Featured Post

रोज मरे........

नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० चा गजर लाऊन ७.३० लाच उठलो, अर्थातच आजही व्यायाम करायचा राहीला होता. डोळे चोळत असतानाच डो़क्यात जो काही विचार पहीला आ...

Tuesday, June 23, 2009

आणीबाणी - शेतकऱ्यांच्या व्यथा

आपल्या लहाणपणी आपण सर्वांनीच आणीबाणी हा शब्द इतिहासाच्या अथवा नागरिक शास्त्राच्या पुस्तकातुन अभ्यासला किंवा ऐकला असेलच. आणी-बाणी म्हणजे थोडक्यात काय तर बिकट परिस्तिथी हिच परिस्तीथी आजही आपल्या शेतकरी बांधवांना छळत आहे. दर पाच वर्षांनी नवीन सरकार आणी पुन्हा शेतकर्‍यांसाठी नवीन पॅकेजेस ज्याच्यात वीज, पाणी, कर्जमाफी सर्व असंत पण "कागदावरच" हे का चाललय ते आपल्या सर्वांना माहीत आहे. पण कुठपर्यंत चालणार आहे हे तर साक्षात विधात्यालाही माहीत नसेल. असो या सर्वांचा हा काव्यरुपी आढावा.


आणीबाणी जिंदगानी
हातावरल पोट त्यात सरकारी मनमानी
खिशात नाही दमडी त्यात छ्ळतो उर्मठ वाणी
आणीबाणी......

आणीबाणी जिंदगानी
पॅकेजं नवीन पण सवय ह्यांची जुनी
नळ आहे त्यात नाही पाणी
आणीबाणी......

आणीबाणी जिंदगानी
पोरांचा व्याप दु:खी कारभारनी
मिळकतच कमी म्हणुन सुरत आमची रोनी
आणीबाणी......

आणीबाणी जिंदगानी
काढलय कर्ज वाढलीयेत देणी
अहो आमचीच लोकशाही ठरली जीवघेनी
आणीबाणी......

आणीबाणी जिंदगानी
राज्य बळीच आम्ही मानसं गुणी
दिमत आमची कमी तरी हा शेतकरी मनानं धनी
आणीबाणी......


- श्रीमत् ( महेंन्द्र लक्ष्मण कदम)

Wednesday, June 17, 2009

दु चाकी - भाग 7

एक अर्ध्या पाऊन तासातच सर्वजन ऊठले. आत्ता मात्र तेजसला चांगलीच तरतरी आली होती. "ए चला आता आपल्याला येथुन कलटले पाहीजे", "अरे वो ठिक है लेकिन मुझे जोरो की भुक लगी है." इनायत कळवळत बोलला. यावर गणेश बोलला "अरे थोडा सबर कर बच्चु, कारण आता पहीले ईथुन निघुया म्हणजे दोन अडीच तासातच आपण महडला पोहचु जेवणही तेथेच करु आणि मग मुंबईईईई.....". पण महेश मात्र शांतच होता, का ते त्याचे त्यालाच कळत नव्हते पण जड अंतकरणाने त्यानेही आपली पावले तेथुन वळवली. अजुनही त्याला तिथेच मंदिरात बसुन राहावेसे वाटत होते. गड उतरताना काही जास्त कष्ट लागले नाहीत. खाली उतरताच सर्वांनी थोडे पाणी प्यायले आणि पुन्हा पावंसात रायगडाला नक्की भेट द्यायची या निश्चयाने तिघांनीही आपल्या गाड्या काढल्या. आता महडमध्ये भेटायचे हे आधीच ठरले असल्यामुळे तेजस सवयीप्रमानेच तेथुन निघाला. मागुन महेश आणि गणेशने ही आपल्या गाड्या हाकल्या. रात्रभरचा प्रवास त्यात सकाळपासुनची भटकंती यामुळे महेशला विलक्षन थकवा जाणवत होता आणि इतरांचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती. उतरणीची वळने फार धोकादायक वाटत होती. गड सोडुन एक पाचंच मिनिटे झाली असतील कि महेशच्या गाडीचा हार एकाबाजुने तुटला, तो तसाच अर्धवट तुटलेला हार महेशने हाताने हिसका देऊन तोडुन टाकला. त्याचवेळी पुन्हा तीच जाणीव जी त्याच्या मनाचा मागोवा घेत होती, काहीतरी होणार आहे पण काय? गाडी चालवता चालवताच तो स्वत:च्या मनाशी हे सर्व विचारत होता. तेवढ्यात सुश्यांतने त्याला हटकले, "काय कदम असे अचानक एकदम गप्प झालात. तुझ्यासारख्या माणसाला बरं दिसत नाही", "नाही रे असाच जरासा थकवा आलाय." "थकवा ना मग ठिक आहे, मला आपल वाटल की घरच्यांची किंवा वहीणींची आठवंण आली की काय?" "च्यायला तुझ बर आहे, स्वतःच ठेवायच झाकुन आणि दुसर्‍याच बघायच वाकुन." (ह्सुन..)"राहील नाही विचारणार"

रस्ता चांगलाच उतरणीचा होता. त्यात एस्सल वर्ल्डची आठवण करुन देणारी वळने आणि रस्त्यावरचे डांबर. तर मी ईथे का आहे अशा अवस्थेत महेश गाडी अत्यंत सावधानीने चालवत होता, तर त्यांच्याच मागे गणेश रमत-गमत येत होता. आणि क्षणातच एका अत्यंत धोकादायक वळनावर महेशच्या बाईकचे पुढचे चाक स्किड झाले. बाईक जेमतेम वीस तीसच्या स्पीडला असावी नाहीतर दोघेही बाजुच्याच दरीत कोसळले असते. सुश्यांतला जेमतेम खरचटलं पण महेशच्या मात्र उजव्या पायाला आणि तळहाताला चांगलीच ईजा झाली. त्यांना असे अचानक पडलेले पाहुन गणेश ने आपली बाईक जागीच थांबवली व दोघांनीही (गणेश & दिपक) त्यांच्याकडे धाव घेतली. सुश्यांत या अचानक झाल्या प्रकाराने गांगरुन गेला, तर महेश त्याचा गुडघा पकडुन तसाच बसुन होता. गणेशने जवळ येताच आधी पडलेली बाईक सरळ केली यावर काहीसं चिडुन महेश ओरडला, "ए खजुर बाईकला नाही लागलय, मला लागलय" यावर गणेश म्हणाला "अरे बाबा धीर धर, मला बाईक मध्ये ठेवलेले फर्स्ट एड किट हवं आहे समजले", "ठिक आहे डॉक्टरसाहेब आता आणा लवकर". दिपक मात्र सुश्यांतला काही लागलय का हे चेक करत होता. सुदैवाने त्याला फक्त खरचटल होतं. इकडे गणेशने ही महेश च्या हाताला आणि गुडघ्याला पट्टी बांधली. परंतु पाय चांगलाच ठणकत होता, महेश तसाच उठला आणि लंगडत लंगडत बाईक जवळ गेला आपल्या लाडकीचा त्याला थोडासा रागही आला होता पण क्षणात त्यास वाटले अरे ती तर एक निर्जीव वस्तु आपण चालवणार तशी ती चालणार, आणि लगेचच तो कुठे काही तुटलय का वैगरे पाहु लागला परंतु नशीबाने फक्त साईड गार्डच जरासे वाकले होते व फ्रंटलाईट फेरींग घसपटले होते त्यामुळे तो थोडासा सुखावला. त्याही स्थितीत महेशला गाडी चालवणे भाग होते कारण सुशांत आणि दिपक या दोघांनाही बाईक चालवता येत नव्हती.

पंधरा वीस मिनिटातच दोघेही घाट उतरले. घाट उतरताच समोर तेजस चिंताग्रस्त अवस्थेत दिसला. त्यास दिपकने हटकले "काय शिलेदार असा डब्याला लागल्यासारखा चेहरा का दिसतोय?" यावर तेजस बोलला "अरे भाऊ तुला तर कुठेही विनोद सुचतो. दिसत नाही माझी बाईक उभी आहे ते." "का काय झाल?" गणेश ने विचारले. "अरे काही नाही पेट्रोल संपलय आणि इथुन पेट्रोलपंपही पाच सहा किलोमीटर लांब आहे", "अरे एवढचं ना, मग माझ्या फ्युएल टॅंक मधुन घे" महेश काहीशा दुखर्‍या आवाजात बोलला. यावर तेजसची नजर त्याच्या बॅंडेजवर गेली व त्याने त्याबद्दल विचारले असता गणेशने झाला प्रकार दो-घांनाही ऐकवला. सर्वांनी झाल्याप्रकारावर पुन्हा एकदा हळहळ व्यक्त केली. महेशला सर्वांनी धीर दिला आणि एकंदर त्याची स्तिथी पाहता त्याला त्रासही फार होत होता हे सर्वांना जाणवत होते परंतु त्याला गाडी चालवणे भाग होते, कारण सुशांत आणि दिपक सोडल्यास इनायतलाच गाडी चांगल्या प्रकारे चालविण्यास येत होती परंतु त्यास पल्सरबद्दल एक अवास्तव भीती असल्यामुळे त्याने नकार दिला. महडला पट्रोल भरुन झाल्यानंतर इनायतने तेथील कर्मचार्‍यांस विचारले "अरे भाई यहा कही अच्छा होटल है क्या?" "हा साहब है, लेकिन यहा से आधे घंटे की दुरी पर है और एक यहा बाजुमेही है लेकिन वहा आपको खाना इतना अच्छा नही मिलेगा." यावर तेजस म्हणाला "भाई खाईन तर तुपाशी नाहीतर राहीन ऊपाशी." "ए उपाशी आधी हॅ।टेलचे नाव तरी विचार" दिपक वैतागत बोलला यावर त्या इसमाने ते सिंग दा ढाबा असल्याचे सांगितले.


(क्रमशः)