Featured Post

रोज मरे........

नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० चा गजर लाऊन ७.३० लाच उठलो, अर्थातच आजही व्यायाम करायचा राहीला होता. डोळे चोळत असतानाच डो़क्यात जो काही विचार पहीला आ...

Tuesday, July 20, 2010

श्रावणात भर सरी बरसती..

नुकताच छान पाऊस पडुन गेला असता निर्सगाची वेगवेगळी मोहक रुपे आपणास पाहायला मिळतात आणि नकळतच ती हृदयाच्या एका बंद कोपर्यात असलेल्या आठवणींना उजाळा देऊन जातात, अन् डोळ्यासमोर उभ्या राहतात त्या फक्त भिजलेल्या स्मृती...........................

श्रावणात भर सरी बरसती
सुगंधली सस्य माती,
ओल्या दंवात मंद सळसळली
हिरवीगार पाती

सर्द धुक्यापरी गर्द दाटल्या
आठवणी ह्या मनी,
थुई-थुई करुनी मयुर नाचला
बर्ह प्रती फुलवूनी

करी पसारा उनाड वारा
अवचित उडवी तुषार धारा
धारासार लीन बरसल्या
उभ्या छतावर रिमझिम गारा

दुरून कुठून वळुन खळाळत
आला सुंदर एक जलाकर
अभिमुखम अडगणा निघाली
आर्द्र-बाष्प कटी घेऊन घागर

रुप साजिरे गिरीशिखरांचे
पर्ण बहरले तरूषण्डांचे
सप्त रंग त्या इंद्रधनुचे
ओज भाती जणु गांडीवाचे

चिंब टपोर्या नीर बिंदुंनी
स्रुष्टी सारी गेली भिजुनी
तव चक्षुसह नभ ह्या भेदुनी
अजुनही चातक मागे पाणी......................................

श्रीमत् (महेन्द्र लक्ष्मण कदम)


काही शब्दांचे अर्थ :
सस्य = पिके, लावणी,

बर्ह प्रति = पाठिवरील पिसारा

तरुषण्ड = झाडे
गांडिव = अर्जुणाचे धनुष्य

जलाकर = ओढा, झरा

अभिमुखम = च्या दिशेने

अडगणा = स्त्री