Featured Post

रोज मरे........

नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० चा गजर लाऊन ७.३० लाच उठलो, अर्थातच आजही व्यायाम करायचा राहीला होता. डोळे चोळत असतानाच डो़क्यात जो काही विचार पहीला आ...

Wednesday, September 2, 2009

दु चाकी - भाग 9 (शेवटचा)

थोड्याश्या विश्रांती नंतर सर्वांनी निघण्याचे ठरवले. "मी आता कोणासाठीही थांबणार नाही" तेजस बिनदिक्कत सर्वांसमोर बोलला. "आयला बरच आहे, सुंठेवाचुन खोकला गेला" दिपक खुश होऊन म्हणाला. यावर काही प्रतिक्रिया न देता तेजसने फक्त डोळे वटारुन त्याच्याकडे पाहीले व तो आपल्या बाईक-कडे रवाना झाला. "शिट...शिट......." गणेशला असे त्रयस्त उद्-गार काढलेले पाहुन सुश्यांत ने त्याला विचारले "काय रे, काय झालं?" "अरे काय होणार, मोबाईल ची बॅटरी ऑफ झाली. घरुन एक अर्जंट फोन येणार होता" "अरे हो यार, फारच मोठी पंचाईत झाली आपली", दिपक बोलला. "आपली म्हणजे???" सुशांत ने री ओढली. "अरे तेजसचा आणि महेशचा मोबाईल आपण गडावर होतो तेव्हाच बंद पडलाय. माझाही एक दोन तासच तग धरेल, मग संवाद साधायचा कसा? त्यात सकाळपासुन आपली उडालेली तारांबळ", "तसं टेन्शन घेण्याचं कारण नाही. माझं भ्रमणयंत्र अजुनतरी चालु आहे" सुश्यांतने कळवले. त्याचं बोलनं मध्येच तोडत काहीसं मिश्किल हसत तेजस बोलला "अरे संवाद साधायला आपण काही पत्रकार परिषद बोलावली नाहीये." "ए बाबा तु महेशला घे आणि हो पुढे", गणेश उद्-गरला. "तो तर मी जाणारच आहे आणि तुम्हीही या लवकर, नाहीतर एन दिवाळीत घरुन असे काही बांबु पडतील की अवघड जागी दुखनं होऊन बसेल हा हा हा........." निघन्याच्या अगोदर महेश दिपक आणि इनायत जवळ आला व त्याने शांत स्वरात त्यास गाडी जपुन चालवण्याची सुचना केली आणि पुन्हा सर्वजण बाईक्सवरती आरुढ झाले तेजस-महेश, ईनायत-दिपक आणि गणेश-सुश्यांत.

ढाबा सोडुन चांगले दिड-दोन तास झाले असतील. सवयीप्रमाणेच तेजस सर्वांच्यापुढे गाडी रेमटवत होता. महेश आपला त्याच्याच गुढ विचारात रमला होता. त्याला राहुन राहुन तेच आठवत होतं आणि मग मन उदास होत होतं. काल एवढ्या खुशीत निघालो, रात्रीचा तो थरारक प्रवास, शरीराने थकवणारी परंतु मनाला तजेला देणारी दुर्ग भ्रमंती, सार काही व्यवस्थीत चालल होतं पण....... ह्या पण चेच उत्तर काही केल्या मिळेनासे झाले होते. ह्या मनातील गुंता-गुंतीचा विचार करताच त्याची नजर सभोवतालच्या नजार्‍यावरती फिरत होती. वाकण, नागोठणे अशी एक एक करुन गावं मागे पडत होती. घड्याळाच्या वेगाबरोबर गाडीचाही वेग तेजस ने वाढता ठेवला होता. तो इतक्या निर्दयीपणे गाडी रेटत होता की काही क्षणी महेशला असे वाटलं की आत्ता आपण दुसर्‍या गाडीखाली जाऊ आणि क्षणात............... बस विचारही न केलेला बरा तो मनाशीच म्हणाला. पण पुन्हा कधीही ह्या रा़क्षसाच्या मागे असं जीव मुठीत घेऊन बसायच नाही याचा त्याने निर्धार केला. वडखळ नाका मागे पडल्यानंतर तेजसला उधानं चढल, त्याने आपला वेग अजुन वाढवला. बहुधा त्याचामुळेच त्याच्या बाईकचा स्पीडोमीटर बिघडला असावा. साधारण वढखळ ते जे.न.पी.टी हे अंतर तासाभराचे, परंतु तेजसने फक्त अर्ध्या तासात हे अंतर लीलया पार केले. अखेर न राहावुन महेशने तेजसला विचारले, "अरे दोन तास उलटुन गेले पण अजुन कोणाचाच पत्ता नाही. एखादा पीसीओ पाहुन जरा गाडी बाजुला लाव." "हा यार! मलाही तेच वाटत होतं", "आणि तरीही तु गाडी पळवतोयस" महेश चिडुन बोलला. "ठिक आहे बाबा, चिडु नकोस." असं म्हणत त्याने गाडी रस्त्याच्याच बाजुला एका छोट्याश्या टपरीवर लावली. गाडीवरुन पायउतार होताच महेशने तेजसला कोपरापासुन हात जोडले, "बस्स आज मजबुरी म्हणुन बसलो पण ह्यापुढे कधीच नाही", "अरे समजुन घेना सोन्या, काही करुन मला ६ वाजेपर्यंत घरी पोहचायचे आहे" तेजस विनंतीच्या स्वरात म्हणाला, "अरे असाच गाडी चालवशील ना तर नक्कीच पोहचशील, पण घरी नाही मो़क्षाला", महेश खोचकपणे बोलला. "हे बघ, मी गाडी आठवीत असल्यापासुन चालवतोय आणि माझी गाडी मला कधीच अशी धोका देत नाही समजलं. ते जाऊ दे ४.३० वाजलेत आणि आपण पणवेलच्या बॉर्डरवर आहोत, म्हणजे तासाभरात घर्र्.............री". "अरे धीर धर. आधी हे चौघे कुठे आहेत ते तर पाहु" महेश बोलला. "साला गणेश सोड. त्याची तर सवयच आहे कुर्मगतीने चालवण्याची. पण इनायत एवढ्या मागे पडणं अशक्य आहे. मला वाटत गाडीत काही तरी बिघाड झाला असावा, नाहीतरी दुसर्‍यांदा पडली तेव्हा जरा वेगळाच आवाज येत होता" तेजस चिंतातुर होत बोलला. "ए, इथे आधीच टेन्शन आहे अजुन घाबरवू नकोस" महेश रिसीव्हर कानाला लावत बोलला. झाल्या प्रकारांमुळे महेशच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. सर्वात पहीला त्याने दिपकचा नंबर ट्राय केला परंतु तो नॉट रिचेबल लागत होता. नतंर त्याने सुश्यांतचा फोन ट्राय केला. यावेळी मात्र रिंग वा़जली आणि क्षणात समोरुन सुशांतचा रडवेला आवाज आला.

सुशांत : अरे कुठे आहात तुम्ही, आत्ताच्या आत्ता परत या तुझ्या गाडीला पुन्हा अपघात झालाय एका दमात तो सर्व बोलला.

महेश : पाटील आता भंकस नको बस झाल आता अपघात अपघात खेळनं.

सुशांत : अरे मी खरंच भंकस करत नाहीये, तुझ्या गाडीचा आणि एका इंडीका कारची वाकण येथे जोरात टक्कर झाली आहे... प्लीज तुम्ही परत या काही करुन.

महेश : ठीक आहे तु काळजी करु नकोस कुणाला काही लागलय का?

सुशांत(रडवेल्या स्वरात) : अरे मला तर काहीच सुचत नाहीये इनायतची तर गुढघ्याची वाटीच फुटली आहे. दुखापत एवढी जबर आहे की तो पुन्हा normal चालु शकेल की नाही याची शंका वाटते. आणि दिपकच्या पायांनाही भरपुर घसपटलय. परंतु ईनायतच्या गंभीर दुखापतीपुढे त्याच्या जखमांचे भानच कुणाला राहील नाहीये. तरीही तो ठिक आहे. तुम्ही आधी कुठे आहात ते सांगा.

महेश : हे बघ आम्ही आत्ताच पनवेलच्या जवळपास पोहचलो आहोत. पण तु काळजी करु नकोस आम्ही लगेचच निघतो. आणि गणेश, दिपक कुठे आहेत?

सुशांत : काही वेळापुर्वीच ते त्याला गाडीत घालुन जवळच्याच हॉस्पीटल मध्ये गेलेत. मी इथे अपघातस्थळी उभा आहे व तुझी गाडी ही इथेच आहे. तर गणेशने त्याची गाडी इथे जवळपासच एका दुकानात ठेवली आहे ती तो उद्द्या किंवा परवा येऊन घेऊन जाणार आहे. मांझ तर डोकच काम करत नाहिये.

महेश : हे बग तु आधी शांत हो आणि व्यवस्थीत सांग पाहू कुठे यायच ते ?

सुशांत : नागोठण्यापासुन अलीकडेच खोपोली फाट्यापासुन काही अंतरावर, नदीवर एक अरुंद पुल आहे आणि बाजुलाच पोलीस चौकीही आहे.

महेश : हे बघ मी तासाभरातच पोहचतोय तिथे, तु धीर धर ok. बघितलस नाहीतरी मी तुम्हाला म्हणत होतोच की मला कसलीतरी विलक्षण जाणीव होतेय म्हणुन, पण नाही तुंच मला म्हणालास की मी घाबरल्यामुळे सर्व झाल मग आता हे कस काय झालं?

सुशांत : please yaar ते सर्व सोड आता आपण नंतर चर्चा करु या विषयावर. त्याआधी मला ईनायतची फार काळजी वाटतेय रे.

महेश : ठेवतो आता तरीही मधुन-मधुन फोन करीन.tension घेऊ नकोस.

फोन ठेवल्यानंतर महेश अगदी सुन्न झाला. त्याला त्या अवस्थेत पाहुन तेजस काहिसा काळजीच्या स्वरात बोलला "काय रे काय बोलला? आणि तु ते accidents वैगरे काय बोलत होतास? please सांग ना काय झालं ते?" "तेजस अरे माझ्या गाडीला पुन्हा अपघात झाला रे, आणि ईनायतच्या पायाला गंभीर दुखापतही झाली आहे. दुखापत एवढी जबर आहे की तो पुन्हा ठिकपणे चालु शकेल की नाही याची शंका वाटते. दिपकला ही बर्‍यापैकी लागलय". सुरवातीचे लागलय हे शब्द ऐकून तेजस विचारांच्या गर्तेत गेला. त्याच्या डोळ्यासमोर हसरा ईनायत तसाच उभा होता, त्याच्याबरोबर कधीही कुठेही येणारा, कोनतेही कार्य असो केव्हाही नाही न बोलणारा ईनायत, आपल्या जखमी पायाकडे पाहुन विव्हळणार्‍या नजरेतुन जणु काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे... नुसत्या विचारानेच त्याच्या अंगभर मुंग्या संचारल्या व तो म्हणाला "महेश, चल आता मला एक क्षणभर ही येथे थांबवत नाहीये. अरे खरंच त्याला माझी गरज असेल. shit, साला माझ्यामुळेच झाल सर्व. कालही त्याला मीच फोर्स केला चल म्हणुन, सकाळीही त्याला pulsar आवडत नसताना मीच चालवण्यासाठी आग्रह धरला. आता त्याच्या आई-वडिलांना काय सांगु? की तुमचा मुलगा आता लवकर किंवा कधीच व्यवस्थीत चालु अथवा पळु शकणार नाहीये?" बोलता बोलता त्याच्या डोळ्यातुन अश्रु ओघळले. हे पाहताच महेशने लगेचच त्याला आपल्या जवळ घेतले, "हे बघ तु कसलेही वाईट-साईट विचार करु नकोस. आपण आधी घटनास्थळी जाऊया मग ठरवु काय करायच ते", आणि दोघेही तडक वाकणच्या दिशेने निघाले. ईनायतच्या काळजीने तेजस एखाद्या धुमकेतुच्या वेगाप्रमाणे गाडी चालवत होता. बाईकच्या प्रचंड वेगाने महेशच्या डोळ्यातुन गंगा-जमुना वाहु लागल्या आणि भितीचं वेगळ सांगायला नको. आज भीती नावाची गोष्ट खरच अस्तित्त्वात असती तर तिलाही भिती वाटली असती. वीस मिनिटांच्या रेकॉर्ड ब्रेक वेळेत दोघे वडखळ नाक्यावर पोहचले. तेथे येताच महेशने तेजसला गाडी थांबवण्यास सांगुन सुश्यांतला फोन केला. तेव्हा त्याने सांगितले की "ईनायतचा भरपुर रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यास ambulance ने सायन हॉस्पीटल मध्ये हालवले आहे. बहुतेक ते आत्ता रस्त्यातच असतील. तर तु तेजसला हॉस्पीटलमध्ये जायला सांग आणि तु ईथे ये. पोलिस केस झाल्यामुळे तुझी गाडी नागोठणे पोलीस ठाण्यात नेली आहे." झाला प्रकार महेशने तेजसला ऐकवला, तसा तो तिथुन तडक हॉस्पीटलच्या दिशेने निघाला व इकडे महेश मिळेल त्या वहानाने घटनास्थळी पोहचला. तेव्हा संध्या़काळचे सात वाजले होते व समोरच सुश्यांत गलित गात्र अवस्थेत उभा होता. महेशला समोर पाहताच त्याने क्षणाचाही विचार न करता त्याच्याकडे धाव घेतली. "महेश काय झाल यार, मला तर तो अजुन तसाच डोळ्यासमोर दिसत आहे." सुश्यांत काकुळतीच्या स्वरात बोलला. "हे बघ तु आधी शांत हो. आणि मला सविस्तर काय झाल ते सांग." तेव्हा सुश्यांत ने झाला सर्व प्रकार कथन करण्यास सुरवात केली.

"तुम्ही पुढे गेल्यानंतर आम्ही आरामात येत होतो. एक चार-साडे चारच्या सुमारास एका हॉटेलवर आंम्ही चहा पिण्यासाठी थांबलो सुद्धा, चहा पितानाच आम्ही सकाळच्या पडझड सत्राविषयी पुन्हा चर्चा केली. तेव्हा बिचारा ईनायत गणेशला बोलला सुद्धा की पनवेल पर्यंत आपण एका पाठोपाठ बाईक ठेवुया एकदा पनवेल गेले की काही टेन्शन नाही. त्यानंतर थोडे जोक वैगेरे झाल्यानंतर आम्ही तेथुन निघालो. पंधरा एक मिनिटानंतर या पुलावरुन गणेश ने एका जीपला overtake केला, तेव्हा ईनायत आणि दिपक आमच्या मागेच होते. क्षणात मोठा आवाज झाला तेव्हाच माझ्या मनात आलं की आपलीच गाडी असेल. गणेशनेही आवाज ऐकताच जागेवरच गाडी थांबवली. मागे वळुन पाहतो तर काय दिपक मागच्या मागे उडुन डाव्या बाजुला पडला होता, तर ईनायत रस्त्याच्या मधोमध कळवळत होता. आम्ही पहीली धाव ईनायत कडेच घेतली. टक्कर एवढी भीषण होती की इंडिकाचा पुढचा टायर जागीच फुटला व ती कठड्यावर जाऊन आदळली. गाडी थेट ईनायतच्या उजव्या गुडघ्यावर आदळल्यामुळे गुडघ्यावरील मांस फाटुन आतल सर्व दिसत होतं. मला बघताच चक्कर येऊन उलटीसारख वाटु लागल. अरे आमच तर सोड ईनायतला तर बिचार्‍याला प्रथमदर्शनी कळलच नाही. त्याने पहील हाताला तोंडाला कुठे काही लागलाय का ते पाहीलं, पण जेव्हा त्याची नजर पायाकडे वळली तेव्हा त्याने आमच्याकडे एकदा व्याकुळ नजरेने पाहीले. त्याच्या तोंडातुनतर आवाजच निघत नव्हता. इतक्यात दिपक लंगडत लंगडत आला. ईनायतची ती अवस्था पाहुन त्याला बिचार्‍याला उचलण्याचही भान कोणाला राहील नाही. एव्हाना पुलावर बरीच गर्दी जमली होती. दुतर्फा गाड्या जाम झाल्या. तेव्हा सुदैवाने गर्दीतुनच एक इसम आपण डॉक्टर असल्याचे सांगुन पुढे आला व त्याने पटकण इनायतवर प्राथमिक उपचार केले. बाजुलाच चौकी असल्यामुळे पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन ambulance ची व्यवस्था करुन दिली. ईनायतचीतर पुर्न पॅंन्ट रक्त्ताने भिजली होती. अतिरक्तस्त्रावामुळे बिचार्‍याच्या अंगात काहीच त्राण ऊरले नव्हते. जणुकाही दातखिळीच बसली असावी. तशाही परिस्थीतीत दिपकने आपल्याला काही लागलय याचा विचार न करता, तो आणि गणेश ईनायतला hospital मध्ये घेऊन गेले. तेव्हा गणेशनेच तिकडुन फोन करुन त्याला urgent सायन hospital ला नेत आहोत हे कळवले. मला मात्र पोलीसांनी इथेच थांबण्यास सांगितले. पंचनामा करताना त्यांनी गाडीचा मालक आणि कागदपत्रांविषयी विचारपुस केली, असता मी खर काय ते सांगितले. त्यात दुर्दैव असे की इनायत जवळ driving license नव्हते. मग फारच पंचाईत झाली आता केस होणार. गाडीतर पोलिस घेऊन गेलेच आहेत. मग पुन्हा त्याच्यासाठी त्यांची वेगळी आळवणी करा आणि भरीस भर म्हणुन घरच्यांच्या शिव्या. साला निघताना कुणाच तोंड पाहील होतं काय माहीती? असो, देवा बाकीचं काही झाल तरी चालेल, पण बिचार्‍या ईनायतला लवकर बरं कर." सुश्यांत काळजीच्या स्वरात बोलला. महेश मात्र शून्यात नजर ठेऊन समोरील द्रुश्य पाहात होता. संध्याकाळचे आठ वाजले असतील घरा-घरात पणत्या लागल्या, कंदीलही मंद प्रकाशात आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देत होते, छान गेरुच्या सड्यावरती सुबक रांगोळ्या रंगु लागल्या, त्यास जोड ती फटाक्यांची वातावरणात एक मंदसा सुवास भरुन गेलेला जणु काही लक्ष्मीच आपल्या हातांनी दरवाज्यावर दस्तक देत आहे असे मंगलमय वातावरन पण...........

होय या "पण" चे उत्तर महेशला आता मिळाले होते. राहुन राहुन त्याला आईचा हसरा चेहरा, तर बाबांची पुजेसाठी चाललेली धडपड आठवत होती. परंतु आता यापैकी काहीच आनंदायला मिळणार नव्हते..........................

2 comments:

Unknown said...

hmm.. chhan.. story cha end exciting hota..

what will be the next new story..??

am waiting..


Cheers!!!

Unknown said...

mahesh sir

chan gost lihili ahe pan shevat pharach fast kelat as watatay.
shevat ajunhi thoda tarangat rahila ahe.

pan atishay sundar rangavley katha.

dipak