Featured Post

रोज मरे........

नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० चा गजर लाऊन ७.३० लाच उठलो, अर्थातच आजही व्यायाम करायचा राहीला होता. डोळे चोळत असतानाच डो़क्यात जो काही विचार पहीला आ...

Tuesday, September 13, 2016

हसतेस भारी तु जेव्हा........



हसतेस भारी तु जेव्हा........

एक प्रियकर आपल्या लाड्क्या प्रेयसीची एक  
झलक पाह्ण्यासाठी काळ, वेळ, स्थळ यापैकी कशाचीच तमा बाळ्गता जीवाचा आटापिटा करत आहे. अशा अनेक प्रेमवीरांसाठी हे गानं समर्पित.



हसतेस भारी तु जेव्हा, जीव वरती खालती होतो

मीलनाची उत्कट आशा, मीलनाची उत्कट आशा, II२II

दिन उगाच भटकत जातो.

हसतेस भारी तु जेव्हा.....



चनीदार ळी गालावर, अन मासोळीपर डोळे II२II

तु उगाच बघते जेव्हा, तु उगाच बघते जेव्हा

जीव पार गांगरुन जातो.

हसतेस भारी तु जेव्हा.....



मुखदर्शन रोज घडावे, ही आस जीवाला मनभर II२II

तु मध्येच वाट बदलते, तु मध्येच वाट बदलते

मी वाट चुकावे क्षनभर.

हसतेस भारी तु जेव्हा.....



तव स्मरता रोज तुला, मी, हा वेळ संपुनी जातो II२II

ही वेळच क्षणिक आहे, ही वेळच क्षणिक आहे,

मी रोज मला समजवतो.



हसतेस भारी तु जेव्हा, जीव वरती खालती होतो

मीलनाची उत्कट आशा, मीलनाची उत्कट आशा,II२II

दिन उगाच भटकत जातो.

हसतेस भारी तु जेव्हा.....



श्री सलील कुलकर्णी यांच्या नसतेस घरी तु.. या चालीवर आधारीत.

समाप्त.

श्रीमत (महेन्द्र लक्ष्मण कदम)