रविवार, सट्टीचा दिवस असल्यामुळे मन्या असाच बिछान्यावर लोळत पडला
होता. इतक्यात किचन मधुन आवाज आला. " अहो" अहो,उठा आता "सकाळचे"बारा
वाजलेत. (हे वाक्य म्हणताना अर्थात बारा या शब्दावर बारा हजार टनांचा जोर.)
कि सुट्टी आहे म्हणुन सबंध दिवस असेच लोळत पडणार आहात. मी ऐकुन न
ऐकल्यासारखे केले. आणि पुन्हा दुसर्या बाजुला वळकटी करुन लोळु लागलो. पाचच
मिनिटांनी परत तोफ कडाडली .काय म्हणावं अश्या वागण्याला? लोकांची दुपारची
जेवंण होऊन वामकुक्षीची वेळ झाली तरी या मानसाच्या आंघोळीचा पत्ता नाही.
तरी काल म्हणत होते शनिवार आहे जरा लवकर जेऊन घेऊ आणि झोपु. पण उपवासामुळे
स्वारी जेवली लवकर पण झोपायच्या नावाने बोंब, पायाला नुसती भिंगरी बांधलेली
हा जरा आलो म्हनुन जे बाहेर गेले ते थेट रात्री तीन वाजता उगवले.
आता मात्र माझा "खुब-लढा" बुरुज ढासळण्याच्याच बेतात होता. शेवटचा उपाय म्हणुन डोक्याखालची उशी कानावर घेतली आणि माझ्या परीने बचावाचा अल्पसा प्रयत्न केला. पण समोरील शत्रुसुद्धा काही कमी ताकदीचा नव्हता. मला अशा पवित्र्यात पाहुन तर तिने अजुनच आक्रमक पवित्रा घेतला."अहो अजुन एक उशी घ्या. एकीने काय होनारयं, आज मी गप्प राहणार नाही.
तिची शेवटची ओळ ऐकुन तर माझं मुठी एवढं काळीज ताशी एकशे वीस मैलाने धडधडु लागले. तरीही मी तसाच निपचित पडुन राहीलो तर तिने थेट मला गदा-गदा हलवायलाच सुरवात केली. तेव्हा मला भिमाकडील अस्त्राला गदा का म्हणतात ह्याचा साक्षात्कार झाला. आता मला शरण पत्करण्याशिवाय गत्यंतर नव्हते नाहीतर जरासंधाचे जे हाल झाले ते पुढच्या पाचंच मिनिटात माझे होण्याची शक्यता होती.
मी लगेचच सावध पवित्रा घेतला आणि नुकताच झोपेतुन उठलोय या अर्विभावात डोळे चोळत म्हणालो हाय डार्लिंग "गुड मॉर्निंग, आणि तसाच चालत बेसीनच्या दिशेने निघालो, एवढ्यात बेछुट गोळीबार व्हावा त्याप्रमाने एका मागुन एक वाक्ये माझ्या दिशेने यायला लागली, अरे मानसा जरा शरम कर शरम, जनाची नाही मनाची तरी, तेवढ्यात तिला उगाच डिवचन्यासाठी मी म्हणालो तनु दारात आलेल्या व्यक्तीस असं डावलु नये जा घाल काही तरी त्याच्या झोळीत........! "मन्या, फालतुगिरी पुरे दारात कुनीही नाहिये. आणि तुलाही हे चांगल्यारीतीने माहित आहे की हे मी तुला बडबडत आहे.
मी समोरील केस मधुन पेस्ट घेत तोंडातल्या तोंडात पुटपुटलो "माहीत असुन सांगणार कुणाला"? आणि तलवारीसारखा ब्रश चालवु लागलो.इतक्यात गॅसवर काहीतरी ठेवले आहे या जाणिवेने ती पुन्हा किचण मध्ये गेली. बाजुला किर्रर्र.... स्मशान शांतता पसरली आणि मनात विचार आला माझ्या बायकोसारख्या आठ-दहा जनी अजुन गोळा करुन जर त्यांची बटालियन केली तर त्यांच्या आवाज आणि टोमण्यांनी शत्रुला मागे हटण्याशिवाय पर्याय उरणार नाही.स्वताच्याच पि.जे वर खुश होऊन मी ब्रुश अक्ष:रशह
तोंडात खुपसु लागलो आता माझ्या अंगात विरश्री संचारली होती, पण लगेच तोंडात नेहमीपेक्षा जरा जास्तच फेस होउ लागला आणि चवही फारच वेगळी असल्याकारणाने मी थुंकण्यासाठी (ओकन्यासाठी) बेसीनमध्ये मध्ये वाकलो असता तोंडातुन पेस्ट ऐवजी फुगे येउ लागले. त्याचक्षणी माझी नजर पुन्हा केस वर गेली तर टुथपेस्ट तिथल्या तिथेच निपचित पडुन होती. मीच मगाशी जोश मध्ये आमच्या सौंचा फेस वाश घेतला होता.
इतक्यात आतुन एकलव्याच्या बाणाप्रमाणे धार-धार टोमणा बाहेर आला. अरे मन्या फेस वाश वापरुन काय दात सफेद होनार आहेत तुझे त्यापेक्षा हार्पिक का नाही वापरत," एकदम जालीम उपाय! मी मनात म्हणालो आयला हिला महाभारतातल्या संजय प्रमाणे सिद्धी वैगरे प्राप्त झाली कि काय? नाहीतर किचन मधुन थेट बाथरुम जवळचं प्रक्षे"पण" हीला कसं समजलं? आणि मगाशी मुखातुन निघालेल्या असंख्य फुग्यांपैकीचे काही फुगे हॉलमधील पंख्याला लागुन फुटताना दिसले तेव्हा उलगडा झाला.
हे बघ मन्या ती तोर्यात बाहेर येत म्हणाली, आता तुला आंघोळ करावीशी वाटली तर कर नाहीतर नको करुस. आणि भुक लागलीच तर ज्यांच्याबरोबर रात्री तीन वाजे पर्यंत होतास ना त्यांनाच सांग तुला करुन वाढायला. तिची वाक्ये पुर्ण होईपर्यंत मी दरवाजा (स्नान-ग्रुहाचा) बंध करुन धडाधड बादली रिकामी करायला सुरवात देखील केली परंतु कान मात्र बाहेरील तंग वातावरणाचा आढावा घेण्यातच दंग होते, मी आतुनच ओरडलो तनुssssssss माझा टोवेल देतेस प्लीज.
माझा बांध तुटला रे आता! तुला काहीच कसं कळत नाही, या वाक्याबरोबर धाडकन माझा वार्डरोब उघडण्याचा आवाज आला.आणि परत एकदा भयाण शांतता पसरली....
मी हळुच दरवाजा उघडुन बाहेर आलो. अर्थात टॉवेल लाऊन जो मी मगाशीच आत नेला होता. तर तनु शांतपणे एका हातात तिची आवडती मोगर्याची वेणी आणि दुसर्या हातात मी आनलेले गिफ्ट आणि त्यावर लावलेला मजकुर वाचण्यात दंग होती.
माझी प्रिय बायको,
तनु ,
जी माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर स्त्री आहे!"तनु माझं तुझ्यावर खरंच फार प्रेम आहे तुझा आणि फक्त तुझा,
मनोहर..........!
तिच्या नकळत मी केव्हा तिच्या मागे आलो आणि कधी तिच्या खांद्यावर हात ठेवले हे तिला देखील कळले नाही, मी काही बोलणार इतक्यात मी तिच्या मिठीत विसावुन देखील गेलो होतो. मी हळुच माझा हात तिच्या केसांतुन फिरवत म्हणालो “अग वेडाबाई तुला वाटल तरी कसं? की मी आपल्या लग्नाचा वाढदिवस विसरेण म्हणुन, मला फक्त तुला सरप्राईज द्यायचे होते. म्हणुन तर कालच सर्व तयारी करुन ठेवली. आणि जेवल्यावर आधी सर्व वेताळांना म्हणजे माझ्या मित्रांना पार्टी दीली कारण त्याचासाठीच गेले दोन-एक महिने ते आपल्या पेक्षाही आतुरतेने ह्या क्षणाची वाट पाहत होते. पण कालच त्यांना मी खडसाऊन सांगितल उद्या नो फोन कोल्स नो विझिट, उद्याचा सबंध दिवस फक्त आणि फक्त मी माझ्या बायकोला देणार आहे.
आता जा आणि लवकर तयार हो मस्त पैकी, आपण तीन च्या शोला चाललोय. त्यानंतर सी-फेस मग छानपैकी जेऊया. माझा बेत पुर्ण व्हायच्या आतच तनु बेडरुम मध्ये पळाली होती.........

3 comments:
good going
Thanks Nik,
Keep Reading Mine Blog.
:)
sahi man...
khupp chhan..hasta hasta purevt..
asch lihat raha..
bahuda eka divasat tumche sagle blog aaj vachun kadhen mi.. mastch vachatch rahavsa vatta.
keep going..will keep reading..
all d best.
Post a Comment