

Saturday, September 28, 2024

Best Educational Laptop Under 15K on Amazon Great Indian Festival

 


Primebook S 4G, 2024(New, WiFi+4G) Android Based MediaTek MT8788 - (PrimeOS) 4G SIM Slot, Thin and Light Laptop (11.6 Inch, 1.065 Kg, Type C, USB, HDMI, MicroSD) (4GB/128GB eMMC Storage, Black)


Discover the Primebook S 4G: Your Perfect Companion for Work and Play

In today’s fast-paced world, having a reliable and versatile laptop is essential. Enter the Primebook S 4G, the latest innovation in portable computing for 2024. Designed for students, professionals, and anyone on the go, this sleek laptop combines functionality with portability. Let’s dive into what makes the Primebook S 4G a standout choice!

Key Features

1. Lightweight and Portable Design
Weighing just 1.065 kg and featuring an 11.6-inch display, the Primebook S 4G is incredibly easy to carry. Whether you’re heading to class, a coffee shop, or traveling, this laptop won’t weigh you down.

2. Versatile Connectivity
Equipped with WiFi + 4G capabilities, you’ll stay connected no matter where you are. Plus, with a 4G SIM slot, you can access the internet without relying on WiFi networks. Perfect for working remotely or streaming your favorite content on the go!

3. Powerful Performance
Powered by the MediaTek MT8788 processor, the Primebook S 4G offers smooth multitasking and efficient performance for all your applications. Whether you’re editing documents, browsing the web, or watching videos, this laptop handles it all seamlessly.

4. Ample Storage
With 4GB of RAM and 128GB eMMC storage, you’ll have enough space for your files, projects, and media. Plus, the option to expand storage using a MicroSD card ensures you’ll never run out of space.

5. Versatile Ports
The Primebook S 4G is equipped with a Type C, USB, and HDMI port, making it easy to connect to various devices and peripherals. Whether you want to hook up an external monitor or charge your devices, this laptop has you covered.

6. Operating System
Running on PrimeOS, a user-friendly Android-based operating system, you’ll enjoy a familiar interface with access to a plethora of apps. The seamless integration of Android apps enhances productivity and entertainment.

Why Choose the Primebook S 4G?

The Primebook S 4G is perfect for students looking for a reliable device for schoolwork, professionals needing a lightweight laptop for meetings, or anyone who loves to stay connected while on the move. Its combination of portability, performance, and connectivity features makes it an ideal choice for today’s digital lifestyle.

Conclusion

In a world where versatility and mobility are key, the Primebook S 4G stands out as an exceptional choice. If you’re in the market for a laptop that doesn’t compromise on performance while being easy to carry, look no further. Check out the Primebook S 4G today and elevate your computing experience!

Disclaimer

The information provided in this blog post is for general informational purposes only. While we strive to ensure that the content is accurate and up to date, we make no representations or warranties of any kind regarding the completeness, accuracy, reliability, or availability of the product described.

Any reliance you place on such information is strictly at your own risk. We may receive compensation for purchases made through links in this post. This helps support our blog and allows us to continue providing valuable content. Always do your own research before making any purchasing decisions.

To buy this product click here:




Friday, January 26, 2024

सातारा - पश्चिम घाटाला पडतोय प्लास्टिकचा विळखा.


सातारा - पश्चिम घाटाला पडतोय प्लास्टिकचा विळखा.

रांगडा निसर्ग, आल्हादायक वातावरण व चांगले रस्ते यामुळे शहरातील लोकांचा या ठिकाणी सतत वावर असतो. त्यात भरीस भर कास पुष्प पठाराला युनेस्को ने जागतिक नैसर्गिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केल्यानंतर इकडे येणाऱ्या लोंढ्यांमध्ये अजूनच भर पडली. भरीस भर अजिंक्यतारा, सज्जनगड, ठोसेघर,वासोटा, बामणोली आणि वज्राई धबधबा आहेच पाहण्यासाठी. 

वाढत्या (मॅरेथॉन, क्रिकेट) स्पर्धांचे आयोजनं, प्री वेडिंग शूट, अनियोजित वाढतं नागरिकीकरण आणि जोडीने वाढणारा पर्यटकांचा वावर यामुळे हि सर्व ठिकाण हल्ली गर्दीने गजबजलेली असतात. हि गर्दी येताना ना-ना तर्हेच्या गोष्टी आपल्या सोयीसाठी घेऊन येते आणि जाताना वडिलांची वतनदारी असल्याप्रमाणे घाणीचं साम्राज्य मागे सोडून जाते. नियोजित कार्यभाग साधुन  सोशल मीडिया वर फोटो किंवा रील्स टाकून झाल्या कि, ना आयोजकांना त्या निसर्गाचा सोयर-सुतक असतं ना त्यातील सहभागी स्पर्धकांना.

त्यातच हल्ली "भावा लाईफ मध्ये फक्त एन्जॉय करायचा संघटना" जबरदस्त ऍक्टिव्ह आहे यांना महागाई दर, बेरोजगारी, पर्यावरण, सामाजिक बांधिलकी असले काही बाही कळत नाही, मुळात त्यांच्या लेखी असे काही प्रॉब्लेम असतात याची जाणीवही नसते. तर हि होतकरू संघटना पार्ट्या करण्यासाठी नेहमी नव-नवीन निसर्गरम्य जागांच्या शोधात असते. यांची खासियत म्हणजे मजा करायला जिथे बसणार तिथेच घाण करनार, तिथेच दारूच्या बाटल्या फोडणार, सिगारेट ओढून झाली की उरलेल्या काड्यांनी रानात वणवा लावणार. गुटखा मावा खाऊन झाला कि पाकीट तिथेच फेकणार. ह्या अशा मस्करीत लावलेल्या वणव्यांमुळे पुर्ण इको सिस्टीम दणाणते, पिकांचं नुकसान होतं, सरपटणारे जीव-जंतु, पशुपक्षी  घरासकट जळुन मरतात. मोठं मोठ्ठाली झाडं मुळासकट जळुन खाक होतात. ज्याचा परिणाम स्थानिक ग्रामस्थांवर ज्यांनी आयुष्यभर मेहनत घेऊन हा रानमेवा जपलेला असतो आणि अर्थात निसर्ग चक्रावर होतो. 

कारण "Every Action Has Opposite Reaction! 

बाबांनो तुम्ही दारू प्यावी कि नाही गुटखा, तंबाखू, सिगारेटच व्यसन करावं की नाही याची चेतावणी त्या वस्तूंवर विक्रेत्यांनी दिलेली असते त्यात व्यसन करणे चांगले कि वाईट हा ज्याचा त्याचा वैयक्तिक मुद्दा. घटनेने प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्य बहाल केलंय पण मित्रांनो उघड्यावर घाण पसरवण्याच स्वातंत्र्य तुम्हाला कोणी दिल? मी असे कित्येक पांढरपेशे पाहिलेत जे चालत्या गाडीतुन खाऊन-पिऊन झालं कि रॅपर अथवा बॉटल खिडकीतून चुरगाळून बाहेर फेकून देतात आणि नंतर हेच महाभाग एसी मध्ये बसून ग्लोबल वॉर्मिंग,ओझोनला किती मोठठं भोक पडलंय आणि अंटार्टिका वरचा बर्फ कसा आणि किती वितळतोय यावर सो कॉल्ड चर्चा करनार बघा किती विरोधाभास आहे ते?.  

तसं प्रॅक्टिकली पाहायला गेलं तर प्लास्टिकचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनात नाकारू शकत नाही, मी स्वतः भरपूर साऱ्या गोष्टी प्लॅस्टीच्या वापरतो. पण प्रत्येकाने घरात पातळ प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरणं जर टाळलं व रोजच्या वापरात एखादी कापडी पिशवी घरच्याच जुन्या कपड्यांपासून शिवून घेतली तर छोटा का होईना फरक पडेल. रॅपर, बाटल्या वेष्टने इकडे तिकडे न फेकता गावा जवळच्या कचरा कुंडीत अथवा निर्माल्य कलशात टाकलीत तर निदान ती पुनर्वापर प्रक्रिया करणाऱ्या प्लांट पर्यंत पोहचू शकतील. 

कित्येकजण कर्मकांडात एवढे अडकलेत कि निर्माल्य कचरा प्लास्टिक पिशवी सकट नदीत अथवा समुद्रात फेकून देतात. अरे बाबांनो हार-फूले हा ऑरगॅनिक कचरा आहे तो घरच्या कुंडीत टाकला तर त्याच छान खत तयार होतं. आणि पाण्यातच टाकायचंय तर पिशवी काढुन टाका ज्याने करून जलाशयातले जीव तो खाऊन त्याच विघटन तरी करतील. गणपती विसर्जनात तर मी मूर्ती सकट संपूर्ण डेकोरेशन नदीत फेकून देताना पाहिलंय. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. तरी नशीब आता थर्माकॉल वर बंदी लावलीये. 

गेला बाजार आमच्या सारखे पर्यावरण प्रेमी मधून मधून बेडकासारखे डराव डराव करून येणाऱ्या परिस्थितीची जाणीव करून देतात पण "नगाऱ्याची घाई तिचे टिमकीचं काय?" या म्हणी प्रमाणे सर्व विषय पुन्हा बासनात गुंडाळावे लागतात.  

"वर नमूद केल्या प्रमाणे फेकून दिलेल्या घाणीत मुख्यत्वे प्लास्टिकचे साम्राज्य सर्वत्र पसरलेलं दिसतं. त्यात जास्त करून वापरलेल्या देशी- विदेशी दारूच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बॉटल्स, गुटखा आणि खाद्य पदार्थांची वेष्टने यांचा खच सर्रास पडलेला दिसतो. आज कित्येक जंगली प्राणी आणि जलचर अजाणतेपणे प्लास्टिक त्यांच्या पोटात गेल्यामुळे अथवा एखाद्या अवयवात अडकल्यामुळे दगावत आहेत."

नुसतं समर्थ मंदिर पासून कास तलावा पर्यंत किंवा कुर्णेश्वर बोगद्या पासून ठोसेघर धबधब्या पर्यंत रस्त्याने प्लास्टिक गोळा करत गेलात तर एक आठवडा कमी पडेल आणि निदान टनभर तरी प्लास्टिक आरामात गोळा होईल.

 हल्ली गुगल वर सर्रास  विचारला जाणार प्रश्न "प्लास्टिक पृथ्वीवर विरघळते का? तर त्याच उत्तर पुढीलप्रमाणे "त्यातील केवळ 9% कचरा पुनर्वापर केला जातो आणि 12% जाळला जातो. उर्वरित 79% लँडफिल किंवा वातावरणात कायमचा एका किंवा दुसर्या स्वरूपात तसाच राहतो कारण त्याचं विघटन होतं नाही.." 

हे सर्व होण्यामागची मुख्य कारणं "जनजागृतीचा अभाव, प्लास्टिक पुनर्वापराची अपुरी प्रक्रिया आणि स्थानिक प्रशासनाची उदासीनता. अश्या ढोबळ मुद्द्यांमुळे हा प्रश्न सद्या ऐरणीवर आला आहे. आणि ही कचरा वाढ अशीच चालू राहिली तर हा जागतिक वारसा इतिहास जमा झाल्यावाचून राहणार नाही.  

मी या लेखाच्या माध्यमातुन समस्त पठार बांधवाना साद घालतो की जमेल तसं जमेल त्या प्रमाणे हा निसर्ग जपण्याचा प्रयत्न करा. आज परमेश्वराच्या कृपेने आपल्याला सुंदर अश्या ठिकाणी जन्मभूमी मिळाली आहे. येणाऱ्या काळात माथेरान-महाबळेश्वर प्रमाणे आपल्या भागात पर्यटन व्यवसाय भरपूर वाढणार आहे रोजगाराच्या नव-नवीन संधी उपलब्ध होतील. त्यामुळे आपण या सर्व गोष्टींवर एकत्रित पणे वेसण घालू शकलो तर आपल्या मुलांना घरापासून दुर पुण्या मुंबईला प्रदूषित वातावरणात कर्ज काढुन घर घेऊन धकाधकीचं आजारी आयुष्य जगावं लागणार नाही. बाकी ह्या लेखातून मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत. चुक भूल माफी असावी.  


                   "आज निसर्गाला वाचवाल तर उद्या निसर्ग तुम्हाला वाचवेल."


Tuesday, April 7, 2020

जिंदगी...........

जिंदगी...........

रोज नई उमंग है 
ध्येय की खोज में 
खेद की सुरंग है 

आग है पेट में 
हात अभी तंग है 

आँख भरे सपनो में 
आशाएं बुलंद है 

नया दिन नया संग  
कई चेहरे कई रंग 

साथ चले राह में 
ताल भी तरंग है 

कभी हार कभी जीत 
फिर भी दिल मलंग है 
फिर भी दिल मलंग है 


श्रीमत,

Sunday, February 18, 2018

गोवा नाम ही काफी है! _GOA Trip Info



सळसळती लाट, सागराची गाज,
माडातली वाट, खुनावते आज,

Vagator



गोवा नाम ही काफी है! 

तुम्हाला कोनी विचारल, "काय मग यंदा कुठे आणि तुम्ही फ्क्त "गोवा" अस्स जरी उच्चारलात तर त्या व्यक्तीच्या चेहर्यावरती जे भाव उमटतात ते फक्त आनि फक्त गोव्याला जाउन आलेल्या व्य्क्तीलाच कळु शकतात. अपवाद फ्क्त पुणेकर. 😀😀 मी गोव्याला जाउन येन्याआधी भरपुर संकेत स्थळ पालथी घातली. पण मनासारखी माहीती हाती येत नव्हती आणि जी काही मिळाली तीही आपल्या बोलीभाषेत नव्हती. काही मित्रांना विचारल तर त्यांनी मला साऊथ गोवा, नॉर्थ गोवा असं काही बाही सांगितल. इथे मी आजही रेल्वे स्टेशन वर गेलो की पुढचा पत्ता विचारण्या आधी ईस्ट किंवा वेस्ट ला कस जायच ते आधी विचारुन घेतो. तिथे हा साऊथ आणि नॉर्थ गोवा मला कितपत सापडतोय हा जरा यक्ष प्र्श्नच होता. ते म्हणतात ना स्वता मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. या उक्तीप्रमाने आधी जाऊन आलो आणि आता मी पाहीलेला गोवा माझ्या नजरेतुन तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. 

तशी माझी यंदाची तिसरी वेळ गोव्याला जाण्याची. मी हे सेम वाक्य आमच्या पिताश्रींसमोर फेकल होत. तर मला म्हणाले तिकडे जाऊन दिवस रात्र दारु ढोसुन त्या उघड्या नागड्या बायका पाहाण्यापेक्षा तीनवेळा वारीला गेला असतास तर थोड का होईना पुण्य गाठी पडल असतं. कलयुग रे कलयुग इति अण्णा. मी म्हनालो अन्ना सौदर्या पाहणार्याच्या नजरेत असाव लागत. तुम्हाला नाही झेपणार पुढची शिवी ऐकायच्या आधी मी तिथुन सटकलो हे वेगळ सांगायला नको तर असो.

तिन्ही खेपेला मला उलगडलेला गोवा हा वेगवेगळा होता. गोवा म्हटल की सळसळती तरुनाई, फसफसणारी पेय, ऊसळता समुद्र आणि मासे. बस अजुन काय हवं. मला जर विचाराल तुमचा आवडता टाईम पास कोणता? तर मी सरळ सांगेन "समुद्र्किनारी मस्त शॅक मध्ये बसुन उसळत्या लाटांकडे पाहत हातातल्या चील्ड बियरचा आस्वाद घेने". डोक्यात ना कसला विचार ना कसली फिकीर. कधी कधी मेन्दुला आराम देनं पण फायदेशीर असत. नुस्त्या कल्पनेणेच गार गार वाटत नाही का?.

तर सर्वात पहिल तुम्ही गोव्याला नक्की कशासाठी जाताय हे ठरवा. गोव्याला कोनी, कधी आणि का? जावे यासाठी मी एक चेकलिस्ट केली आहे. यातील सर्व प्रश्नांची उत्तर होकारार्थी येत असतीत तर तुम्हाला गोव्याला जाण्याची नितांत गरज आहे असे समजावे.

१. नुकताच ब्रेकअप झाला असेल
२. बायको आणि बॉसच्या टोमण्यांचा कंटाळा आला असेल
३. रोजच्या दिनचर्येचा वैताग आला असेल.
४. आपल्या राज्यातली दारु व पेट्रोल परवडत नसेल. 
५. सर्वात महत्वाच विजय मल्याच घर सचिन जोशी ने नक्की घेतलय की नाही याविषीयी शहानिशा करायची असेल

आता गोव्याला कोणी जाऊ नये यांच्यासाठीही एक चेकलिस्ट आहे.

१. जे चुकिच्या समजुतींप्रमाने वारही पाळतात.
२. ज्यांची बायको "तुम्हाला माझी शपथ आहे" टाईप आहे.
३. जे माणुसकी हाच खरा धर्म आहे हे .विसरुन व्रत वैकल्य आणि पाप पुण्य यातच आपल भल मानतात.
४. जे स्वताच्या बायकोने अलका कुबल आणि दुसर्याच्या बायकोने मात्र कतरीना सारखे वागावे अशी अपेक्षा ठेऊन असतात.
५. ज्यांना मुळात गोवा हे स्वतंत्र राज्य आहे हेच अजुन माहीती नाहीये.

वरील सर्व मत लेखकाची वैयक्तिक आहेत उगाच पर्सनली घेऊ नयेत. कारण ज्या ला आला राग.......त्याला.....!😆😜😆😆😆😆😆😆😆

वर सांगितल्याप्रमाणे भौगोलीकरीत्या गोव्याचे दोन भाग पडतात. नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा. नॉर्थ गोवा त्यातील बिचेस, शॉपींग मार्केट्स, नाईट लाईफ, वॉटर स्पोर्टस आणि मदिरे साठी प्रसिध्द आहे तर साऊथ गोवा गोअन कल्चर, दुधसागर, फोर्ट्स, जुणे चर्चेस व मंदिरांसाठी प्रसिध्द आहे. 
मंगेशी मंदिर परिसर 



मंदिरासमोरील दीपमाळ  

त्यामुळे तुमच्या आवडी प्रमाणे तुम्ही राहण्याचा पर्याय निवडु शकता. जर बिचेस पाहायचे असतील तर नॉर्थ गोव्यात कॅन्डोलीम किंवा कलंगुट हा राह्ण्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकतो. कारण कॅन्डोलीम, कलंगुट, बागा, अंजुना व वागातोर हे बिचेस एकाच लाईन मध्ये आहेत. त्यात आपल्या आवडी आणि बजेट प्रमाने बाईक अथवा गाडी हायर करुन तुम्ही सर्व ठिकाने मस्त आरामात एक्सप्लोर करु शकता.  

जर साऊथ गोवा पाहायचा असेल तर पणजी अथवा दोना पावलो राहण्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकतो. त्यातही दुधसागरला जायच असल्यास सकाळी सहावाजताच निघालेल उत्तम कारण आता नवीन नियमांप्रमाणे फक्त २०० पर्यटकांनाच आत सोडला जाते. त्यामुळे वेळेत नाहीत पोहचलात तर हिरमोड होण्याचीच शक्यता जास्त. गाडीचे पैसे फुकट जाणार नाहीत कारण येताना तुम्ही मंगेशी टेंपल, स्पाईस गार्डन, सेंट फ्रांन्सिस चर्च आणि म्युझयम करु शकता. शक्यतो तिकडचे गाडीवाले पण तसच पॅकेज ऑफर करतात. तुम्हाला किती पॉईंट पाहायचेत यावर तुम्ही त्यांच्याबरोबर भाव कर शकता.मंगेशीला जायचं असेल तर मांसाहार व मद्यपान टाळावे त्यातही गुडघ्याच्या खाली वस्त्रे परिधान केलेली असतील तरच मंदिरात प्रवेश मिळतो. शेवटी आपल्या मंदिराचे पावित्र्य आपण नाही राखलं तर बाहेरच्यांकडून काय अपेक्षा बाळगणारं. 

जाण्यासाठीचा उत्तम वेळः नोव्हेंबर ते जानेवारी अखेर पण सिझन असल्यामुळे भाव जरा जास्तच चढे मिळतात. कारण जी एसी ड्बल ऑक्युपेन्सी रूम तुम्हाला इतर वेळी १५०० ते २००० मध्ये मिळते तीच तुम्हाला या काळात ३५०० ते ४५०० च्या रेंज मध्ये ऑफर केली जाते. त्यात सर्व रूम स्लॉट ऑनलाईन वेबसाईटवाले आधीच बुक करतात. त्यामुळे सेम हॉटेलची कॉस्ट वेगवेगळ्या वेबसाईट्स वर वेगवेगळी दिसते. म्हणुन नीट नियोजन केलत तर चांगल्या रेट मध्ये उत्तम रुम मिळु शकते. फॅमेलीसोबत जात असाल तर शक्यतो एसी रुम पहावा कारण गोव्याच वातावरण बारामाही उष्ण व दमट असतं सो बायकोच टेम्परेचर कुल मोड वर ठेवाल तर गोवा अजुन कुल वाटु शकतो अन्यथा नवरत्न तेल व डर्मी कुल बाळ्गणे इष्ट ठरेल. हॉटेल बुक करताना शक्यतो ब्रेकफास्ट इन्क्लुड करुनच घ्यावा. कारण बाहेर साध मसाला ऑम्लेट जरी खायला गेलात तरी ब्रेड्चे पकडुन १०० रु होतात. व सेट ब्रेकफास्ट घ्याल तर १८० ते २०० रु होतात तेही लिमिटेड म्हणजेच पाच सहा जण असाल तर एक्स्ट्रा चहा कॉफी पकडुन रोजचे हजार बाराशे सहज घुसतात.


सडाफटिंग लोकांनी सरळ एखादी डॉरमॅटरी अथवा बीच जवळील शॅक मध्ये साधी रुम पाहावी. ७०० ते १००० मध्ये आरामात चांगली खोली मिळते. सामान (स्वताचेच बरं का) फेकल की बोंबलत फिरायला मोकळं. 


Basilica of Bom Jesus


Inside View of the Church

Holy Jesus


फिरण्यासाठीः स्कुटी अथवा बाईक ३५० ते ५०० च्या रेंज मध्ये मिळतात. त्यात गाडी घेताना ती व्यवस्थित चेक करुन घ्यावी कारण आधी भरपुर लोकांनी ती घसटवलेली असु शकते. ब्रेक्स, क्लच, गिअर, इंडीकेटर्स नीट तपासुन घ्यावेत. ए्खादा स्क्रॅच अथवा डेंट पहिल्यापासुनच असेल तर संबधीत व्यक्तीला तिथल्या तिथे तो दाखवुन खातरजमा करुन घ्यावी. कधी कधी मुळ मालक व एजंट वेगवेगळे असु शकतात त्यामुळे शक्यतो गाडीचे फोटो काढुन मोबाईल मध्ये ठेवावेत. जेणेकरुन  वाहन परत करताना जर काही बिन बुडाचे आरोप झालेच तर त्या फोटोंचा पुरावा म्हणुन वापर करु शकता अन्यथा नाहक तुमच्या कडुन भुर्दंड वसुल केला जाऊ शकतो. अशा घटना भरपुर झालेल्या आहेत. कारण एक्साईट्मेंट मध्ये बर्याचदा या गोष्टी चेक करायच्या राहन जातात. आणि नंतर आख्या पिकनिकची आईझेड होते. शक्यतो गाडी हॉटेल वाल्यांच्या शिफारशी शिवाय बघावी अन्यथा वेटर्सचा कट पकडुन तुम्हाला पर डे ५०-१०० रु महाग पडु शकतात. आता हा सर्व खटाटोप ज्यांचे मेहनतीचे पैसे आहेत त्यांच्यासाठी. "वावर आणि पावर" वाल्यांच काय? मनात आणल तर ते रनगाडे घेऊन पण फिरु शकतात.😜😄

तुम्हाला हवं तर तुंम्ही गोवा टुरिझमच्या हॉप ऑन हॉप ऑफ बस सेवेचा लाभ सुद्धा घेऊ शकता. ह्या बसेस फुल्ली एअर कण्डिशन्ड असून त्यांच्या ओपन डेक वरून तुम्ही ३६० डिग्रीत गोवा पाहण्याची मजा लुटू शकता. अधिक माहितीसाठी खालील संकेत स्थळाला भेट द्या. 

GOA HIP ON HIP OFF OPEN DECK BUS FACILITY
Hop on Hop Off Bus  

आता थोड खाण्याविशयी,

टीप नं १- शक्यतो एकाच ठिकाणी बसुन बिल आणि पोट वाढवण्यापेक्षा फॉरेनर्स स्ट्रॅटेजी वापरावी. हे फिरंगी लोक एक-सवा तासाच्या वर एका शॅक अथवा हॉटेल मध्ये बसत नाहीत. त्यामुळे फायदा काय तर नव नवीन ठिकानं आणि तेथील फुड एक्स्प्लोर करता येत आणि पैसे ही तेवढेच जातात. 

टीप नं २- बियर चा पिंट शॅक मध्ये ८० ते १०० च्या रेंज मध्ये मिळतो. तर तोच पिंट दुकानात ४० रु ला मिळतो. चांगल्यात चांगल्या व्हिस्कीचा लार्ज पॅक हॉटेलात अथवा शॅक मध्ये १०० ते १२० पर्यंत मिळतो, पण त्याच व्हिस्की्चा आख्खा खंबा ५०० ते ६०० मध्ये येतो. त्यामुळे एकवेळची दारु बाहेरुन आणुन रुमवर ढोसली तरी बर्यापैकी पैसे वाचु शकतात चॉईस इझ युवर्स.

टीप नं ३- रात्रीचा डिनर लाईव्ह म्युझिक ऐकत करायचा असेल तर शक्यतो बॉलीवूड नाईट असा बोर्ड लावला असेल तरच जावे, अन्यथा "सांगतंय कैरं ऐकतंय बहिरं" अशी अवस्था व्हायची. इंग्लिश गाणी आवडणाऱ्यांसाठी अर्थातच "sky is the limit" भरपुर ऑपशन्स आहेत. पब्स मध्ये जायचं असेल तर टिटोस, कबाना, कोहीबा हे ऑपशन्स आहेतच. कोहिबाला वीकेण्डला जायचं असेल तर कम्पल्सरी शूज व प्रॉपर स्मार्ट कॅज्यअल्स परिधान करावेत.  स्लीव्हलेस अथवा थ्री फोर्थ असेल तर माजुर्डे बाउन्सर आत सोडत नाहीत. काही शॅकवाले सुद्धा वीकएंड पार्टीची व्यवस्था करतात. 

टीप न. ४- कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी लगेचच  मैत्री करू नका अथवा कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका . त्यातही मसाज वाले आणि पेडलर्स पासून सावधान अन्यथा दिल चाहता मधल्या सैफ सारखी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही. काही लोक तिकडे फुलटाईम गळ टाकूनच बसलेले असतात. मजेतला "म" गळुन सजेत रूपांतर व्हायला एक क्षण पुरेसा असतो. so be careful! 
Church of St. Fransis

Fort Aguada






काही सिलेक्टिव्ह खाण्याची ठिकाणें,

१. सुझो लोबो कलंगुट बीचवर- थोडं महाग आहे पण एकदा तरी ट्राय करायला हरकत नाही 
२. साई प्रसाद कलंगुट मॉलच्या मागे - पॉकेट फ्रेंडली आहे पण थोडं अस्वच्छ वाटलं 
३. आनंद रेस्टोरंट अँड बार वागातोर - फ्राईड फिश आणि थाळी छान मिळते.
४. रिट्झ क्लासिक पणजी - मस्त थाळी मिळते फक्त आपल्यात लग्नाच्या हॉल मध्ये जशी गर्दी असते सेम तशीच फिलिंग जेवताना येते. अगदी लोक कधी कधी चेअर च्या मागे पण उभे असतात. 😀

टीप- शक्यतो थाळी घेण्यापेक्षा वेगवेगळे पदार्थ ऑर्डर केलेत तर तेवढ्याच पैशात जिभेचे चोचले पुरवता येतात. कारण गोव्यात थाळी मध्ये चपाती येत नाही आणि फिश करी सोडली तर बाकीच्या भाज्या सवतीच्या लग्नाला आलेल्या बायको सारख्या फुगून असतात. 

बाकी वरील सर्व हॉटेल्सची माहिती झोमॅटो वर उपलब्ध आहेच. त्यात गोव्यात एक वेळ डॉक्टर भेटणार नाही पण बार आणि दारूची दुकान बाजू बाजूला भेटतील त्यामुळे खाण्या पिण्याची चिंता नसावी. 

Dona Paula Sea View
आगोडा फोर्ट व  दोना पावलोला शक्यतो संध्याकाळीच भेट द्यावी कारण दुपारच्या रणरणत्या उन्हात आजूबाजूच्या विहिंगम द्रुष्याचा नजारा ठरवुन सुद्धा घेता येत नाही. आगोडा फोर्ट ५. ३० नंतर बंद करतात.

Dona Paula (Ek Duje Ke Liye Spot)

Statue in front of Miramar Beach

Vagator Beach


कसे जाल- ट्रेन ने जाल तर थिविम अथवा मडगावला उतरुन व विमानाने जाल तर दाबोलीम एयर पोर्ट वर उतरून  प्राईवेट टॅक्सी अथवा बस ने इप्सित स्थळी जाऊ शकता.

टॅक्सी व बाइकचे  साधारण दर तुमच्या माहितीसाठी, 

खाली नमूद केलेल्या तक्त्यातील  रेट सीज़न प्रमाणे कमी जास्त होत असतात त्यामुळे 100-200 रू  वर खाली होऊ शकतात. यापेक्षा जास्त दर मागितल्यास सरळ-सरळ दुसरी टॅक्सी/गाडी पाहावी अथवा वाहतुक पोलिसांशी संम्पर्क साधावा. 




नॉर्थ गोव्यातील फेमस बीचेस: कलंगुट, बागा,वागातोर,आरंबोल, मँड्रेम, मोर्जीम, अंजुना
साऊथ गोव्यातील फेमस बीचेस: बेनोलिम, कोलवा, वार्सा, पालोलेम, माजोर्डा.

सर्वात महत्वाचं येताना विमानाने येणार असाल तर पाच लिटर दारू आणू शकता. 😜 आता प्लीज आनंदाश्रु  ढाळण्यापेक्षा जायची तयारी करा पटकन.



ज्यांच्या बरोबर हे क्षण मी मनसोक्त उपभोगले ते माझे सहयात्री माझे कुटुंब 
Thanks for being part of my life 

Sunday, June 4, 2017

मि. अँड मिसेस पाटील - धरनीकंप



वारः सोमवार, वेळः पहाटे ६ वाजता.
मी गाढ झोपेत असतानाच धान्न..धान्न..धान्न्न... अचानक जमीनीला हादरे बसायला सुरवात झाली. माझ्या मेंदुला काही कळायच्या आतच मी शेजारीच झोपलेल्या माझ्या साडेतीन वर्षाच्या छकुलीला कवटाळलं आणि शेजारच्या टेबलखाली जाऊन बसलो. बहुतेक भुकंप झाला होता. मला चटकन भुकंप झाल्यावर कसा वाचवाल जीव? या वायझेड चॅनलवरच्या कार्यक्रमाची आठवन झाली. मी लेकीला छातीशी कवटाळल आणि दोन्ही पाय गुडघ्यापर्यंत घेऊन भिंतीला टेकुन बसलो. अचानक झालेल्या प्रकारामुळे मुलगी पार गांगरुन गेली होती. तिच्या एकंदर चेहयावरचे भाव "ए पप्पाड्या तुला काही कळत की नाही?" असे सांगत होते. काही वेळातच हादर्यांचा आवाज बंद झाला. इतक्यात माझी लेक मला ढोमसत म्हणाली "ए पप्पा मला सोडनां मला मम्माकडे जायचय". "अरेरे मला एका क्षणात माझ्या अर्धांगिणीची जाणीव झाली. कुठे आहे ती? तिला पाहायला टेबला बाहेर आलो. पोरगी एव्हाना मला हिसके देऊन हॉल मध्ये पळाली होती.  



मी हॉलच्या दिशेने निघालो तसा परत धान्न धान्न...धान्न्न्न.....आवाज सुरु झाला. पाहतो तर काय आमच्या सौ रश्शीवरच्या उड्या मारण्यात गुंगल्या होत्या. आमच पासष्ठ किलोच धुड लीलया खालीवर जाताना पाहुन मगाशच्या हादर्यांचा उलगडा मला झाला. 

सौ नी ग्रे कलरचा लेगीन्स आणि वर पिंक कलरचा टी शर्ट घातला होता. केस एकत्र मागे ओढुन पोनी टेल घातली होती. एकंदर प्रेगन्सी नंतर वाढलेल्या वजनामुळे ती फीट कमी आणि फॅटच जास्त वाटत होती. मी न राहावुन बोलला काय गं आज सुर्य पश्चिमेला कसा? नाही म्हटल गेली दोन वर्ष ओरडत होतो. "व्यायाम कर "व्यायाम कर! पण तु जागची हलली नाहीस उलट मलाच बोलायचीस आधी स्वतःच पोट बघा, तुम्ही आता बदलात, तुमचं माझ्यावर प्रेमच राहील नाही, ऑफिसात फिगर वाल्या पोरी बघता आणि घरी येऊन मला ऐकवता. भेटली असेल कोणीतरी सटवी चवळीच्या शेंगेसारखी...नुस्ती च्यावच्याव...नाही म्हटल जे करतेस ते स्वागतार्हच आहे. पण अचानक हा बदल कसा काय झाला?

अहो काही नाही मला माझी चुक लक्षात आली. तुम्ही बिचारे सतत माझ्या मागे लागायचात पण मीच तुम्हाला काहीही बोलायचे. पण नाही, "मला आता व्यायामाच महत्व कळु लागलय". (एका दिवसात मी मनातल्या मनात) मला सौ बंदुकीच्या गोळ्या मधात बुडवुन डागतायत अस वाटु लागलं. चेहरा काहीसा हसरा करतच मी म्हणालो चला बर झालं देर आये दुरुस्त आये. ते सोडा हे पहा माझे नवीन शुज, (दोन्ही पाय जवळ करुन हात कटीवर ठेऊन फक्त डोळे शुजवर..एकदम रुक्मीनी अवतार) पुमाचे आहेत आणि ही बॅग नाईकेची. आणि हो आज दुपार पासुन मी चळवळकरांच्या स्पेशल वेट लॉस बॅचला जाणार आहे. तेही अन्युल सब्सक्रिप्शन मी केलय परवाच्या शनिवारी. अरे व्वा करत मी मनातल्या मनात या बाईने क्रेडीट कार्डला कितीचा घोडा लावला ह्याचे हिशेब करु लागलो.

बर मी आंघोळ करुन यतो, माझा टिफिन तर रेडी आहे ना? अहो म्हणजे काय, "हो पण आता नेहमीसारख तेलकट तुपकट आणि चमचमीत खायला मिळणार नाही, आमच्या सरांनी आम्हाला डाएट चार्ट दिलाय तोच आता घरात फॉलो होणार. आईच्यान हा सर म्हणजे नक्कीच कोणी तरी दिव्यात्मा असला पाहीजे. ज्या बायका उभ्या आयुष्यात आपल्या नवर्याच ऐकत नाहीत त्या एका दिवसात या सरांच ऐकायला लागतात. मला तर त्याच्याकडुन एखादा तावीज वैगरे मिळतो का ते पहाव अस वाटु लागल.
चला आता माझा वेळ खाऊ नका, तुमचा टीफिन आणि बॅग भरुन ठेवली आहे. आंघोळ करुन किचन मध्ये ठेवलेले ओटस खाऊन घ्या. माझे अजुन तीन सेटस बाकी आहेत. धान्न् धान्न..धान्न...परत रश्शी गिरणीच्या पट्याप्रमाणे फिरु लागली. मला उगाचच खालच्या मजल्यावरुन कोणीतरी शिव्या देतय असा भास होऊ लागला. तर माझी कन्या तिच्या बाजुला उभी राहुन कमॉन मम्मी करत जागच्या जागी उड्या मारु लागली. काहीही असो नेहमीच गाऊन मध्ये दिसनार आमच ध्यान आज जिमच्या पेहरावात एकदम हॉट दिसत होत. मला बॅक ग्राऊंडला "हळद आणि चंदनाचे गुण समावे संतुर त्वचा आणखीन उजळे संतुर..संतुर. हे गाण लागल्याचा फील आला. मी खांद्यावर टॉवेल घेऊन बाथरुम मध्ये निघुन गेलो.