नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० चा गजर लाऊन ७.३० लाच उठलो, अर्थातच आजही व्यायाम करायचा राहीला होता. डोळे चोळत असतानाच डो़क्यात जो काही विचार पहीला आला असेल आणि माझ्या मते तो सर्वश्रुत असेल तो म्हणजे - 'आता तयारी करुन आपल्याला कामाला जायचं आहे.' आयला लहानपणी शाळेत जायची तयारी आणि आता कामाची. तेव्हा शाळेत जाईपर्यंत आई किंवा बाबांची कटकट (अर्थात आपल्याच भल्यासाठी) आणि आता बायकोची (वायफळ किंवा फाल्तु बकवास फक्त लग्न झालेल्यांसाठी). त्या बाबतीत अजुन पर्यंत मी तरी सुखी आहे ह्या विचाराने मी सुखावतोय ना सुखावतोय; की बॉसचा रागीट आणि खडुस चेहरा माझ्या समोर आला व क्षणापुर्वीच झालेला आनंद मावळला. खरच सुख कीती क्षणीक असते ह्याची प्रचीती आली. तेवढ्यात बाबांचा आवाज आला, "अरे मन्या, कामाला जायचय ना? ८.०० वाजलेत." ह्या एका ओळीने माझी सारी शरीर यंत्रना कामाला लागली. मी पटापट बिछाना गुंडाळला आणी तडक बाथरुम मध्ये घुसलो. आता तिथे काय केलय हे वेगळे सांगायला नको, पण आंघोळ अहो आं-------घोळ तिथेही घोळ आलाच. नावाला दोनच तांबे डोक्यावरुन त्यामुळेच ह्या Deo वाल्या कंपण्यांच जरा जास्तच फावतय. आणि हो आंघोळीशी संबधीत एखादी स्पर्धा असेल तर भारताला मी नक्कीच पहीलं गोल्ड मिळवुन देईन (कृपया कोणाला माहीती असेल तर नक्की कळवा).
सुचिर्भुत होऊन बाहेर आल्यानंतर मी घाई-घाईत प्रा:तस्मरण केले. तेवढ्यात बाजुलाच पुजा करत असलेले आमचे तीर्थरुप म्हणाले, "अरे ते तरी कशाला करतोस? देवावर उपकार केल्यासारख, "मनी नाही भाव आणि देवा मला पाव"". तेव्हा मी चिडक्या स्वरातच बोललो, "अण्णा देव भावाचा भुकेला, समजल? त्यात मला लेट झालय." "मन्या, तुझ हे रोजचच आहे. रात्री बारा एक शिवाय झोपायच नाही आणि मग सकाळी ही धावपळ. मग कधी मोबाईल विसरायचा, कधी घड्याळ तरी अगदीच कळस म्हणजे पाकिट ट्रेन पाससहीत घरी ठेऊन जायचं आणि बसायच चीडचीड करत!". माझ्या एका लूज बॉलवरती आण्णांनी पार होम रनच मारला. मी स्वतःच्याच कानफडात मारल्यासारखा किचनमध्ये पळालो, नेहमीप्रमाने आईने ब्रेडच्या स्लाईस किचन मध्ये ठेवल्या होत्याच. त्या बाजुच्या पेल्यातल्या चहात बुडवुन अधाश्यासारख्या खाल्ल्या. टिफिन बॅगेत भरला तसेच घाई-घाईत मोजे चढवले आणि आईला आवाज दिला "आईईई...... येतो गं"
आई: अरे न्याहारी केलीस का?
मी: हो किचन वर ठेवलेले ब्रेड आणि चहा घेतला.
आई: चहा? कोणता? मी तर दुध ठेवल होतं ग्लासमध्ये झाकुन.
मी : अगं सोडंना, पेल्यात होता चहा, छान झाला होता.
आई : अरे गाढवां, तो ह्यांनी चहा पिऊन हात धुवुन ठेवलेला पेला होता. अरे मन्या न्याहारी तरी व्यवस्थीत करत जा बघ किती सुकलायस तो.
आणि सहज माझी नजर माझ्या ३६ च्या वाढलेल्या कंबरेकडे गेली आणि सर्व आयांना त्यांची मुल जन्मभर लहानच असतात ह्याची खात्री पटली.
"चल आई येतो आता" म्हणत मी अश्वावर आरुढ झाल्यासारखा घराबाहेर पडलो. आता माझ्या डोळ्यासमोर एकच ध्येय दिसत होते ते म्हणजे ८.३२ ची अंधेरी लोकल. दचकलात ना? होय मी अंधेरी ला कामाला आहे. माझ्या लहाणपणी मी शहनशहातल "अंधेरी रातो मे..." हे गाणं ऐकायचो आणि ह्या अंधेरीला त्या गाण्याशी रिलेट करायचो. म्हणजे थोडक्यात अंधेरीविषयी मला पहिल्यापासुनच भिती आणि तिथे कामाला असलेल्या माझ्याच काही मित्रांनी “तिथे कशी गर्दी असते हे गर्दीसारखच फुलवून सांगितल्यामुळे” मी जाम घाबरलो होतो. होतो म्हणजे घटनेला आता तीन वर्ष उलटुन गेलीयेत आणि मी पक्का अंधेरीकर झालोय. नुकतच एका प्रसिद्ध व्रुत्तपत्राने (दै.पुण्य नगरी) आपल्या एका अहवालात म्हटलय की, अंधेरीला सबंध दिवसात येणार्या जाणार्या लोकांना साखळीत उभ केल तर काश्मीर ते कन्याकुमारी मानवी ब्रीज तयार होईल. च्यायला हे काय पट्टी घेऊन मोजायला जातात की काय? उगच आपल काही तरी.
तसं माझ घर आणि स्टेशन हे अंतर ५ ते १० मि. परंतू मी निघणार ८.२५ ला मग…… मग सगळ तुमच्या लक्षात आलं असेलच! एखाद्या योध्याच्या अविर्र्भावात मी चालायला लागलो. पाचंच मिनिटात स्टेशन 'चालत' गाठायचे. म्हणजे मी चालतच असतो, पण लोकांना उगीचच मी पळत असल्याचा भास होतो. सबंध दिवसात जो काही घाम येत असेल त्यापैकीचा ५० टक्के कोटा बहुधा ह्या पाच मिनिटांतच पुर्ण होत असावा. तेवढ्यात क्षणापुर्वीच मारलेल्या Deo चा वास अनंतात विलीन झालाय याची जाणीव होते. आता विचार करा मी कसा दिसत असेन? ओले कपडे (घामाचे) भेदरलेला निर्विकार चेहरा आणि विस्कटलेल केस तरी मी म्हणतो आई नेहमी माझी द्रुष्ट काढायची आहे असं का म्हणते? कित्येकदा काही “खवचट” लोकांनी मुद्दाम मला विचारलेही काय मन्या कामावरुन येतोयस की जातोयस? तर हे झालं स्टेशन पर्यंतच.
कशी बशी गाडी मिळवली व नेहमीप्रमाणे छान वास(Deo चा) येणार्या माणसाच्याच बाजुला जाऊन उभा राहीलो. त्याचे असे की एक सत्य मला चांगल उमगलयं. मानसाने कितीही वेगवेगळे Deo किंवा सेंट बनवले तरीही गर्दीत सर्वांचा वास(??) sorry सुगंध सारखाच येतो. डब्यात नेहमीप्रमाणे काही ओळखीच्या लोकांना हात दाखवुन वैगेरे झाल्यानंतर मी स्थिर-स्थावर होऊ लागलो. एक सबंध नजर डब्यातुन फिरवली त्यात एक गोष्ट माझ्या लक्ष्यात आली ती म्हणजे प्रत्येकाच्या पाठीवरचे "ओझे" म्हणजे बॅग हो! हे लोक ऑफीसला चाललेत की ट्रेकींगला कळता मुश्किल ह्या मिश्किल विचारातच स्वतःशीच हसत मी माझीही बॅग पुढे घेतली व हळुच त्यातुन हेड फोन काढला आणि कानाला लावला. अर्थात दुसरे टोक मोबाईललाच लावणार? काय "तुम्हीपण" हा आता असे करण्यामागे गाणी ऍकण्यापेक्षा मोबाईल चोरीला जाऊ नये हाच उदात्त हेतु. (त्याच असं की हल्ली नव-नवीन महागड्या मोबाईल्स मुळे चोरांच फार फावलय साले पा़कीटाला हात लावणार नाहीत पण खिशातला मोबाईल कधी उडवतील ह्याचा बेत नाही) गाणं वाजायचं बंद झाल की समजायच मोबाईलच काहीतरी बंर वाईट झाल म्हणुन. आहे की नाही झक्क्कास idea (an idea can save ur mobile अशी नवी स्लोगन आली तर नवल वाटुन घेऊ नका.)
हया विचारांच्या गर्तेत असतानाच माझी नजर सहजच माझ्या पायांकडे गेली, तेव्हा उजवा पाय सफेद तर डावा गडद निळा दिसत होता. मगाशी घाईघाईत आपण दोन वेग-वेगळे मोजे चढवलेत ह्याचा साक्षात्कार झाला. मुर्खपणा झाला इथपर्यंत ठिक होते पण ह्यापैकी एक मोजा आमच्या तीर्थरुपांचा असल्यामुळे घरी त्यांनी आईला बेजार केलं असणार आणि शेवटी फिरुन त्यांना कळणारच खरा गुन्हेगार कोन तो? आण्णांचा त्रस्त चेहरा समोर आला आणि काळजी करावी की घाबरावं ह्या द्विधा मनस्थीतीत मी सापडलो. एवढ्यातच बाजुला मोठ्याने हसण्या खिदळण्याचा आवाज आला व माझे लक्ष तिकडे गेले. चार-पाच गुज्जु बांधव छान रम्मी (जुगार) खेळण्यात रमले होते. तसं हे त्यांच नेहमीचचं आणि बहुतेक उपजीवीकेच साधन असावे? कारण गेली तिन वर्षे मी त्यांना त्याच ठिकाणी तेच करताना बघतोय. फार फार तर काय बदल होत असेल तर ज्याला खेळता येत नसेल तोही बाजुला बसुन आपोआपच शिकतो व त्यांच्या कंपुत जॉईन होतो एवढच.
थोड्याच वेळात "अगला स्टेशन अंधेरी, पुढील स्टेशन अंधेरी, next station Andheri" असे तीन वेगवेगळ्या भाषेत घाबरवल्यानंतर तो मंजुळ आवाज बंद झाला. आणि मी भानावर आलो एक-एक करुन सर्वजन आपल्या जागेवरुन ऊठू लागले, तर दरवाज्यातील काही मंडळी मागे सरुन उभी राहु लागली. कारण काय तर ट्रेन फक्त अंधेरी पर्यंतच असल्यामुळे खाली चर्चगेटला जाणार्या "भावीकांची" तुडुंब गर्दी असते. ट्रेन प्लॅटफॉर्मला लागली रे लागली की कळ्पातल्या गुरांसारखी सर्व गर्दी चार बाय सात च्या त्या दरवाजातुन आत शिरायला बघते. मी कित्येकदा ह्या विलोभनीय द्रुष्याचा आस्वाद घेतलाय. एखादा मजबुत अंग काठीचा(ची) असेल तर निभावुन जातात, पण शरीर यष्टी बारीक असेल तर तुम्ही परत चर्चगेटपर्यंत गेलात म्हणुन समजा. खरंच बडा है तो बेहतर है! (अंगकाठी हो) आणि आरडा-ओरडा वेगळा सांगयला नको. कित्येकजण प्रवासासाठी आलेत की मोर्चा घेऊन हे "ते" ट्रेनमध्ये बसल्याशिवाय कळतच नाही. तिथुन कसाबसा मुसंडी मारुन ट्रेन च्या बाहेर पडलो आणि नकळत तोंडातुन "वाचलोय वाचलोय हुश्शःssssss" असे भावुक शब्द आले. पुन्हा एकदा अंगावरील सर्व आभुषने नीट तपासली आणि स्टेयर्सचा दिशेने चालु लागलो. अंधेरीत येऊन एक गोष्ट मात्र मी अनुभवातुन शिकलोय, गर्दीत जास्त हात पाय न हालवता स्वताला लोकांच्या स्वाधीन(त्या अर्थाने नाही) करायचे, म्हणजे काय कडेवर उचलायला सांगायचे नाही. तर शांत चेहरा ठेऊन अलगद चालत राहायचे तुम्ही कधी बाहेर पडलात (स्टेशनच्या हो) ते कळनारच नाही आहे.
स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर पहीली पाच मिनीटे कळतच नाही की आपण नक्की मुख्य रस्त्याकडे चाललोय की एखद्द्या मार्केटमध्ये घुसलोय. अगदी नेल पॉलीशपासुन ते फणी पर्यंत सर्व “items” म्हणजे वस्तु…… नाही कळलं? जरा विस्कटुन सांगतो, पायाच्या नखापासुन डोक्याच्या केसापर्यंत जे जे लागत ते सर्व तुम्हाला आजुबाजुलाच मिळेल. हा पण पैसे मोजावे लागतील नाहीतर राहाल माझ्यासारखे गोड संभ्रमात. एकदा काय झाल मी स्टेशन मधुन बाहेर पडल्या पडल्या एका ज्युस वाल्याने मला हातवारे करुन बोलावलं मला वाटले, असेल काहीतरी सणानिमीत्त्त नाहीतरी आपल्याकडे गणेशोत्सवात मिरवणुकीतील लोकांना काहीतरी फुकट देण्याची प्रथा आहेच. त्यामुळे तसंच काहीस वाटुन मी पुढे सरसावलो त्यात उन्हाळा असल्यामुळे तहानलो होतोच. गेलो आणि छान दोन ग्लास सरबत रिचवला पिता पिता त्याला छान आशिर्वादही दिले ग्लास ठेवला आणि चालु लागलो. ईतक्यात मागुन (पाठीच्या हा) मोठ्या ने आवाज आला "साब"(ह silent) ओ "साब" मीही त्याच्याकडे पाहीले आणि म्हटले, "बसं यार दो ग्लास मे ही पेट भर गया अब और नही." "हा ना? तो फिर मेरे पेट पे लात क्यु मार रहे हो? मेरा पैसा तो दो", तो अत्यंत कळवळीने बोलला. "कैसा पैसा?" मी यमक जुळवत बोललो. "शरबत का", "अबे तुने ही तो मुझे हात दिखाके बुलाया." मी त्वेषात बोललो. "साब, वो तो मेरा धंदा है. लगता है आप नये हो यहा पे." "चल बस कर. कितना हुआ?" म्हणत मी प्रकरण संपवल आणि मनोमन बडबडत अर्थात आशिर्वादाची जागा आता शिव्यांनी घेतली होती तिथुन निघालो. अजुनही असं काही आठवल की मी माझ्याच बावळटपणावर येथेच्छ हसतो.
स्टेशन समोरच आगरकर चौकात एक सुलभ शौचालय आहे. मला आजही आठवतय माझ्या सुरवातीच्या काळात मी जेव्हा अंधेरीत जॉईन केल होतं तेव्हा समोरील लाईन पाहुन खरचं फार घाबरलो होतो. पहील्यांदा वाटल की आज काय जागतिक स्कॉटींग (संडा--) दिवस आहे की काय? पण लगेचच एका सभ्य (फक्त वाटत होता) ग्रुह्स्थाने ती SEEPZ ला जाणार्या बसेस ची रांग आहे हे सांगीतले व माझ्या भीतीत अजुनच भर घातली होती. त्या प्रसंगानंतर जर काही बदल झाला असेल तर ती गर्दी आता त्या सुलभच्याही पुढे गेली आहे. कधी-कधी वाटत एखादी बस पाऊन एक तास लेट झाली तर रांगेतला शेवटचा माणुस थेटं SEEPZ लाच पोहचायचा. मी मात्र ह्या फंदात नं पडता सरळ चालत जाणंच पसंद करतो त्यामुळे फायदा काय? तर “पायांचाही” व्यायाम होतो आणि “डोळ्यांचाही“
दरम्यानच्या काळात अंधेरीने बरचं सोसलयं. ठिकठिकाणी मोठे मोठे कॉंम्प्लेक्स झालेत. अत्यंत परिचीत आणि जुन्या कलाकारांची खरी ओळख असलेला नटराज स्टुडीओ जाऊन तेथे नटराज टॉवर उभा राहतोय. अनिल ने (अंबानी हो) METRO चे tender भरलय की "उत्खणनाचे"(excavation) तेच कळ्त नाही आणि पोल्युशन तर विचारु नका. आख्या प्रुथ्वीवर ओझोनला जर सगळ्यात मोठं भोक कुठे पडेल तर ते अंधेरीत असेल? (सौजन्य दै. बोंबाबोंब) आणि सगळ्यात गहन प्रश्न जो तुमच्या आमच्या सारख्या Common Man ला नक्कीच पडतो तो म्हणजे अंधेरीत ह्या गर्दीशी लढण्यास खरच आपली प्रशासन व्यवस्था तेवढी तत्पर आहे का? गावा-गावात Sky walk असताना अंधेरीचा ह्याबाबतीत साधा विचारही होऊ नये? नको त्या ठिकानी Sub Way बांधुन "पाणी साठवण्यापेक्षा" Western Express Highway वर काही महत्वाच्या ठिकाणी बांधले तर लोकांना आपला जीव मुठीत घेऊन रस्तातरी ओलांडावा लाङणार नाही. जाऊद्या लिहावं तेवढ कमीचं मी उगाचच ईमोशनल झालो.
ह्या सार्या विचारांच्या बट्या बोळात ऑफिस कधी आलं ते कळल सुद्दा नाही. ईथपर्यंत सुखरुप आणल्याबद्दल मी देवाचे आभार मानले आणि पळतच ताटकळत उभ्या असलेल्या “lift” मध्ये प्रवेश केला कारण नेहमीप्रमाणेच आजही उशीर झाला होता.
- श्रीमत्(महेन्द्र लक्ष्मण कदम)
Featured Post
रोज मरे........
नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० चा गजर लाऊन ७.३० लाच उठलो, अर्थातच आजही व्यायाम करायचा राहीला होता. डोळे चोळत असतानाच डो़क्यात जो काही विचार पहीला आ...
Monday, November 23, 2009
Tuesday, September 22, 2009
सांजवेळ
ज्याप्रमाणे दु:खांनंतर सुख त्याचप्रमाणे जळजळीत दाहानंतर रम्य अशी संध्याकाळ प्रत्येकाच्या आयुष्यात नेहमी येत असते. काहीचजण तिचा आस्वाद घेतात, तर काही जण हे काय नेहमीचंच म्हणुन माना फिरवतात. पण खरचं सांगु... प्रत्येक सांजेशी कोणाच्या ना कोनाच्या तरी आठवणी जोडलेल्या असतात. अगदी लहाणपणापासुन ते पहिल्या प्रेमापर्यंत... आणि तुम्ही कितीही मोठे झालात (पैशाने/वयाने) तरीही त्या तुम्हाला आल्या शिवाय राहत नाहीत. आहे की नाही गंमत या कातरवेळीची असो...........................
सांज समयी शांत नभी,
कोमेजल्या चोही दिशा,
रवी किरणांचे तेज मालवून
गहरुन आली गुढ निशा ॥ ध्रु ॥
मंद वेळी सुगंध मनी,
बेधुंद झाले अंतरंग,
पवनस्पर्श होता तनी,
हलकेच उठले नीर तरंग ॥ १ ॥
उदर - क्षुधा क्षमवुनी,
पाखरे परतली घरी,
आप्त भेटी मोहापायी,
भिरते नजर ही बावरी ॥ २ ॥
श्वेत मळुनी वात जाळुनी,
तेविला नंदादीप,
शुभं-करोती वदता मुखी
वसते लक्ष्मी आपोआप ॥ ३ ॥
श्रीमत्
(महेन्द्र लक्ष्मण कदम)
सांज समयी शांत नभी,
कोमेजल्या चोही दिशा,
रवी किरणांचे तेज मालवून
गहरुन आली गुढ निशा ॥ ध्रु ॥
मंद वेळी सुगंध मनी,
बेधुंद झाले अंतरंग,
पवनस्पर्श होता तनी,
हलकेच उठले नीर तरंग ॥ १ ॥
उदर - क्षुधा क्षमवुनी,
पाखरे परतली घरी,
आप्त भेटी मोहापायी,
भिरते नजर ही बावरी ॥ २ ॥
श्वेत मळुनी वात जाळुनी,
तेविला नंदादीप,
शुभं-करोती वदता मुखी
वसते लक्ष्मी आपोआप ॥ ३ ॥
श्रीमत्
(महेन्द्र लक्ष्मण कदम)
Wednesday, September 2, 2009
दु चाकी - भाग 9 (शेवटचा)
थोड्याश्या विश्रांती नंतर सर्वांनी निघण्याचे ठरवले. "मी आता कोणासाठीही थांबणार नाही" तेजस बिनदिक्कत सर्वांसमोर बोलला. "आयला बरच आहे, सुंठेवाचुन खोकला गेला" दिपक खुश होऊन म्हणाला. यावर काही प्रतिक्रिया न देता तेजसने फक्त डोळे वटारुन त्याच्याकडे पाहीले व तो आपल्या बाईक-कडे रवाना झाला. "शिट...शिट......." गणेशला असे त्रयस्त उद्-गार काढलेले पाहुन सुश्यांत ने त्याला विचारले "काय रे, काय झालं?" "अरे काय होणार, मोबाईल ची बॅटरी ऑफ झाली. घरुन एक अर्जंट फोन येणार होता" "अरे हो यार, फारच मोठी पंचाईत झाली आपली", दिपक बोलला. "आपली म्हणजे???" सुशांत ने री ओढली. "अरे तेजसचा आणि महेशचा मोबाईल आपण गडावर होतो तेव्हाच बंद पडलाय. माझाही एक दोन तासच तग धरेल, मग संवाद साधायचा कसा? त्यात सकाळपासुन आपली उडालेली तारांबळ", "तसं टेन्शन घेण्याचं कारण नाही. माझं भ्रमणयंत्र अजुनतरी चालु आहे" सुश्यांतने कळवले. त्याचं बोलनं मध्येच तोडत काहीसं मिश्किल हसत तेजस बोलला "अरे संवाद साधायला आपण काही पत्रकार परिषद बोलावली नाहीये." "ए बाबा तु महेशला घे आणि हो पुढे", गणेश उद्-गरला. "तो तर मी जाणारच आहे आणि तुम्हीही या लवकर, नाहीतर एन दिवाळीत घरुन असे काही बांबु पडतील की अवघड जागी दुखनं होऊन बसेल हा हा हा........." निघन्याच्या अगोदर महेश दिपक आणि इनायत जवळ आला व त्याने शांत स्वरात त्यास गाडी जपुन चालवण्याची सुचना केली आणि पुन्हा सर्वजण बाईक्सवरती आरुढ झाले तेजस-महेश, ईनायत-दिपक आणि गणेश-सुश्यांत.
ढाबा सोडुन चांगले दिड-दोन तास झाले असतील. सवयीप्रमाणेच तेजस सर्वांच्यापुढे गाडी रेमटवत होता. महेश आपला त्याच्याच गुढ विचारात रमला होता. त्याला राहुन राहुन तेच आठवत होतं आणि मग मन उदास होत होतं. काल एवढ्या खुशीत निघालो, रात्रीचा तो थरारक प्रवास, शरीराने थकवणारी परंतु मनाला तजेला देणारी दुर्ग भ्रमंती, सार काही व्यवस्थीत चालल होतं पण....... ह्या पण चेच उत्तर काही केल्या मिळेनासे झाले होते. ह्या मनातील गुंता-गुंतीचा विचार करताच त्याची नजर सभोवतालच्या नजार्यावरती फिरत होती. वाकण, नागोठणे अशी एक एक करुन गावं मागे पडत होती. घड्याळाच्या वेगाबरोबर गाडीचाही वेग तेजस ने वाढता ठेवला होता. तो इतक्या निर्दयीपणे गाडी रेटत होता की काही क्षणी महेशला असे वाटलं की आत्ता आपण दुसर्या गाडीखाली जाऊ आणि क्षणात............... बस विचारही न केलेला बरा तो मनाशीच म्हणाला. पण पुन्हा कधीही ह्या रा़क्षसाच्या मागे असं जीव मुठीत घेऊन बसायच नाही याचा त्याने निर्धार केला. वडखळ नाका मागे पडल्यानंतर तेजसला उधानं चढल, त्याने आपला वेग अजुन वाढवला. बहुधा त्याचामुळेच त्याच्या बाईकचा स्पीडोमीटर बिघडला असावा. साधारण वढखळ ते जे.न.पी.टी हे अंतर तासाभराचे, परंतु तेजसने फक्त अर्ध्या तासात हे अंतर लीलया पार केले. अखेर न राहावुन महेशने तेजसला विचारले, "अरे दोन तास उलटुन गेले पण अजुन कोणाचाच पत्ता नाही. एखादा पीसीओ पाहुन जरा गाडी बाजुला लाव." "हा यार! मलाही तेच वाटत होतं", "आणि तरीही तु गाडी पळवतोयस" महेश चिडुन बोलला. "ठिक आहे बाबा, चिडु नकोस." असं म्हणत त्याने गाडी रस्त्याच्याच बाजुला एका छोट्याश्या टपरीवर लावली. गाडीवरुन पायउतार होताच महेशने तेजसला कोपरापासुन हात जोडले, "बस्स आज मजबुरी म्हणुन बसलो पण ह्यापुढे कधीच नाही", "अरे समजुन घेना सोन्या, काही करुन मला ६ वाजेपर्यंत घरी पोहचायचे आहे" तेजस विनंतीच्या स्वरात म्हणाला, "अरे असाच गाडी चालवशील ना तर नक्कीच पोहचशील, पण घरी नाही मो़क्षाला", महेश खोचकपणे बोलला. "हे बघ, मी गाडी आठवीत असल्यापासुन चालवतोय आणि माझी गाडी मला कधीच अशी धोका देत नाही समजलं. ते जाऊ दे ४.३० वाजलेत आणि आपण पणवेलच्या बॉर्डरवर आहोत, म्हणजे तासाभरात घर्र्.............री". "अरे धीर धर. आधी हे चौघे कुठे आहेत ते तर पाहु" महेश बोलला. "साला गणेश सोड. त्याची तर सवयच आहे कुर्मगतीने चालवण्याची. पण इनायत एवढ्या मागे पडणं अशक्य आहे. मला वाटत गाडीत काही तरी बिघाड झाला असावा, नाहीतरी दुसर्यांदा पडली तेव्हा जरा वेगळाच आवाज येत होता" तेजस चिंतातुर होत बोलला. "ए, इथे आधीच टेन्शन आहे अजुन घाबरवू नकोस" महेश रिसीव्हर कानाला लावत बोलला. झाल्या प्रकारांमुळे महेशच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. सर्वात पहीला त्याने दिपकचा नंबर ट्राय केला परंतु तो नॉट रिचेबल लागत होता. नतंर त्याने सुश्यांतचा फोन ट्राय केला. यावेळी मात्र रिंग वा़जली आणि क्षणात समोरुन सुशांतचा रडवेला आवाज आला.
सुशांत : अरे कुठे आहात तुम्ही, आत्ताच्या आत्ता परत या तुझ्या गाडीला पुन्हा अपघात झालाय एका दमात तो सर्व बोलला.
महेश : पाटील आता भंकस नको बस झाल आता अपघात अपघात खेळनं.
सुशांत : अरे मी खरंच भंकस करत नाहीये, तुझ्या गाडीचा आणि एका इंडीका कारची वाकण येथे जोरात टक्कर झाली आहे... प्लीज तुम्ही परत या काही करुन.
महेश : ठीक आहे तु काळजी करु नकोस कुणाला काही लागलय का?
सुशांत(रडवेल्या स्वरात) : अरे मला तर काहीच सुचत नाहीये इनायतची तर गुढघ्याची वाटीच फुटली आहे. दुखापत एवढी जबर आहे की तो पुन्हा normal चालु शकेल की नाही याची शंका वाटते. आणि दिपकच्या पायांनाही भरपुर घसपटलय. परंतु ईनायतच्या गंभीर दुखापतीपुढे त्याच्या जखमांचे भानच कुणाला राहील नाहीये. तरीही तो ठिक आहे. तुम्ही आधी कुठे आहात ते सांगा.
महेश : हे बघ आम्ही आत्ताच पनवेलच्या जवळपास पोहचलो आहोत. पण तु काळजी करु नकोस आम्ही लगेचच निघतो. आणि गणेश, दिपक कुठे आहेत?
सुशांत : काही वेळापुर्वीच ते त्याला गाडीत घालुन जवळच्याच हॉस्पीटल मध्ये गेलेत. मी इथे अपघातस्थळी उभा आहे व तुझी गाडी ही इथेच आहे. तर गणेशने त्याची गाडी इथे जवळपासच एका दुकानात ठेवली आहे ती तो उद्द्या किंवा परवा येऊन घेऊन जाणार आहे. मांझ तर डोकच काम करत नाहिये.
महेश : हे बग तु आधी शांत हो आणि व्यवस्थीत सांग पाहू कुठे यायच ते ?
सुशांत : नागोठण्यापासुन अलीकडेच खोपोली फाट्यापासुन काही अंतरावर, नदीवर एक अरुंद पुल आहे आणि बाजुलाच पोलीस चौकीही आहे.
महेश : हे बघ मी तासाभरातच पोहचतोय तिथे, तु धीर धर ok. बघितलस नाहीतरी मी तुम्हाला म्हणत होतोच की मला कसलीतरी विलक्षण जाणीव होतेय म्हणुन, पण नाही तुंच मला म्हणालास की मी घाबरल्यामुळे सर्व झाल मग आता हे कस काय झालं?
सुशांत : please yaar ते सर्व सोड आता आपण नंतर चर्चा करु या विषयावर. त्याआधी मला ईनायतची फार काळजी वाटतेय रे.
महेश : ठेवतो आता तरीही मधुन-मधुन फोन करीन.tension घेऊ नकोस.
फोन ठेवल्यानंतर महेश अगदी सुन्न झाला. त्याला त्या अवस्थेत पाहुन तेजस काहिसा काळजीच्या स्वरात बोलला "काय रे काय बोलला? आणि तु ते accidents वैगरे काय बोलत होतास? please सांग ना काय झालं ते?" "तेजस अरे माझ्या गाडीला पुन्हा अपघात झाला रे, आणि ईनायतच्या पायाला गंभीर दुखापतही झाली आहे. दुखापत एवढी जबर आहे की तो पुन्हा ठिकपणे चालु शकेल की नाही याची शंका वाटते. दिपकला ही बर्यापैकी लागलय". सुरवातीचे लागलय हे शब्द ऐकून तेजस विचारांच्या गर्तेत गेला. त्याच्या डोळ्यासमोर हसरा ईनायत तसाच उभा होता, त्याच्याबरोबर कधीही कुठेही येणारा, कोनतेही कार्य असो केव्हाही नाही न बोलणारा ईनायत, आपल्या जखमी पायाकडे पाहुन विव्हळणार्या नजरेतुन जणु काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे... नुसत्या विचारानेच त्याच्या अंगभर मुंग्या संचारल्या व तो म्हणाला "महेश, चल आता मला एक क्षणभर ही येथे थांबवत नाहीये. अरे खरंच त्याला माझी गरज असेल. shit, साला माझ्यामुळेच झाल सर्व. कालही त्याला मीच फोर्स केला चल म्हणुन, सकाळीही त्याला pulsar आवडत नसताना मीच चालवण्यासाठी आग्रह धरला. आता त्याच्या आई-वडिलांना काय सांगु? की तुमचा मुलगा आता लवकर किंवा कधीच व्यवस्थीत चालु अथवा पळु शकणार नाहीये?" बोलता बोलता त्याच्या डोळ्यातुन अश्रु ओघळले. हे पाहताच महेशने लगेचच त्याला आपल्या जवळ घेतले, "हे बघ तु कसलेही वाईट-साईट विचार करु नकोस. आपण आधी घटनास्थळी जाऊया मग ठरवु काय करायच ते", आणि दोघेही तडक वाकणच्या दिशेने निघाले. ईनायतच्या काळजीने तेजस एखाद्या धुमकेतुच्या वेगाप्रमाणे गाडी चालवत होता. बाईकच्या प्रचंड वेगाने महेशच्या डोळ्यातुन गंगा-जमुना वाहु लागल्या आणि भितीचं वेगळ सांगायला नको. आज भीती नावाची गोष्ट खरच अस्तित्त्वात असती तर तिलाही भिती वाटली असती. वीस मिनिटांच्या रेकॉर्ड ब्रेक वेळेत दोघे वडखळ नाक्यावर पोहचले. तेथे येताच महेशने तेजसला गाडी थांबवण्यास सांगुन सुश्यांतला फोन केला. तेव्हा त्याने सांगितले की "ईनायतचा भरपुर रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यास ambulance ने सायन हॉस्पीटल मध्ये हालवले आहे. बहुतेक ते आत्ता रस्त्यातच असतील. तर तु तेजसला हॉस्पीटलमध्ये जायला सांग आणि तु ईथे ये. पोलिस केस झाल्यामुळे तुझी गाडी नागोठणे पोलीस ठाण्यात नेली आहे." झाला प्रकार महेशने तेजसला ऐकवला, तसा तो तिथुन तडक हॉस्पीटलच्या दिशेने निघाला व इकडे महेश मिळेल त्या वहानाने घटनास्थळी पोहचला. तेव्हा संध्या़काळचे सात वाजले होते व समोरच सुश्यांत गलित गात्र अवस्थेत उभा होता. महेशला समोर पाहताच त्याने क्षणाचाही विचार न करता त्याच्याकडे धाव घेतली. "महेश काय झाल यार, मला तर तो अजुन तसाच डोळ्यासमोर दिसत आहे." सुश्यांत काकुळतीच्या स्वरात बोलला. "हे बघ तु आधी शांत हो. आणि मला सविस्तर काय झाल ते सांग." तेव्हा सुश्यांत ने झाला सर्व प्रकार कथन करण्यास सुरवात केली.
"तुम्ही पुढे गेल्यानंतर आम्ही आरामात येत होतो. एक चार-साडे चारच्या सुमारास एका हॉटेलवर आंम्ही चहा पिण्यासाठी थांबलो सुद्धा, चहा पितानाच आम्ही सकाळच्या पडझड सत्राविषयी पुन्हा चर्चा केली. तेव्हा बिचारा ईनायत गणेशला बोलला सुद्धा की पनवेल पर्यंत आपण एका पाठोपाठ बाईक ठेवुया एकदा पनवेल गेले की काही टेन्शन नाही. त्यानंतर थोडे जोक वैगेरे झाल्यानंतर आम्ही तेथुन निघालो. पंधरा एक मिनिटानंतर या पुलावरुन गणेश ने एका जीपला overtake केला, तेव्हा ईनायत आणि दिपक आमच्या मागेच होते. क्षणात मोठा आवाज झाला तेव्हाच माझ्या मनात आलं की आपलीच गाडी असेल. गणेशनेही आवाज ऐकताच जागेवरच गाडी थांबवली. मागे वळुन पाहतो तर काय दिपक मागच्या मागे उडुन डाव्या बाजुला पडला होता, तर ईनायत रस्त्याच्या मधोमध कळवळत होता. आम्ही पहीली धाव ईनायत कडेच घेतली. टक्कर एवढी भीषण होती की इंडिकाचा पुढचा टायर जागीच फुटला व ती कठड्यावर जाऊन आदळली. गाडी थेट ईनायतच्या उजव्या गुडघ्यावर आदळल्यामुळे गुडघ्यावरील मांस फाटुन आतल सर्व दिसत होतं. मला बघताच चक्कर येऊन उलटीसारख वाटु लागल. अरे आमच तर सोड ईनायतला तर बिचार्याला प्रथमदर्शनी कळलच नाही. त्याने पहील हाताला तोंडाला कुठे काही लागलाय का ते पाहीलं, पण जेव्हा त्याची नजर पायाकडे वळली तेव्हा त्याने आमच्याकडे एकदा व्याकुळ नजरेने पाहीले. त्याच्या तोंडातुनतर आवाजच निघत नव्हता. इतक्यात दिपक लंगडत लंगडत आला. ईनायतची ती अवस्था पाहुन त्याला बिचार्याला उचलण्याचही भान कोणाला राहील नाही. एव्हाना पुलावर बरीच गर्दी जमली होती. दुतर्फा गाड्या जाम झाल्या. तेव्हा सुदैवाने गर्दीतुनच एक इसम आपण डॉक्टर असल्याचे सांगुन पुढे आला व त्याने पटकण इनायतवर प्राथमिक उपचार केले. बाजुलाच चौकी असल्यामुळे पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन ambulance ची व्यवस्था करुन दिली. ईनायतचीतर पुर्न पॅंन्ट रक्त्ताने भिजली होती. अतिरक्तस्त्रावामुळे बिचार्याच्या अंगात काहीच त्राण ऊरले नव्हते. जणुकाही दातखिळीच बसली असावी. तशाही परिस्थीतीत दिपकने आपल्याला काही लागलय याचा विचार न करता, तो आणि गणेश ईनायतला hospital मध्ये घेऊन गेले. तेव्हा गणेशनेच तिकडुन फोन करुन त्याला urgent सायन hospital ला नेत आहोत हे कळवले. मला मात्र पोलीसांनी इथेच थांबण्यास सांगितले. पंचनामा करताना त्यांनी गाडीचा मालक आणि कागदपत्रांविषयी विचारपुस केली, असता मी खर काय ते सांगितले. त्यात दुर्दैव असे की इनायत जवळ driving license नव्हते. मग फारच पंचाईत झाली आता केस होणार. गाडीतर पोलिस घेऊन गेलेच आहेत. मग पुन्हा त्याच्यासाठी त्यांची वेगळी आळवणी करा आणि भरीस भर म्हणुन घरच्यांच्या शिव्या. साला निघताना कुणाच तोंड पाहील होतं काय माहीती? असो, देवा बाकीचं काही झाल तरी चालेल, पण बिचार्या ईनायतला लवकर बरं कर." सुश्यांत काळजीच्या स्वरात बोलला. महेश मात्र शून्यात नजर ठेऊन समोरील द्रुश्य पाहात होता. संध्याकाळचे आठ वाजले असतील घरा-घरात पणत्या लागल्या, कंदीलही मंद प्रकाशात आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देत होते, छान गेरुच्या सड्यावरती सुबक रांगोळ्या रंगु लागल्या, त्यास जोड ती फटाक्यांची वातावरणात एक मंदसा सुवास भरुन गेलेला जणु काही लक्ष्मीच आपल्या हातांनी दरवाज्यावर दस्तक देत आहे असे मंगलमय वातावरन पण...........
होय या "पण" चे उत्तर महेशला आता मिळाले होते. राहुन राहुन त्याला आईचा हसरा चेहरा, तर बाबांची पुजेसाठी चाललेली धडपड आठवत होती. परंतु आता यापैकी काहीच आनंदायला मिळणार नव्हते..........................

Wednesday, August 19, 2009
बाप्पा हसतोय गालातं
उंदरावर बैसोनि, पितांबर नेसोनि,
बसलाय झोकात, मोदक हाती, शमी ठेविली माथी,
कंठी घातलीया गळ्यात, हो बाप्पा हसतोय गालातं ॥ 1 ॥
सिंहासन धारी, रत्नमुकुट शिरी,
वज्र-कमळ हातात, सोंडेची वळी, गंध केशरी कपाळी,
डुल घातलेत कानात, हो बाप्पा हसतोय गालातं ॥ 2 ॥
पार्वती माता, सांब पिता चंद्रमौळी,
रिद्धी-सिद्धीही थाटात, विघ्णहर्ता तु, विद्धयेचा दाता,
ठेवी सर्वांना सुखातं, हो बाप्पा हसतोय गालातं ॥ 3 ॥
बाप्पाची वर्दी, तिथे भक्तांची गर्दी,
झालं स्वागत जोरात, वाजती टाळ-वीणा, म्रुदुंग ठे़क्यात,
घुंगरु बांधलयं पायात, हो बाप्पा नाचतोय तालातं ॥ 4 ॥
उंदरावर बैसोनि, पितांबर नेसोनि............॥ ध्रु ॥
- श्रीमत् ( महेंन्द्र लक्ष्मण कदम)

Thursday, July 30, 2009
दु चाकी - भाग 8
आप-आपल्या गाडीत पट्रोल भरल्यानंतर सर्वजन ढाब्याच्या दिशेने निघाले. आता मात्र सर्वांनाच सनकुन भुक लागली होती. त्यामुळे काही करुन लवकरात लवकर तेथे पोहचायचे आणि मिळेल त्याचा फडशा पाडायचा असे एकंदर सर्वांच्या चेहर्यावरुनच वाटत्त होते. इनायतचा तर चेहरा शंभरच्या बल्बसारखा तळपत होता, तर तेजस मात्र गुर्हाळाच्या बैलासारखा गाडी रेमटवण्यात मग्ण होता, बहुतेक कोणत्या कोणत्या पदार्थांवर ताव मारायचा या विचारात तो असावा. गणेश आणि दिपकची परीस्तिथी जरा बिकट वाटत होती, ते आत्ताच उपोषणातुन उठलेल्या कार्यकर्त्यांसारखे दिसत होते. तर सुश्यांत मात्र झाल्याप्रकारामुळे थोडासा शांतच बसला होता. महेशला तर कधी एकदा घरी जातोय आणि बिछान्यावर अंग टाकत्तोय अस वाटत होते. त्यात उजव्या हाताच्या तळव्याला लागल्यामुळे त्यास एक्सलेटर देताना बराच त्रास होत होता आणि गुडघाही चांगलाच ठणकत होता. पेट्रोलपंप सोडुन एक पंधरा मिनिटे झाली असतील कि अचानक अज्ञात मारुती कार ने महेशच्या गाडीला उजव्या बाजुने दाबले, हे सर्व इतक्या वेगात घडले की महेशला गाडीच कंट्रोल झाली नाही. काहीसं गांगरुन त्याने पुढचा डिस्क दाबला, ब्रेक इतका अर्जंट होता की बाईकचं पुढचं चाक जागेवरच स्किड झाल व काही कळायच्या आतच दोघेही (सुश्यांत आणि महेश) रस्त्याच्या खाली फेकले गेले. सुदैवाने रस्त्याच्या दोन्ही बाजुला बर्यापैकी गवत होते, दोघेही त्या गवतात जाऊन पडले. महेशला असे पुन्हा पडलेले पाहुन तेजस आणि गणेश दोघांनीही आपल्या गाड्या जागीच थांबवल्या व ते दोघांना उचलण्यासाठी धावले. बाजुनेच गावातील काही महीला पाणी घेऊन जात होत्या त्यांनीही त्यांच्या दिशेने धाव घेतली. महेशच्या डोळ्यांसमोर भर दुपारी काजवे चमकायला लागले. त्याने हळुच आपले हेल्मेट काढले व एक नजर पुन्हा तो स्वतालाच न्याहाळु लागला, तेव्हा त्याला असे आढळले की अर्ध्यातासाभरापुर्वीच हाताला जे बॅंडेज केले होते त्यातुन आता पुन्हा रक्त वहायला लागले होते. तसेच खालचा ओठ दातांखाली चिमटल्यामुळे तोंडातुनही थोडेफार रक्त वाहु लागले. याउलट सुश्यांत ने प्रसंगावधान ओळखुन आधीच उडी घेतल्यामुळे त्याला अजिबात लागले नव्हते. झाला प्रकार तेजसने अगदी जवळुन पाहीला असल्यामुळे तो तावातावात त्या कारवाल्या इसमास शिव्या घालत होता. तेवढ्यात जमलेल्या बायकांपैकी एका मध्यम वयाच्या बाईने महेशला आणि सुश्यांतला आपल्या जवळील पाणी पा़जले व आपुलकीने तीने त्यांची विचारपुस केली. तीचे ते शब्द ऐकुन महेशला निघतानाचे आईचे शब्द आठवले, खरच आपल्या पालकांची मुलं अशी लांब गेलीत की काय विवंचना होत असेल्? या नुसत्या विचारानेच त्याच्या अंगावर शहारा आला. आता कधी एकदा घरी जाउन आईला भेटतोय असं त्याला वाटत होते. तेवढ्यात दुसर्या बाईने गणेशला सांगितले "बाबांनो जरा जपुन गाड्या चालवा. आधीच ह्या रस्त्यावर भरपुर अपघात होतात. कित्येकदा असं तरुन पोरांना विव्हळताना पाहील कि वाईट वाटतं. तरी तुमच नशीब बलवत्तर म्हणुन थोड्यावरच भागलं, जीवाला जपा, आमच्या लेकरासारीचं तुम्ही"
इकडे इनायत ने बाईक उभी करुन साईड स्टॅंडवर लावली व तो महेश जवळ आला, "क्या dude क्या हुआ?" "अरे कुछ नही यार, मै सीधे ही जा रहा था, इतने मै उसने ने पिछेसे आके मुझे अंदर दबा दिया. साला आज नसीबच खराब आहे." महेश दुखर्या आवाजात बोलला. यावर सुश्यांत काहीसा चिडक्या आवाजात बोलला, "काही नाही रे तु मगाशी झालेल्या प्रकारामुळे जरा बिथरला होतास व त्याच भीतीमुळे तुला गाडी कंट्रोल नाही झाली", त्याच्या या वक्तव्यावर महेश तशा अवस्थेथ देखील चिडला, "अरे भीती कसली गेल्या दोन वर्षात रो़ज अंधेरीला अप डाऊन करतो तेव्हा साध घसपटल सुद्धा नाही. आणि बहुतेक तु विसरलास, तुझ्ह्या गावी आपण ह्याच रस्त्यावरुन गेलो होतो तेही भर पावसांत. तेव्हा तर सलग तेरा तास गाडी मी एकट्यानेच चालवली होती." महेशला असे चिडलेल पाहुन दिपक पुढे झाला "अरे ठिक आहे. आता एकमेकांची माप काढण्यापेक्षा आपण लवकरात लवकर घरी कसं जाता येईल ते पाहुया." "महेश मला वाटते तुझा टाईम आज जरा वाईट आहे त्यामुळे आपण आता आपल्या जागा बदलुया तुला काही प्रोब्लेम?" गणेश ने विचारले. "नाही यार मला आता ड्राइव्ह करण शक्यच नाही, पण आधी बाईक चालु आहे का ते पहा." ते ऐकुन बाईक जवळ उभ्या असलेल्या तेजसने सांगितले, "गाडी ओके आहे फक्त इंजिनचा जरा वेगळा आवाज येतोय, तो काय सर्व्हिसिंग केलं की होईल व्यवस्थीत." फक्त आता गाडी चालवणार कोण हा यक्ष प्रश्न? अखेर सर्वांच्या संमतीने ही जबाबदारी ईनायतवर सोपवण्यात आली. त्यानेही ही ती जरा आढवेढे घेतच स्वीकारली. तेही रास्तच होतं आधीच एकाच गाडीचा एकाच दिवशी दोनदा अपघात, त्यात ज्या व्यक्तीला pulsar ह्या गाडीविषयी पहील्यापासुनच अनास्था त्याच्यावरच तिला घरपर्यंत नेण्याची जबाबदारी. सारं काही न उलगडनारं. खरचं नियतीने पुढे काय वाढुन ठेवलं असेल ह्याची कुणालाच कल्पणा नव्ह्ती.
थोड्याच वेळात सर्वजण ढाब्यावर पोहचले. ढाबा तसा छोटासाच होता पंरतु नीट नेटका होता. आत मध्ये शिरताच गाड्या उभ्या करण्या-साठी जागा, बाहेर बाकडे मांडलेले आणि जोडीला टिपीकल पंजाबी जेवणाचा वास ह्या सर्व वातावरणात तेजस मुग्ध होऊन गेला. बहुतेक त्याला सर्व गोष्टींचा विसर पडला असावा अगदी महेशला लागलय हे ही. त्याने घाई-घाईत आपली गाडी पार्क केली व महेशला तश्याच अवस्थेत सोडुन तो आणि ईनायत बाकड्यांर पळाले. गणेश मात्र सुश्यांतला आपल्या बरोबर घेऊन आत गेला झाल्या प्रकारामुळे तो जरा बिथरलाच होता. तर ईकडे दिपक महेशजवळ येऊन उभा राहीला "दुखतय का जास्त?" दिपकने विचारले "जाऊ दे रे, त्या दुखन्यापेक्षा त्याच्या बोलण्याने जास्त दुखावलोय मी. असा कसा वागु शकतो तो, अरे मी काय काल परवा गाडी चालवायला शिकलोय? काय तो म्हणे मी घाबरलो अरे असं असत ना तर पहील्यावेळी पडलो ना तेव्हाच गाडी घेतली नसती मी हातात" महेश मोठ्या आवाजात बोलला. यावर सुश्यांतनेही तिकडुन री ओढली "तुझ हे नेहमीचच आहे, जरा तुझा ईगो हर्ट झाला की बसायच ताठुन, कळतय कुणाला राग आलाय तो." "अरे इथे मला इजा झाली आहे आहे आणि तुला कळवळण्याचे कारण नाही. आणि तुझे फाल्त्तु टोमणेही नकोत ह्याच्यापुढे. क्रुपा करुन माझ्या गाडीवर बसु नका म्हणजे मी जो काही पडेल(घाबरुन किंवा चुकुन) तो माझ्या नशीबाने" महेश तावातावात बोलला. "बर झाल सुंठेविना खोकला गेला, नाहीतरी इथे कुणाला हॉस आहे दहा वेळा पडुन घेण्याची". त्याच्या या बोलण्यावर मात्र इनायत काहीसा हसला. हे पाहुन महेशने त्याच्याकडे रागात पाहीले तसा तो गप्प बसला पण सुशांतचा मात्र त्याला मनापासुन राग आला होता. एवढ्यात गणेशने मध्यस्थी केली व तो सुशांतला म्हणाला "पाटील तो काय मजा म्हणुन पडला नाही. एखादा दिवसच खराब असतो त्यात तुझ नशीब बलवत्तर की तुला फक्त खरचटलय त्याला तर लागलं ही आहे. आणि गाडीही दोनदा पडली जरा त्याच्या परिस्तीथीचा विचार करा" यावर मध्येच अपेक्षेप्रमाने तेजस बोलला "जल्ला पक्के लहानपणीचे मित्र शोभतात. आता भांडतील नी उद्या परत एक होतील. खरच ह्यांचा काही नेम नाही" आणी बहुतेकवेळा असच झाल असल्या-मुळे दोघांनीही एकमेकांडे पाहीले व हळुच दोघेही एकमे़कांकडे पाहुन हसायला लागले. हे पाहुन दिपक बोलला "ये हुयी ना बात आता जेवायला हरकत नाही" यावर इनायत म्हणाला "साला जल्दी से मंगाओ, नही तो मै भुक से तडप के मर जांऊगा" तर तेजस मात्र पदार्थांची सुची वाचण्यात दंग झाला होता. ह्या सर्व गोंधळात जेवणाची ऑर्डर घेणारा पोरगा केव्हाचा बाजुला येऊन उभा राहीला होता.
थकलेले असल्यामुळे महेश सोडला तर सर्वांनी जेवणावर येतेच्छ ताव मारला. महेशच्या ओठांना दात लागुन जखम झाली असल्यामुळे त्याने थोडासा डाळ भातच खाने पसंद केले. आलेली मरगळ झटकावी म्हणुन त्याने तोंडावर सोड्याचा प्रयोगही केला तेव्हा कुठे त्याला थोड बर वाटायला लागलं. जेवणानंतर गणेशने जमलेल्या कॉंन्ट्रीब्युशन मधुन खाण्याचे बिल पेड केले आणि सर्वांनी आपला मोर्चा बाजुच्याच पाणपट्टीच्या गादिवर वळवला. गणेश, दिपक आणि इनायत ने पान खाने पसंद केले, तर सुश्या आणि तेजस ने थोटुक पण महेश मात्र दुखर्या तोंडामुळे यापैकी कशाचाच आस्वाद घेऊ शकत नव्हता. एव्हढ्यात दिपक म्हणाला "आयला आता इथेच झोपावस वाटतयं". "वाटतय? कशावर? पाट्यावर की मिक्सर मध्ये" तेजस खुश होउन बोलला. "ए हसा रे हसा" दिपक सर्वांना उद्देशुन म्हणाला आणि तेजस सोडला तर सर्वजण मोठ्याने हसायला लागले. "हा यार कंटाळा तर आलाय पण काय करणार संध्या़काळी लक्ष्मी पुजन आहे. कोनत्याही परिस्थीतीत आपल्याला सातच्या आत घरात गेल पाहीजे." गणेश जांभयी देत म्हणाला यावर सर्वजनांनी होकार दर्शवला. "ए मी मात्र आता कुठेही थांबणार नाही. दोन तासात मुंबई ट्च" तेजस तोर्यात बोलला. यावर महेश म्हणाला "बाबा सांभळुन. आधीच माझा दिवस खराब आहे आणि ह्याच्या पुढे काही झालं तर माझी सहन करण्याची अजिबात इच्छा नाहीये" (कारण आधीच ठरल्याप्रमाणे महेश त्याच्या मागे बसणार होता). तेवढ्यात सुश्यांत महेशच्या जवळ आला, "sorry यार मगाशी जरा जास्तच बोललो", "अरे कशाला मी काय कमी शेन खाल्ल" महेश बोलला "जाऊ दे विसरुन जा, पण खर सांगु कसलीतरी विलक्षन जाणीव मला गडावर असल्यापासुनच होत होती पण त्याचा उलगडा होत नव्हता, आणि त्यानंतरच हे पडझड सत्र सुरु झालं. जसा एखादा उथळ घोडा आपल्या पाठीवर कोणालाच स्वार होऊ देत नाही तसचं काहीसं माझ्या बाईकच्या बाबतीत घडतय आज." "ए प्लीज, डरा मत तेरी गाडी को मुझे चलाना है वो भी बंम्बईतक. एक तो पहलेसेही ये गाडी मुझे पसंद नही है. साला खाली दिखती अच्छी है लेकिन कब धोका दे इसका गॅरंटी नही" यावर त्याला धीर देत तेजस बोलला "अबे साले तु तो छावा है गाडी चलाने मे" यावर दिपकने ही इनायत गाडी कशी छान चालवतो याची पावती दिली. त्यांचा आपल्याविषयीचा कौतुक समारंभ ऍकुन इनायत शहारला. त्याच्याकडे पाहुन असे वाटत होते की त्याला आता विमान जरी दिले असते तरी तो पायलटच्या सीटवरच बसला असता.
(क्रमशः)

Wednesday, July 29, 2009
खरंच सांग काय वाटते
एक तरुण आहे ज्याला एक मुलगी फार मनापासुन आवडते, दोघांचीही एकमेकांशी नेहमी नजरा-नजर होत असते. न बोलुन दोघेही मनांने भरपुर काही बोलुन जातात. तिच्यासाठी काहीही करण्याची त्याची तयारी असते. तिच्या मोहक रुपाने आणि सोज्वळ स्वभावाने त्याच्या मनाची चलबिचल अवस्था झाली आहे; पण हे सर्व त्याला तिच्या समोर व्यक्त करता येत नाही आहे. त्यामुळेच त्याने तिला काव्यरुपी साद घातली आहे ती अशी -
खरंच सांग काय वाटते
माझ्याकडे पाहुन
तुझ्यासाठी सर्वथा हा
जीव घेतलाय वाहुन
मोत्यावानी खळखळनारं
शुभ्र तुझ हसणं
चंद्राकार भुवया ताणुन
रोखुन माझ्याकडे बघनं
धारोष्ण दुधात न्हाऊन
निघालेले काळेभोर डोळे
जिव्हा तुझी अशी की
जणु गोड मधाचे पोळे
लाजाळुसारख्या झुबकेदार पापण्या
क्षणात चटकन मिटतात
लांबसडक कुंतला तुझ्या
घायाळ मला करतात
सोनचाफ्याच्या कळीसारखे
नाक तुझे नाजुक
लोण्यासही लाज यावी
असे गाल मऊ साजुक
गुलाबाच्या पाकळीसारखे
ओठ तुझे लाल
कमनीय बांधा, मोहक चाल
करते मला हलाल
खरंच सांग काय वाटते
माझ्याकडे पाहुन
तुझ्यासाठी सर्वथा हा
जीव घेतलाय वाहुन.............................!!!!!!

Tuesday, June 23, 2009
आणीबाणी - शेतकऱ्यांच्या व्यथा
आपल्या लहाणपणी आपण सर्वांनीच आणीबाणी हा शब्द इतिहासाच्या अथवा नागरिक शास्त्राच्या पुस्तकातुन अभ्यासला किंवा ऐकला असेलच. आणी-बाणी म्हणजे थोडक्यात काय तर बिकट परिस्तिथी हिच परिस्तीथी आजही आपल्या शेतकरी बांधवांना छळत आहे. दर पाच वर्षांनी नवीन सरकार आणी पुन्हा शेतकर्यांसाठी नवीन पॅकेजेस ज्याच्यात वीज, पाणी, कर्जमाफी सर्व असंत पण "कागदावरच" हे का चाललय ते आपल्या सर्वांना माहीत आहे. पण कुठपर्यंत चालणार आहे हे तर साक्षात विधात्यालाही माहीत नसेल. असो या सर्वांचा हा काव्यरुपी आढावा.
आणीबाणी जिंदगानी
हातावरल पोट त्यात सरकारी मनमानी
खिशात नाही दमडी त्यात छ्ळतो उर्मठ वाणी
आणीबाणी......
आणीबाणी जिंदगानी
पॅकेजं नवीन पण सवय ह्यांची जुनी
नळ आहे त्यात नाही पाणी
आणीबाणी......
आणीबाणी जिंदगानी
पोरांचा व्याप दु:खी कारभारनी
मिळकतच कमी म्हणुन सुरत आमची रोनी
आणीबाणी......
आणीबाणी जिंदगानी
काढलय कर्ज वाढलीयेत देणी
अहो आमचीच लोकशाही ठरली जीवघेनी
आणीबाणी......
आणीबाणी जिंदगानी
राज्य बळीच आम्ही मानसं गुणी
दिमत आमची कमी तरी हा शेतकरी मनानं धनी
आणीबाणी......
- श्रीमत् ( महेंन्द्र लक्ष्मण कदम)
आणीबाणी जिंदगानी
हातावरल पोट त्यात सरकारी मनमानी
खिशात नाही दमडी त्यात छ्ळतो उर्मठ वाणी
आणीबाणी......
आणीबाणी जिंदगानी
पॅकेजं नवीन पण सवय ह्यांची जुनी
नळ आहे त्यात नाही पाणी
आणीबाणी......
आणीबाणी जिंदगानी
पोरांचा व्याप दु:खी कारभारनी
मिळकतच कमी म्हणुन सुरत आमची रोनी
आणीबाणी......
आणीबाणी जिंदगानी
काढलय कर्ज वाढलीयेत देणी
अहो आमचीच लोकशाही ठरली जीवघेनी
आणीबाणी......
आणीबाणी जिंदगानी
राज्य बळीच आम्ही मानसं गुणी
दिमत आमची कमी तरी हा शेतकरी मनानं धनी
आणीबाणी......
- श्रीमत् ( महेंन्द्र लक्ष्मण कदम)
Subscribe to:
Posts (Atom)