Featured Post

रोज मरे........

नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० चा गजर लाऊन ७.३० लाच उठलो, अर्थातच आजही व्यायाम करायचा राहीला होता. डोळे चोळत असतानाच डो़क्यात जो काही विचार पहीला आ...

Sunday, September 25, 2016

बॅनरबाजी - हल्ली छोटी छोटी कामं करुन मोठे मोठे बॅनर लावायची फ़ॅशन झाली आहे.हल्ली छोटी छोटी कामं करुन मोठे मोठे बॅनर लावायची फ़ॅशन झाली आहे.  तुमच्या आमच्या सारख्या प्रत्येक सामान्य माणसाला छळनारी बाब म्हणजे अनधिकृत "बॅनरबाजी" किंवा "चमकेशगिरी" मग तुम्ही कुठेही रहात असाल अगदी चांदा ते बांदा. तुम्ही कोणत्याही स्टेशनला उतरुन बाहेरचा रस्ता धरलात की सर्वात पहील तुमच लक्ष क्लासवाले वेधतात. त्यांच्या जाहीरातील्या मुलांचे केविलवाने फोटो आणि पैकीच्या पैकी मार्क्स पाहीले की आपण मनातल्या मनात चरफडतो कारण आपली पहीली ते पदवी पर्यंतची टोटल पण त्यांच्या टक्क्यांएवढी नसते.

थोड पुढे गेलात की पार्ट टाईम, फुल टाईम, वर्क फ्रॉम होम (जॉब) वाले फक्त फोन नंबर देऊन उत्सुकता निर्माण करतात. कॉल करुन जाऊन आल्यावर कळत की ती एक गल्लाभरु एजन्सी आहे जी तुम्हाला स्वप्न दाखवुन फक्त पैसे उकळते.

त्यांच्या वरुन नजर हटते न हटते तोच स्वपनातल्या घरांमध्ये आपण हरवुन जातो त्यांच्या किंमती पण फक्त काही लाखात/करोडात असतात. भरमसाठ जाहीराती पाहुन आत्तापर्यंत तुमच रक्त खवळलेल असतं तुम्ही रागारागात स्टेशनच्या बाहेर पडुन मुख्य रस्त्यावर येता तोच समोर माननीय नगरसेवक/आमदार/खासदार मोठ्या फलकावर विराजमान झालेल दिसतात. कारण काहीही नसतं एकतर त्यांचा वाढदिवस असतो अथवा त्यांनी फार महत्वाच काम केलेल असतं जसं की वह्या वाटप, छ्त्री वाटप, व्रुक्षारोपन, रक्तदान शिबीर, ज्यात त्यांना काडीचाही रस नसतो पण करुन दाखवल अस लिहुन फक्त चमकेश गिरी करायची असते. त्यातपन ज्यांना त्या वॉर्ड अथवा विभागाने ओवाळुन टाकलेल असतं तेच त्या फलकांवर साहेबांच्या फोटो खाली ,चिटनीस, संपर्क प्रमुख, विभाग प्रमुख, युवा नेता, प्रभाग अध्यक्ष अशी बिरुदं लावुन अंगावरील सोन्याच प्रदर्शन करत डोळे वटारुन आपल्यकडे पाहात असतात. दाखवल म्हणुन बोंबलत फिरणार.वास्तविक तुम्हाला लोकप्रतिनीधी म्हणुन जनतेने विश्वासाने निवडुन दिलय ते तुमच कामच आहे. पण हल्ली साहेबांच्या कामांपेक्षा साहेब आणि त्यांचे शेपुट हलवेच जास्त दिसतात बॅनर वर.

मध्यंतरी एके ठिकानी एका लिंबु्टिंबु मंत्र्याने कुठलाश्या रोडच सिमेंटीकरन करुन स्वताच्या फोटोसकट मोठा बॅनर लावला. " वचनपुर्ती ", मी नक्की काय प्रकार आहे म्हणुन पाहायला गेलो तर मुख्य रस्ता ते अमुक एका सोसायटी पर्यंतचा फक्त १०० मीटर रस्ता शेनाने सारवल्यासारखा सिमेंटने सारवला होता. त्याच्यापुढच्या रस्त्याची परिस्थीती जैसे थे.

नेते तर सोडा ह्यांच्या बायका मुलांचे वाढदिवस, मुंज, बारस, साखरपुडे, लग्न हे तर राष्ट्रीय सोहळा असल्यासारखे साजरे होतात. प्रत्येक सिग्नल, सर्कल अथवा चौकात हे भाई, दादा, बाबा, शेठ कटआऊट मधुन असे काही हसतात की जणु त्यांना माहीत आहे तुम्ही त्यांच काहीच वाकड करु शकत नाही.

मला एक सामान्य प्रश्न पडलाय आता म्हणे पानीपुरी, वडापाववाले यांच्यावर ही इन्कम टॅक्स वाले छापे घालणार आहेत. मग बॅनरवर सोन्याच ओंगाळवाने प्रदर्शन करणारे यातुन कसे निसटतात? आता जो दागिनेच फक्त करोडोंचे घालतो तो नक्कीच आपल्यासारखा ट्रेनचे धक्के खात नाही, १२ तास ऑफीस मध्ये काम करत नाही. ईमाने इतबारे टॅक्स भरत नाही. रीटर्न फाईल करत नाही. मग येवढा पैसा आणि माज येतो कुठुन?


मध्यंतरी मी एका राजकीय नेत्याला याबाबत हटकल असता त्याने मोठ्या मिजाशीने मला उत्तर दिल "भाऊ जलती हे दुनिया जलानेवाला चाहीये." तुम्हाला पोश्टरचा त्रास आहे की माझ्या प्रसिद्धीचा? मला माझ्याच कानाखाली मारुन घेतल्यासा्रख झालं. "सण" आल्यावर तर यांचे बॅनर बघुन आपल "आवसन" गळतं. मागे ठाण्याला "लाखांच्या" दहीहंडीचा बॅनर लावला होता. फक्त त्या बॅनर वरच्या फोटोतले टोनगे जरी एकत्र आले असते तरी आरामात ९ थर लागले असते. नंतर गणपती, नवरात्र, दिवाळी आहेच.

जे लोक घरात साधी अगरबत्ती पेटवत नाहीत अथवा घरातल्या तुळशीला साधं पेलाभर पाणी घालु शक्त नाहीत त्यांचे व्रुक्षारोपनाचे बॅनर व बॅनरवरचे सात्वीक चेहरे पाहीले की संत मंडळी सुध्दा फिकी वाटतात.  वास्तविक हाय कोर्टाने खडसाऊन सुद्धा ह्या पोश्टरबाजी वर जराही फरक पडलेला नाही. त्यात नगर अधिकारी वा एखादा सजग नागरीक काही बोलायला गेला तर या गूंड नेत्यांची अरेरावी त्याला सहन करावी लागते. 

हे सर्व अश्याप्रकारे लिहीण्याचा प्रपंच ह्याच्यासाठीच की ह्या अनधिक्रुत पोस्टर अथवा जाहीरात बाजीमुळे शहरं बकाल दिसु लागली आहेत. कित्येकदा वाहन चालकांना ह्या होर्डिंग्जमुळे सिग्नल्स न दिसल्यामुळे अपघातांना सामोर जावं लागत.
आपल्या लहानपणी कोणी आपल्याला विचारल तु मोठा/मोठी होऊन कोण होणार? तर उत्तरं असायचीत, डॉक्टर, इंजीनियर, वकील अगदीच क्रिकेटवेडा असेल तर सचिन तेंडुलकर पण हल्ली सर्वांना फक्त फेमस व्हायचय.  मग त्यासाठी कमरेच सोडुन डोक्याला बांधायची पण यांची तयारी आहे. मनी आणि मसल पॉवरपुढे सामान्य माणुस मात्र भरडला जातोय.

Note: all photos downloaded from google images.

Bombay High Court orders drive to remove illegal hoardings

Tuesday, September 13, 2016

हसतेस भारी तु जेव्हा........हसतेस भारी तु जेव्हा........

एक प्रियकर आपल्या लाड्क्या प्रेयसीची एक  
झलक पाह्ण्यासाठी काळ, वेळ, स्थळ यापैकी कशाचीच तमा बाळ्गता जीवाचा आटापिटा करत आहे. अशा अनेक प्रेमवीरांसाठी हे गानं समर्पित.हसतेस भारी तु जेव्हा, जीव वरती खालती होतो

मीलनाची उत्कट आशा, मीलनाची उत्कट आशा, II२II

दिन उगाच भटकत जातो.

हसतेस भारी तु जेव्हा.....चनीदार ळी गालावर, अन मासोळीपर डोळे II२II

तु उगाच बघते जेव्हा, तु उगाच बघते जेव्हा

जीव पार गांगरुन जातो.

हसतेस भारी तु जेव्हा.....मुखदर्शन रोज घडावे, ही आस जीवाला मनभर II२II

तु मध्येच वाट बदलते, तु मध्येच वाट बदलते

मी वाट चुकावे क्षनभर.

हसतेस भारी तु जेव्हा.....तव स्मरता रोज तुला, मी, हा वेळ संपुनी जातो II२II

ही वेळच क्षणिक आहे, ही वेळच क्षणिक आहे,

मी रोज मला समजवतो.हसतेस भारी तु जेव्हा, जीव वरती खालती होतो

मीलनाची उत्कट आशा, मीलनाची उत्कट आशा,II२II

दिन उगाच भटकत जातो.

हसतेस भारी तु जेव्हा.....श्री सलील कुलकर्णी यांच्या नसतेस घरी तु.. या चालीवर आधारीत.

समाप्त.

श्रीमत (महेन्द्र लक्ष्मण कदम)


Sunday, August 14, 2016


श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे 

श्रावण म्हटलं की आज ही मला बालभारतीतल्या पुस्तकातली बालकवींची कविता आठवते, कविता वाचताना त्यातली तैल रंगातली हिरवीगार चित्र पाहून मन नकळत त्या भावविश्वात पोहचायचं.

               आमच्या लहानपणी गटारी संम्पली की घराघरात श्रावणाची लगबग चालू व्हायची, उन्हाळ्यात खपून वाळवून बनवलेल्या कुरडया, सांडगे, पापड, ताकातल्या मिर्च्या सारं या महिन्यांत खायला मिळायचं, आई दर सोमवारी नाक्यावरून  केळीची पानं आणायची, त्यावर मग वरण-भात, तुप, लोणचं, पापड, भजी आणि जोडीला एखादी  पालेभाजी, आईचा नैवेद्द्य दाखवुन होइपर्यंत सात-आठ आवँढे गिळून व्हायचे. आता भरपूर महागड्या हॉटेल्स मध्ये जेवण होतं पण त्याने फक्त पोट भरते तृप्तीचा ढेकर त्यात नाही. तेव्हा आम्ही मुलं नाग पंचमी,रक्षाबंधन, दहीहंडी सर्व सणांना फुल धिंगाणा घालायचो.  आमची लुटुपुटुची भांडण, कटटी-बटटी सतत चालूच असायचं पण निस्वार्थ प्रेम असायचं त्यात , नाही म्हणता पहिली घटक चाचणी पण याच महिन्यात असायची पण फिकीर कोण करतो.  
 
  आज काळानुसार वय बदललं, जागा बदलली, आयुष्याच्या प्रवाहात भरपूर गोष्टी मागे पडल्या, श्रावणही  बदलत चाललाय किंबहुना तो बदलतोय कारण हल्ली माझी चिमुरडी "Rain Rain Go Away, Come Again Another Day" म्हणत असते. पण या ओळींना येरे येरे पावसाची सर नाही , ई श्रावण पाळणार्यान्ची नवी पिढीही सद्द्या फोफावतेय.

खरच आपल्या हातात काहीच नसतं, पण काहीही नसलं........
 तरी श्रावण आणि आपलं एक नातं असतं,
 शाकाहारी बॅंकेत महिनाभर खातं असतं.


गटारी संपुन लागते श्रावणाची चाहुल,
नाग पंचमी राखी पुनव सनासुदीचा माहौल,
पुरणपोळी नैवेध्य खाऊन तृप्त व्हायच असत,
श्रावण आणी आपलं एक नातं असतं,
शाकाहारी बँकेत महीनाभर खातं असतं...

कान्हाचा जन्म, सुटे अष्टमीचा उपवास,
थरावर थर लागे दह्या दुधाची आस,
खांद्याला खांदा लाऊन भीडायच असतं,
श्रावण आणी आपलं एक नातं असतं,
शाकाहारी बँकेत महीनाभर खातं असतं...

ना अंडी, ना मटन, 
ना मासे, ना चिकन,
वाटलच तर सोयाबीन मशरूम चवीने खायच असतं,
श्रावण आणी आपलं एक नातं असतं,
शाकाहारी बँकेत महीनाभर खातं असतं...

ना चकना, ना दारू,
ना माडी, ना पारू,
बगळयासारखं बारकडे कुढत बघायचं असतं,
श्रावण आणी आपलं एक नातं असतं,
शाकाहारी बँकेत महीनाभर खातं असतं...

गरम भात साजुक तुप,
फळे भाज्या महाग खुप,
मन मारत महीनाभर सात्विक जेवायचं असतं,
श्रावण आणी आपलं एक नातं असतं,
शाकाहारी बँकेत महीनाभर खातं असतं...

ना कथा, ना कादंबरी,
ना हँरी पाँटर, ना कसल्या खबरी,
नाथ भागवत-शिवलीलामृत मनापासुन वाचायच असतं,
श्रावण आणी आपलं एक नातं असतं,
शाकाहारी बँकेत महीनाभर खातं असतं...

गरम चहा जोडीला मैत्रीचा कट्टा,
गर्दीत भाऊ सार्या ग्रुप आपला मोठ्ठा,
डे साजरे करत सारे प्रेमात भिजायच असतं,
श्रावण आणी आपलं एक नातं असतं,
शाकाहारी बँकेत महीनाभर खातं असतं...

कधी ऊन, कधी पाऊस, श्रावण म्हणजे एक भास,
श्रावण म्हणजे चाहुल नवी सृजनाचा नवा ध्यास,
आठवणीच्या हिंदोळ्यार झुलून गार व्हायचं असतं,
श्रावण आणी आपलं एक नातं असतं,
शाकाहारी बँकेत महीनाभर खातं असतं...

वर्ष बदलते, महीना बदलतो,
वयापरत्वे श्रावणही बदलतो,
नव्या पिढीला परंपरेच वा देऊन जायच असतं.....
श्रावण आणी आपलं एक नातं असतं,
शाकाहारी बँकेत महीनाभर खातं असतं...

-श्रीमत् 
(महेन्द्र लक्ष्मण कदम)