Featured Post

रोज मरे........

नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० चा गजर लाऊन ७.३० लाच उठलो, अर्थातच आजही व्यायाम करायचा राहीला होता. डोळे चोळत असतानाच डो़क्यात जो काही विचार पहीला आ...

Monday, August 2, 2010

आज पुन्हा मला भिजावसं वाटतय………

तसा हा अनुभव प्रत्येकाच्याच आयुष्यात केव्हा ना केव्हा तरी आलेला सकाळी कामावर जायची घाई असतानाच वरुण राजा (वरुन) जोरात बरसायला लागतो, अंगाची लाही लाही होत असताना असं वाटते की सर्व बंधने झुगारून टाकून पावसात मस्त भिजावं आणि...........आणि बरोबर आपल्या आवडीचं कुणीतरी असाव, (कुणीतरी ह्याच्यासाठी की हल्ली मोबाईल सारख्या "आवडीही" दर दिवसाला बदलायला लागल्यात). कधी कधी तसं होतं ही पण समोर आलेली ती स्वप्न सुंदरी क्षणात मनाला चुटपुट लाऊन नजरेआड होते..........



आज पुन्हा मला भिजावसं वाटतय

चाकरमाणी मन ओढ चाकरीची धरतय,

बॅग छत्री सावरता मध्येच तीही भिजलेली दिसली

नयन भेट होता आमुची कळी मनात उमलली,

मनात आल किती दिवस अस एकट्यानेच भिजायचं

समुळ पावसात भिजुनही असचं कोरड जगायच,

निश्चय केला मनाशी आजच सोडायचा बावळटपणा

जाऊन थेट विचारायच तिला तिथेही नडला आळशीपणा,

कधी नव्हे ती आजच बस ही वेळवर आली

माझं तिकीट काढताच मुळी तीही वेळवर निघाली,

रागावून स्वतालाच मी शाप शिव्या दिल्या

वळुन फिरुन गाढवच मी त्याही डोक्यावरुन गेल्या,

धांदलीत सर्व या भांबावुन पुरता गेलो

धावत पळतच कचेरीत शिरलो आज पुन्हा मी लेट झालो.............



-श्रीमत्

(महेन्द्र लक्ष्मण कदम)